Ramai Bhimrao Aambedkar | २३.रमाई भीमराव आंबेडकर

Ramai Bhimrao Aambedkar

२३वा पाठ – इयत्ता तिसरी– Ramai Bhimrao Aambedkar,रमाबाईंचे जीवन,रमाई भीमराव आंबेडकर

रमाई भीमराव आंबेडकर – Ramai Bhimrao Aambedkar पाठावर स्वाध्याय – टेस्ट 

रमाई भीमराव आंबेडकर पाठाचा  सार –

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भिमराव आंबेडकर यांच्या जीवन कर्तृत्वाचा आढावा या पाठात घेतला आहे.

एका वाक्यात उत्तरे-

प्रश्न-१) रमाबाईंना कोणी लिहायला-वाचायला शिकवले?

उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईंना लिहायला वाचायला शिकवले.

प्रश्न-२) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी कुठे गेले होते?

उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते.

प्रश्न-३) रमाबाईंचे संपूर्ण जीवन कसे गेले?

उत्तर- स्वतःची स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व दलित समाजाच्या उज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी रमाबाईंचे संपूर्ण जीवन गेले.

प्रश्न-४) बाबासाहेबांनी वसतिगृहे का काढले?

उत्तर- पददलितांच्या स्वावलंबन ,स्वाभिमान व आत्म उद्धार व्हावा म्हणून बाबासाहेबांनी वस्तीगृहे काढली.

प्रश्न-५) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो?

उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो .

प्रश्न-६) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला?

उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन दलित समाजासाठी व त्यांना मानसन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला.

दीर्घोत्तरी प्रश्न

प्रश्न-१) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात?

उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी खूप परीश्रम घेतले.Therefor म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.

प्रश्न-२) रमाईंना वस्तीगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले?

उत्तर- रमाईंना वस्तीगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसताच लगेच त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या वस्तीगृह प्रमुखाकडे दिल्या. त्या मोडून त्यातून अन्नधान्य खरेदी केले.so पुढील काही दिवस पुरेल एवढे धान्य भरून ठेवले.

प्रश्न सोडवा.

प्रश्न-१) लिंग बदला.

१) पती-पत्नी, २) सासरा -सासू, ३) दीर-भावजय,४) विधुर-विधवा, ५) वडील-आई,६) अध्यक्ष -अध्यक्षा.

प्रश्न-२) विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर- अन्याय  * न्याय , अपमान  * मान ,लक्ष * दुर्लक्ष , जन्म  * मृत्यू , पुढे * मागे.

प्रश्न-३) अनेकवचन लिहा.

उत्तर- मोटार – मोटारी, सायकल -सायकल, इमारत – इमारती, रस्ता – रस्ते ,पट्टा – पट्टे ,गाडी – गाड्या.

प्रश्न-४) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१) रमाबाईंचा जन्म दापोली तालुक्यातील —–येथे झाला. ( वणंदगाव )

२) रमाबाईंना——मूर्ती संबोधले जाते. (कारुण्याची)

३) रमाबाईं दीन दलितांच्या ——-व ———-सावली झाल्या. (आई व सावली)

४) रमाबाईंच्या घरची परिस्थिती अत्त्यंत ——होती. ( गरिबीची)

Solve Test….

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.