3 June
3 जून
शालेय परिपाठ, दैनंदिन परिपाठ
3 june हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५४ वा किंवा लीप वर्षात १५५ वा दिवस असतो.
JUNE
ठळक घटना आणि घडामोडी
चौथे शतक
- ३५० – नेपोटियानसने रोममध्ये घुसून स्वतःला सम्राट घोषित केले.
अकरावे शतक
- १०९८ – पहिली क्रुसेड – आठ महिने चाललेल्या वेढ्यानंतर क्रुसेडरांनी ॲंटियोक शहर जिंकले.
सोळावे शतक
- १५३९ – एर्नान्दो दि सोतोने फ्लोरिडा स्पेनचा भाग असल्याचे जाहीर केले.
सतरावे शतक
- १६६५ – जेम्स स्टुअर्टने नेदरलॅंड्सच्या आरमाराला हरवले.
एकोणिसावे शतक
- १८६४ – अमेरिकन यादवी युद्ध – कोल्ड हार्बरची लढाई.
- १८८९ – कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेने कॅनडाचे दोन्ही तीर जोडले.
विसावे शतक
- १९३७ – ड्यूक ऑफ विन्डसर व वॉली सिम्पसनचे लग्न.
- १९४० – डंकर्कची लढाई – जर्मनीचा विजय. दोस्त सैन्याने पळ काढला.
- १९४३ – झूट सुट दंगे – लॉस एंजेल्स नेव्हल रिझर्व आर्मरीतील ६० लोकांच्या टोळक्याने हिस्पॅनिक दिसणाऱ्या लोकांना बडवून काढले.
- १९६२ – एर फ्रांसचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिसहून निघताना कोसळले. १३० ठार.
- १९६३ – नॉर्थवेस्ट एरलाइन्सचे डी.सी. ७ प्रकारचे विमान ब्रिटिश कोलंबियाच्या किनाऱ्याजवळ कोसळले. १०१ ठार.
- १९६८ – अँडी वॉरहोल वर खूनी हल्ला.
- १९६९ – व्हियेतनामजवळ ऑस्ट्रेलियाची विमानवाहू नौका एच.एम.ए.एस. मेलबॉर्न व अमेरिकेची विनाशिका यु.एस.एस. फ्रँक ई. एव्हान्सची टक्कर. एव्हान्सचे दोन तुकडे झाले.
- १९७३ – सोवियेत संघाचेचे टी.यु. १४४ प्रकारचे विमान फ्रांसमध्ये गुसेनव्हिल जवळ कोसळले. १४ ठार.
- १९७९ – मेक्सिकोच्या अखातात इहटॉक १ या खनिज तेलाच्या विहिरीला आग लागली. ६,००,००० टन तेल समुद्रात पसरले.
- १९८४ – ऑपरेशन ब्ल्यु स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
- १९८९ – थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लश्कर पाठवले.
- १९९१ – जपानमधील माउंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
- १९९८ – जर्मनीमध्ये आय.सी.ई रेल्वेगाडी रुळांवरून घसरली. १०१ ठार.
एकविसावे शतक
- २००६ – सर्बिया आणि मॉंटेनिग्रोचे विघटन. मॉंटेनिग्रोला स्वातंत्र्य.
जन्म
- १८९० – बाबूराव पेंटर, प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, चित्रकार आणि शिल्पकार कलामहर्षी.
- १८९० – खान अब्दुल गफारखान, सरहद्द गांधी.
- १९३० – जॉर्ज फर्नांडिस भारतीय पत्रकार आणि राजकारणी पद्मा विभूषण
मृत्यू
- १९७७ – आर्चिबाल्ड विवियन हिल, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ.
- २००० – डॉ. आर.एस. अय्यंगार, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटरचे संचालक.
- २०१० – अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
दिनविशेष, सुविचार, प्रार्थना, वाक्यप्रचार , बोधकथा, म्हणी, पसायदान, संविधान, प्रतिज्ञा, बालगीते, देशभक्तीपर गीते, परिपाठ
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा