Nakhvadada Nakhvadada
नाखवादादा कविता- इयत्ता चौथी मराठी –Nakhvadada
नाखवादादा नाखवादादा-Nakhvadada Nakhvadada – कवितेवर स्वाध्याय-टेस्ट
या कवितेत वसुधा पाटील यांनी एक लहान मुलगा नाखवादादाला होडीतून खाडीच्या पलिकडे न्यायला विनवीत आहे असे वर्णन केले आहे. खाडीच्या पलिकडील डोंगरावरच्या निसर्ग दृश्याचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
Nakhvadada Nakhvadada कवितेचा अर्थ-
एक मुलगा नाव नावाडी दादाला म्हणतो ,अहो ‘नाखवादादा मला खाडीच्या पलिकडे न्याल का? नाखवादादा त्याला विचारतात, अरे सोन्या यावेळी खाडीच्या पलिकडे तुझे काय (what) काम आहे?
मुलगा म्हणतो खाडीच्या पलिकडे उंच डोंगर आहे. त्या डोंगरावर हिरवे रान आहे. सकाळची कोवळी उन्हे जेव्हा त्या माळरानावर पडतात तेव्हा so ते रान सुंदर दिसते. हिरव्या राना मध्ये पांढरीशुभ्र ससे आहेत. त्यांचे डोळे खूप लाल आहेत. फुलाफुलांवर सोनेरी रंगाची फुलपाखरे बागडतात. पक्षीसुद्धा फुलांना फुलपाखरां बरोबर आपले पंख पसरून उनात नाहतात.
पानापानावर दवबिंदूंचे लाखो हिरे चमकत आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात आभाळाचे निळे पंख झगमगत आहेत. आभाळात मिळणारे रंगीत ढग तरंगत आहेत. ढगांमध्ये इंद्रधनुष्य उमटले आहे. इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके खेळ खेळत मला खाडीची शोभा पाहायचे आहे?
हो नाखवादादा, नाखवादादा,’ मला खाडीच्या पलीकडे न्याल का?
यावर नाखवादादा सोन्याला म्हणाले ,’अरे ,माझ्या सोन्या सोनेरी कवडसा तुला खाडी पलीकडे न नेऊन मला चालेल काय.
एका वाक्यात उत्तरे-
प्रश्न-१) नाखवादादा या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे?
उत्तर- नाखवादादा या कवितेत एक लहान मुलगा नावाड्याशी बोलत आहे.
प्रश्न-२) या कवितेतील मुलाला नाखवादादा कोणत्या नावाने हाक मारतो?
उत्तर- या कवितेतील मुलांना नाखवादादा सोन्या या नावाने हाक मारतो.
प्रश्न-३) हिरव्या रानात कोण आहे?
उत्तर- हिरव्या रानात पांढरीशुभ्र ससे आहेत.
प्रश्न-४) पानापानात कोण लपले आहे?
उत्तर- पानापानात दवबिंदू लपले आहेत.
प्रश्न-५) मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत?
उत्तर- मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत.
प्रश्न-६) नाखवादादा शेवटी मुलाला काय म्हणतो?
उत्तर- हे सोनेरी कवडश्या, तुला खाडी पलीकडे न नेऊन कसे चालेल ?असे नाखवादादा शेवटी मुलाला म्हणतो.
प्रश्न सोडवा.
प्रश्न-१) समानार्थी शब्द लिहा.
१) ढग – मेघ ,२) पक्षी – पाखरू, ३) ऊन – सूर्यप्रकाश ,४) रान – वन, ५) आभाळ – आकाश ,६) डोंगर – पर्वत, ७) झोका – झुला
प्रश्न-२) इंद्रधनुष्यातील रंग लिहा.
उत्तर- तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा,पारवा ,जांभळा.
Solve Test
Sir mala pan aavdli ahe tesat sodvayla Atharv kumbhar Adarsha shalya badlpur
Mala test aavdli
घरी राहूनही खूप छान टेस्ट देत येतेय
सर मलाही test. आवडली
Test mala sodwayla aavdali
Khup chan ani sopi hoti
Sir mala test aavdli.☺😊👍👌📖
VA Sir 👌😊☺👍
Mala test aavdli.👌👌👍☺😊👌👍☺😊👌
Mala test aavdli.☺👌👍👌😊👌☺👌👍👌
नमस्ते सर, आपला हा उपक्रम स्तुत्य आहे.
साईराज प्रकाश गायकवाड