कोण शिकवते? (Who teaches?)
1ली,बालभारती 3
चला शिकूया-
साभिनय व तालासुरात गीतगायन करणे.
गाण्याचा आनंद घेणे.
कोण शिकवते?
पोपट म्हणाला मैनाताई
माझ्यासाठी गा अंगाई
सा-रे-ग-म-प-ध-नि-सा
आवाज तुझा गोड बाई
वाघोबा म्हणाले कोल्हेदादा
गोष्ट आम्हांला सांगाल का?
त्यात लबाडी करू नका
प्रामाणिक बनाल का?
कासव म्हणाले घोडेदादा
टप्-टप् टापा चाल तुमची
शिकवा ना हो आम्हांलाही
कला तुमची पळण्याची
साळुंकी म्हणाली खारुताई
नेहमी, तुला कसली घाई?
बसले तुझ्या समोर मी
वेळेचे महत्त्व शिकव बाई
भू-भू म्हणाला मुंगीताई
रांगेत चालते, कण वेचते
मुंगीताई शिस्त तुझी ही
फार मला गं आवडते
कोकिळा म्हणाली कावळेदादा
वाढवतो तू माझी पिल्ले
दुसऱ्यासाठी काम करावे
सांग तुला कोण शिकवते?
– माया धुप्पड
मनोरंजक टेस्ट सोडवा…
परिसरातील लहान उद्योगांची माहिती
आपल्याला परिसरातील लहान उद्योग करणाराचे नाव ओळख.

माहिती घेऊया
खालील वस्तू मोजा व सांगा.

आपले मदतनीस
आपल्याला कोण ,काय मदत करतो?

Guess the shapes. आकार ओळख
खालील आकारांची नावे सांग.

मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |