6 Jully
6 जुलै दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– बुधवार
दिनांक- 06/07/2023, 6 Jully
मिती- आषाढ कृ.3/4
शके– 1945
सुविचार- ज्ञान ही खरी शक्ती आहे. Knowledge is power.
म्हणी व अर्थ – मनी वसे ते स्वप्नी दिसे – जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे.
ठळक घटना आणि घडामोडी

जुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.
तेरावे शतक
- १२५३ – मिंडॉगास लिथुएनियाच्या राजेपदी.
चौदावे शतक
- १३४८ – युरोपमधील प्लेगच्या प्रादुर्भावानंतर पोप क्लेमेंट सहाव्याने पोपचा फतवा काढून ज्यू व्यक्तींना अभय दिले.
पंधरावे शतक
- १४८३ – रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.
- १४८४ – पोर्तुगालच्या शोधक दियोगो काओ कॉॅंगो नदीच्या मुखाशी पोचला.
सोळावे शतक
- १५३५ – राजा हेन्री आठव्याच्या इंग्लिश चर्चचे रोमन कॅथोलिक चर्चपासून विभाजन करण्याच्या निर्णयाशी सहमत न झाल्यामुळे सर थॉमस मोरला मृत्यूदंड.
- १५६० – इंग्लंड व स्कॉटलंडमध्या एडिनबर्गचा तह.
- १५७३ – कोर्दोबा, आर्जेन्टीना शहराची स्थापना.
सतरावे शतक
- १६३० – तीस वर्षाचे युद्ध – स्वीडिश सैनिक पोमरेनियात उतरले.
अठरावे शतक
- १७७७ – अमेरिकन क्रांती-टिकोंडेरोगाची लढाई – ब्रिटीश सैन्याने अमेरिकन सैन्याला फोर्ट टिकोंडेरोगा या किल्ल्यातून पळ काढण्यास भाग पाडले.
- १७८५ – अमेरिकेने डॉलरला चलन म्हणून मान्यता दिली. हे चलन पूर्णतः दशमान पद्धतीवर आधारित होते.
एकोणिसावे शतक
- १८८७ – अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य करण्यास भाग पाडले.
- १८९२ – दादाभाई नौरोजींची ब्रिटीश संसदेचे सर्वप्रथम भारतीय सभासद म्हणून निवड.
विसावे शतक
- १९०५ – आल्फ्रेड डीकिन दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.
- १९०८ – रॉबर्ट पियरीची उत्तर ध्रुवावर जाण्यासाठीची मोहीम निघाली.
- १९३९ – ज्यूंचे शिरकाण – जर्मनीतील ज्यू व्यक्तींचे उरलेसुरले उद्योगधंदे बंद करण्यात आले.
- १९४४ – हार्टफर्ड, कनेक्टिकट येथे सर्कशीच्या तंबूला आग. १६८ ठार, ७०० जखमी.
- १९६४ – मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ – मलावी प्रजासत्ताक झाले.
- १९६७ – नायजेरियाने बियाफ्रावर आक्रमण केले.
- १९७५ – कोमोरोसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९८८ – उत्तर समुद्रात खनिज तेल काढणाऱ्या पायपर आल्फा या जहाजवर स्फोट. १६७ ठार.
एकविसावे शतक
- २००३ – कॉर्सिकातील निवडणूकात नागरिकांनी फ्रांसपासून स्वातंत्र्य नाकारले.
- २००६ – भारत व तिबेटमधील नथुला खिंड व्यापारास खुली.
जन्म
- १७९६ – निकोलस पहिला, रशियाचा झार.
- १८०९ – अँड्र्यू सॅंडहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८३७ – डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.
- १८८१ – गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.
- १८९७ – व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, मराठी कथाकार आणि कादंबरीकार.
- १९०१ – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे पहिले नेते .
- १९०५ – लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.
- १९२१ – नॅन्सी रेगन, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनची पत्नी.
- १९२३ – वोयचेक जेरुझेल्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३५ – दलाई लामा, तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते.
- १९३७ – टोनी लुईस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३९ – मन सूद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४६ – जॉर्ज डब्ल्यू. बुश, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९४६ – सिल्व्हेस्टर स्टॅलोन, अमेरिकन अभिनेता.
- १९५८ – मार्क बेन्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७७ – मखाया न्तिनी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ११८९ – हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १२४९ – अलेक्झांडर दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १५५३ – एडवर्ड सहावा, इंग्लंडचा राजा.
- १७६२ – पीटर तिसरा, रशियाचा झार.
- १८३५ – जॉन मार्शल,अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश.
- १८५४ – गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०१ – क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंगफर्स्ट, जर्मनीचा चान्सेलर.
- १९८६ – जगजीवनराम, भारतीय राजकारणी.
- २००२ – धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.
- २००४ – थॉमस क्लेस्टिल, ऑस्ट्रियाचा राष्ट्राध्यक्ष.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – मलावी, कोमोरोस.
- प्रजासत्ताक दिन – मलावी.
- राज्य दिन – लिथुएनिया.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#6 jully, 6 jully 2023, 6 jully 2021 panchang, 6 jully 2022 special day, 6 jully 2023 weather, 6 jully 2022 panchang in hindi, 6 jully is celebrated as, what is celebrated on 6 jully, 6 jully 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.