गती (Speed/Motion)
1ली, बालभारती मराठी
चला शिकूया.-
साभिनय व तालासुरात गीतगायन करणे.
गाण्याचा आनंद घेणे.
चालत चालत जायचा माणूस
आपल्या दोन पायांवर,
त्यात केवढी गती आली
चाकाचा शोध लागल्यावर.
येण्याजाण्यासाठी लोक
वापरत असत बैलगाडी,
टांगा ओढतो टप्टप् घोडा
त्यालाच म्हणती घोडागाडी.
दोन गावे जोडायला
बसगाडी सडकेवर,
इकडून तिकडे गावोगाव
लोक जातात भराभर.
पायंडल मारता धावायची
दोन चाकांची सायकल,
पेट्रोल भरता पळू लागली
वेगात मोटारसायकल
कोळसे खात धावायची
आगगाडी रुळावर,
त्यात झाली सुधारणा
आता चालते विजेवर.
सागराच्या सफरीसाठी
जहाज आणि बोटी,
आभाळाच्या भरारीची
माणसाला हौस मोठी.
पंख नसून माणसाने
झेप घेतली आभाळात,
विमानात फिरू लागला
देश आणि परदेशांत.
फिरणे असे सोपे झाले
जमीन, पाणी, आकाशात,
अंतराळयानामधून
आता जाती अवकाशात.
अर्थपूर्ण वाक्ये तयार कर व लिही. (Frame meaningful sentences and write.)
चला शिकूया.-
अर्थपूर्ण वाक्य तयार करता येणे.सूरज सायकल चालव.
सूरज होडी चालव.
तेजस सायकल बघ.
तुषार डॉक्टरांकडे जा.
सागर विमानाचा आवाज ऐक.
सुप्रिया घोडागाडीत बस.
जॉन शिक्षकांना विचार.
अनघा सैनिकदादाला सलाम कर.
रेहान पोस्टमनकाकांना पाणी दे.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |