8 September | 8 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

8 September

8 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक- 08/09/2023, 8 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 9

शके– 1945

सुविचार- आपली दुर्बलता हाच आपल्या जीवनातील अत्यंत वाईट दोष आहे.

म्हणी व अर्थ : बळी तो कान पिळी – बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो .

वाक्प्रचार-  डोळे ओले होणे – रडणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५१ वा किंवा लीप वर्षात २५२ वा दिवस असतो.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

संपूर्ण जगभरात ८ सप्टेंबर रोजी साक्षरता दिन साजरा केला जातो. लोकांनी साक्षर होऊन स्वतःचा आणि पर्यायाने समाजाचा विकास करावा, असा महान उद्देश्य ठेवून हा दिवस साजरा केला जातो.
माणूस साक्षर झाल्यापासून त्याची प्रगती निश्चितच झालेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान कमालीचे विकसित झालेले आहे. दैनंदिन जीवन सुधारले आहे. जगण्यातील आणि वागण्यातील गुणवत्ता बदलली आहे.
साक्षरतेची गरज आणि महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्र संघटनेने १७ नोव्हेंबर १९६५ या दिवशी “८ सप्टेंबर” हा दिवस “जागतिक साक्षरता दिन” म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय घेतला. त्यानंतर १९६६ साली प्रथमच साक्षरता दिन साजरा करण्यात आला.
देशातील अशिक्षित लोकांना अशा प्रकारे शिक्षित बनवले पाहिजे की त्यांना प्राथमिक अक्षर ओळख होऊ शकेल आणि ते सहजरित्या लिहू – वाचू शकतील. त्यासाठी सध्या “साक्षर भारत मिशन” देखील राबवले जात आहे.
कोणत्याही देशाची प्रगती तेथील साक्षर लोकांमुळे होत असते. साक्षर समाज नेहमीच विवेकपूर्ण पद्धतीने आणि नैतिकदृष्ट्या विकसित होत असतो.
त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात साक्षरतेचे महत्त्व जागवण्यासाठी साक्षरता दिनी शाळेतील मुलांकडून देखील घोषवाक्ये देखील दिली जातात.वयस्कर लोकांना साक्षर बनवणे आणि सर्व लहान मुलांना योग्य शिक्षण देणे हा महत्त्वपूर्ण उद्देश्य साक्षरता दिनानिमित्त साधला जातो. वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय प्रगती करायची असेल तर देशात कोणीही निरक्षर राहता कामा नये.
समाजात साक्षरता रूजल्याने दैनंदिन जीवन एकदम सुखकर बनत जाते. शासनाच्या योजना समजतात, स्वतःबरोबर कौटुंबिक विकास कसा साधता येईल याची समज वाढते. म्हणजेच लोकांचे राहणीमान आणि वैचारिक दृष्टिकोन उंचावत जातो.
नागरिक साक्षर झाल्याने त्यांना कोणीही गुलाम बनवू शकत नाही. त्यांना कोणी फसवू शकत नाही. त्यामुळे सामाजिक स्थिरता आणि समानता लाभू शकते. प्रत्येक व्यक्तीच्या मनात आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे स्वप्न रुजू शकते.
भारतात बहुसंख्य लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. सध्याची लहान मुले आणि तरुण पिढी व्यवस्थित शिक्षण घेत आहे. त्याचा परिणाम म्हणून साक्षरतेचे प्रमाण वाढत चालले आहे. यापुढेही संपूर्ण देश साक्षर बनेल असा निर्धार आपण साक्षरता दिनी करूयात आणि त्यादृष्टीने प्रयत्नशील राहूयात.

अठरावे शतक

  • १७२७ – इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमध्ये कचकड्याच्या खेळ चालू असताना लागलेल्या आगीत अनेक मुलांसह ७८ ठार.

एकोणिसावे शतक

  • १८३१ – विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.

विसावे शतक

  • १९०० – अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
  • १९१४ – पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरून पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला.
  • १९२३ – अमेरिकेच्या नऊ विनाशिका कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर चढल्या. यांपैकी सात नौका भंगारात काढाव्या लागल्या.
  • १९२६ – जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
  • १९३४ – एस.एस. मॉरॉया प्रवासी जहाजाला न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ आग लागली. १३५ ठार.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध-ड्वाईट डी. आयझेहॉवरने इटलीशी झालेली संधी जाहीर केली.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
  • १९४५ – शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
  • १९६२ – अल्जीरियाने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९६६ – स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
  • १९७० – पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या तीन अमेरिकन विमानांचा नाश.
  • १९७४ – वॉटरगेट कुंभांड – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्डने रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली.
  • १९९१ – मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.
  • १९९४ – युएसएरचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान पेनसिल्व्हेनियातील अलिकिप्पा शहराजवळ कोसळले.

जन्म

  • ११५७ – रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १२०७ – सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १६३३ – फर्डिनांड चौथा, हंगेरीचा राजा.
  • १८३० – फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
  • १८५२ – ग्वांग्मु, कोरियाचा राजा.
  • १८५७ – जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९०१ – हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • १९१८ – डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १९२६ – भूपेन हजारिका, हिंदुस्तानी गायक
  • १९३३ – आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक.
  • १९४४ – टेरी जेनर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ७०१ – पोप सर्जियस पहिला.
  • ७८० – लिओ चौथा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १९३३ – फैसल पहिला, इराकचा राजा.
  • १९६५ – हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९८० – विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९८१ – हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना
सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना
श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

अती शहाणा 
एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका !
सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते.
कधी – कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा.
सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही.
नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे.
मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल.
आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
तात्पर्य:~ अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ गंगोत्री राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜उत्तराखंड.
 ✪ बळीवंश या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜डाॅ.आ.ह.साळुंखे.
 ✪ स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
  ➜सरदार वल्लभभाई पटेल.
 ✪ उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜लातूर.
 ✪ गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
  ➜ न्यूटन.
✪ विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर : राईट बंधू
✪ सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर : मॅकमिलन
✪ टेलिव्हिजन (TV)चा शोध कोणी लावला ?
उत्तर: जॉन बेअर्ड
✪ टेलिफोन चा शोध कोणी लावला ?
उत्तर : अलेक्झांडर ग्राहम बेल
✪ विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर : थॉमस एडिसन

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans: The dog guards the house
2) animal is useful for agricultural work?
Ans: Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans: Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans: Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans: The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#8 september,8 september 2023, 8 september 2021 panchang, 8 september 2022 special day, 8 september 2023 weather, 8 september 2022 panchang in hindi,8 september is celebrated as, what is celebrated on 8 september, 8 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.