18 august | 18 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

18 august

18 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक- 18/08/2023, 18 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 2

शके– 1945

सुविचार- शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते. Education ends ignorance in man.

म्हणी व अर्थ : अंथरूण पाहून पाय पसरावे – आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.

वाक्प्रचार- अंग चोरून काम करणे – फारच थोडे काम करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३० वा किंवा लीप वर्षात २३१ वा दिवस असतो.

तेरावे शतक

  • १२०१ – रिगा शहराची स्थापना.

सोळावे शतक

  • १५८७ – रोआनोक वसाहतीच्या गव्हर्नर जॉन व्हाइटची मुलगी व्हर्जिनिया डेर ही अमेरिकेत जन्माला आलेली सर्वप्रथम इंग्लिश व्यक्ती ठरली.

विसावे शतक

  • १९०९ – टोक्योच्या महापौर युकिओ ओझाकीने वॉशिंग्टन डी.सी. शहरास २,००० चेरीच्या झाडांची भेट दिली. अद्यापही ही झाडे पोटोमॅक नदीकाठी आहेत.
  • १९१७ – थेसालोनिकी, ग्रीसला आग लागू शहराचा तिसरा भाग भस्मसात.
  • १९२० – अमेरिकेच्या संविधानातील १९वा बदल लागू झाल्याने स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९४१ – नागरिकांच्या दबावापुढे झुकून ऍडॉल्फ हिटलरने मतिमंद व्यक्तींचे शिरकाण तात्पुरते थांबवले.
  • १९६३ – जेम्स मेरेडिथ हा मिसिसिपी विद्यापीठातून स्नातक होणारा पहिला श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
  • १९७१ – व्हियेतनाम युद्ध – ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.
  • १९८३ – हरिकेन ऍलिशिया टेक्सासच्या किनाऱ्यावर आले. २२ ठार, १ अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान.

एकविसावे शतक

  • २००५ – जावामध्ये वीज गेल्यामुळे १० कोटी लोक अंधारात.
  • २००८ – पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.

जन्म

  • १६९२ – लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.
  • १६९९ – थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
  • १७५० – आंतोन्यो साल्येरी, इटालियन संगीतकार.
  • १७७४ – मेरीवेदर लुईस, अमेरिकन शोधक व साहसिक.
  • १७९२ – जॉन रसेल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८३० – फ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
  • १८७२ – विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
  • १९६२ – फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६७ – दलेर मेहंदी, भारतीय गायक, नर्तक.
  • १९८० – प्रीती झंगियानी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू

  • १२२७ – चंगीझ खान, मंगोल सम्राट.
  • १२७६ – पोप एड्रियन पाचवा.
  • १५०३ – पोप अलेक्झांडर सहावा.
  • १५५९ – पोप पॉल चौथा.
  • १६२० – वान्ली, चिनी सम्राट.
  • १७६५ – फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८५० – ऑनोरे दि बाल्झाक, फ्रेंच लेखक.
  • १९४० – वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४५ – नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी
  • १९७९ – वसंतराव नाईक , हरितक्रांती , श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेेेेचे जनक (सिंगापूर येथे निधन)
  • १९९८ – पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.
  • २००८ – नारायण धारप, मराठी लेखक.
  • २००९ – किम दे-जुंग, दक्षिण कोरियाचा १५वा राष्ट्राध्यक्ष.
  • २००९ – रॉबर्ट नोव्हाक, अमेरिकन पत्रकार.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।। धृ.।।
शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे
चिमणपाखरा, चिमणपाखरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा ।।१।।
विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी
दयासागरा, दयासागरा
ज्ञान मंदिरा … …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत कीर्तिचा कळस जाई उंच
अंबरा, उंच अंबरा
ज्ञान मंदिरा …
सत्यम शिवम सुंदरा,
सत्यम शिवम सुंदरा ।।३।।
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

लोभी कुत्रा
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. त्याला रस्त्यावर एक मोठा हाडाचा तुकडा सापडला. तो तुकडा एकट्याने खायचा असा विचार त्याच्या मनात आला व तो खूप वेगाने धावू लागला.
धावत धावत तो एका ओढ्यावर आला. ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता. तो लाकडी पुलावर चालत होता.
लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले.
ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ आणि शांत होते. पाण्यात आणखी एक हाड तोंडात असलेला त्याला दुसरा कुत्रा दिसला. खरेतर तो दुसरा कुत्रा नसून त्याचेच प्रतिबिंब होते. पण त्या लोभी कुत्र्याला हे समजले नाही.
त्याला वाटले कि हा एक दुसरा कुत्रा आहे आणि आपले हाड सुद्धा घेईल. त्याला पाण्यात असलेल्या कुत्र्याकडे मोठ्या हाडाचा तुकडा दिसला. कुत्र्याने विचार केला कि, मी यांच्याकडून हा तुकडा सुद्धा हुसकावून घेतो आणि २ तिकडे खातो.
पण कुत्र्याला कळले नाही की पाण्यातील कुत्रा हे स्वतःचेच प्रतिबिंब आहे.
पाण्यातील कुत्र्याच्या हाडाचा तुकडा पकडण्यासाठी त्याने आपले तोंड उघडले. त्याने आपले तोंड उघडताच त्याच्या तोंडातील आपला तुकडा खाली पाण्यात पडला.
आता त्याला पश्चाताप करण्याशिवाय काहीच नव्हते, कुत्रा रिकाम्या जबड्याने पाण्याबाहेर टक लावून पाहत होता.
आता त्याला समजून चुकले कि हि त्याचीच सावली आहे.
तात्पर्य- जास्त लोभ करणे हे कधीच फायद्याचे नसते, जे आपल्या कडे आहे त्यात समाधान मानावे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना
या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली
अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती
खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो
महाराष्ट्र माझा

2.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर : मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  होते .
२) ‘ जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत कोणी रचले?
उत्तर : ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले.
३) रवींद्रनाथ टागोर यांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली पारितोषिक मिळाले.
४) आपले राष्ट्रीय दिवस कोणते आहेत?
उत्तर : स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
५) भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली?
उत्तर : भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली.

ENGLISH QUESTION

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute?
Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are in half hour?
Ans: 30 minutes
6) How many minutes are there in a quarter of an hour?
Ans: 15 minutes
7) How many minutes are there hour?
in a three quarters of an
Ans: 45

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#18 august, 18 august 2023, 18 august 2021 panchang, 178august 2022 special day, 18 august 2023 weather, 18 august 2022 panchang in hindi, 18 august is celebrated as, what is celebrated on 18 august, 18 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

One thought

  1. सर रोज मला दिन विशेष पाठव

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.