गाडी आली गाडी आली, gadi aali gadi aali | 1ली,बालभारती भाग 4

गाडी आली गाडी आली

1ली, बालभारती मराठी

चला शिकूया.
*साभिनय व तालासुरात गीतगायन करणे.
*गाण्याचा आनंद घेणे.
*भाषेतील विविध ध्वनी आणि शब्द ओळखता येणे.
*लयबद्ध शब्दांचे लेखन व वाचन करता येणे.

गाडी आली गाडी आली – झुक् झुक् झुक्
शिटी कशी वाजे बघा – कुक् कुक् कुक्
इंजिनाचा धूर निघे – भक् भक् भक्
चाके पाहू तपासून – ठक् ठक् ठक्
जायाचे का दूर कोठे – भूर भूर भूर
कोठेही जा नेऊ तेथे – दूर दूर दूर
गाडीमधे बसा चला – पट् पट् पट्
सामानही ठेवा सारे – चट् चट् चट्
तिकिटाचे पैसे काढा – छन् छन् छन्
गाडीची ही घंटा वाजे – घण् घण् घण्
नका बघू डोकावून – शुक शुक शुक
गाडी आता निघालीच – झुक् झुक् झुक्
– वि. म. कुलकर्णी

प्रश्नोत्तर –

गाडीची शिटी कशी वाजते?- कुक् कुक् कुक्

गाडी कसा आवाज करत आली ?- झुक् झुक् झुक्

गाडीच्या इंजिनाचा धूर कसा निघतो ?- भक् भक् भक्

गाडीच्या तिकिटाचे पैसे कसे काढायचे  ?- छन् छन् छन्

आवाजाचे शब्द लिही. (Write the words that denote sound.)

मराठी व सेमी माध्यम

पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.