शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023

Video Making 2023

Teacher video making compitation 2023

video making compitation 2023

प्रस्तावना

आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. शैक्षणिक तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता निर्माण करण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञान (ICT) तंत्रज्ञानाचा सध्या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसत आहे.
यामुळे डिजिटल शिक्षणाचे वेगळेच महत्त्व निर्माण झालेले आहे.
कोविड-१९ काळात प्रत्यक्ष शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या विविध माध्यमाद्वारे व साधनांद्वारे वर्गा-वर्गातून अध्ययन-अध्यापन प्रणाली घडतांना दिसून येत होती.
शिक्षक, विद्यार्थी कधी शाळेच्या ओट्यावर, कधी शेतात, कधी मंदिराच्या ओट्यावर, कधी निवासी पार्किंग मध्ये तर कधी गल्लीतील चौकात एकत्र येवून ऑनलाईन प्रणालीने अभ्यास, चाचण्या पूर्ण करतांना दिसत होते.
शिक्षक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अध्यापन अधिक रंजक आणि दर्जेदार करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थी याच डिजिटल साधनांचा वापर करून आपले अध्यापन सुकर करताना आढळून येत आहे.
राज्यामधील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ अधिक सक्रीय होऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचेमार्फत राज्यातील २,८९,५६० शिक्षक हे तंत्रस्नेही झाल्याचे आढळून आले आहे.
या शिक्षकांनी फक्त आपापले वर्गच ऑनलाईन घेतलेले नाहीत तर स्वतःच्या विद्यार्थ्यांनाही तंत्रस्नेही केलेले आहे.
ज्यामुळे आज राज्यातील विद्यार्थी स्वतः डिजिटल साहित्य तयार करून आपले शिक्षण मनोरंजक करत आहेत, इतर देशातील शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी ऑनलाईन संवाद साधून विविध साहित्य वापरत आहेत.
उदा. शैक्षणिक व्हिडीओ, मनोरंजक खेळ, AI/AR/VR वापर करून बनविलेले ई-साहित्य, कृतियुक्त PDF, आनंददायी PPT, पोस्टर्स, प्रमाणपत्रे आदी.
त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्यापन करत असताना शिक्षकांमार्फत बनवले गेलेले ई-साहित्य हे जास्त परिणामकारक असल्याचे दिसून येते.
ALSO READ THIS

शासन निर्णय

शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी, यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजित करण्यात येत आहे.

शिक्षकांनी आपले तयार केलेले व्हिडीओ आपल्या गुगल ड्राईव्ह (Google Drive) ला अपलोड करावे.

Anyone with link करून Editor त्याचा Access हा ठेवावा व सदरची लिंक ही उपलब्ध देण्यात येणाऱ्या प्रणालीवर अपलोड करण्यात यावी.

परितोषिक-

FOR MORE INFO

उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष-

व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा. लिंग समभाव, शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आशय असावा.
#व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.
*व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.
निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.
व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.
शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल.
आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी.
आवाज आरोह- अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा.
जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे.
बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.

सदरच्या स्पर्धेचा तपशील खालीलप्रमाणे

व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी-

शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे.वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक
#व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा.व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत.
व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.
घटक व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.
व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.व्हिडीओ फॉरमॅट MP4 असावा.
#व्हिडीओ मध्ये कुठेही स्वताच्या समाज माध्यमांची, व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी, उल्लेख नसावा.
#व्हिडीओ मधील मजकूर व आशयाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे, याची नोंद घ्यावी.
🎞️ व्हिडिओ हा स्वतः तयार केलेला असावा. copyright che पालन करणे आवश्यक
गट व विषय
1.1 ली व 2 री- भाषा,गणित, इंग्रजी.
2.3 री ते 5वी- भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास
3.6 वी ते 8वी- भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान,सामाजिक शास्त्र
4.9वी ते 10वी- भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र
5.11वी व 12वी- भाषा, गणित, इंग्रजी,विज्ञान,सामाजिक शास्त्र
6.अध्यापक विद्यालय- भाषा, गणित, इंग्रजी ,विज्ञान, सामाजिक शास्त्र, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडित आधुनिक विचार प्रवाह
व्हिडीओ प्रकार:-
स्वतः बनवलेले व्हिडिओ
स्वतः animeted केलेले व्हिडिओ
स्क्रीन रेकॉर्ड करून तयार केलेले व्हिडिओ वर्चुअल रियालिटी वर आधारित व्हिडिओ
खेळावर आधारित व्हिडिओ चाचणी वर आधारित व्हिडिओ
शासन प्रणालीवर बोलीभाषेतून तयार केलेले व्हिडिओ
दिव्यांगप्रकरणानुसार अध्ययनासाठी तयार केलेले व्हिडिओ
#instagram video download
#facebook video download
#youtube video download
#video making 2023
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा
2023 Maha Video contest 2023 for teacher
शासन निर्णय डाऊनलोड करा.

Author: Active Guruji

Blogger

One thought

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.