घरभर प्रकाश (Light all over the house) | 1ली | बालभारती भाग-1

घरभर प्रकाश-Light all over the house

बालभारती भाग-1

page-28 व 29

चला शिकूया.
सर्जनशील विचार करणे.
समस्या निराकरण करणे.

घरभर प्रकाश (Light all over the house)

सहजपूर नावाचे गाव होते. त्या गावात केशव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे शेतकरी कुटुंब राहत होते. त्यांना दोन मुले होती. आरव आणि सायली. ते सगळेजण खूप आनंदात राहायचे. आरव आणि सायली दोघेही रोज शाळेत जात असत. शाळेतून आल्यावर ते दोघे आई-बाबांना कामात मदत करायचे.

एके दिवशी बाबांनी दोघांत मिळून १० रुपये दिले. मुलांना आनंद झाला.

मुलांना प्रश्न पडला. त्यांना काही सुचेना. ते एका दुकानात गेले. तेथे त्यांना अनेक वस्तू दिसल्या. दोघांनी मिळून खूप विचार केला. त्यांना एक
युक्ती सुचली.

दुकानातून दोघांनी एक पणती विकत घेतली. संध्याकाळ झाली. त्यांनी पणतीत तेल ओतले. कापसाची वात केली. पणती लावून ठेवली. तेवढ्यात आई-बाबा आले. त्यांनी पाहिले. सारे घर प्रकाशाने उजळून निघाले होते.

दोन्ही मुलांनी एकत्रित विचार करून कल्पकतेने आपण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधले, याचा आई-बाबांना खूप आनंद झाला. त्यांनी दोन्ही मुलांना जवळ घेतले व शाबासकी दिली.

प्रश्नोत्तर :-

प्रश्न:-केशव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे शेतकरी कुटुंब कोठे राहत होते?

उत्तर:-केशव आणि त्यांची पत्नी लक्ष्मी हे शेतकरी कुटुंब सहजपूरमध्ये राहत होते.

प्रश्न:- आरव आणि सायली शाळेतून आल्यावर कोणते काम करायचे ?

उत्तर:-आरव आणि सायली शाळेतून आल्यावर दोघे आई-बाबांना कामात मदत करायचे.

प्रश्न:-आरव आणि सायली यांना बाबांनी किती रुपये दिले?

उत्तर:- बाबांनी आरव आणि सायली यांना दोघांत मिळून १० रुपये दिले.

प्रश्न:-आरव आणि सायली यांनी दुकानातून काय विकत घेतले ?

उत्तर:-आरव आणि सायली यांनी दुकानातून एक पणती विकत घेतली.

प्रश्न:-सारे घर——उजळून निघाले होते.

उत्तर:- प्रकाशाने

प्रश्न:-आई-बाबांना यांनी मुलांना शाबासकी का दिली?

उत्तर:-आरव आणि सायली यांनी 10रुपयांची एक पणती विकत घेतली.पैशांतून घर भरून जाईल अशी वस्तू आणल्यावर आई व बाबा यांना आनंद झाला म्हणून त्यांनी मुलांना शाबासकी दिली.

What If… Key

तुला जर १० रुपये दिले तर तू काय करशील?

मराठी व सेमी माध्यम

क्र घटकाचे नाव लिंक
1 बालभारती भाग 1 क्लिक करा
2 बालभारती भाग 2 क्लिक करा
3 बालभारती भाग 3 क्लिक करा
4 बालभारती भाग 4 क्लिक करा
5 गणित (सेमी इंग्रजी) क्लिक करा
6 जुना अभ्यासक्रम क्लिक करा
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा 
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.