Idgah | पाठ-९) ईदगाह | इयत्ता चौथी-स्वाध्याय

Idgah

पाठ – ९) ईदगाह ,इयत्ता चौथी –स्वाध्याय

इयत्ता चौथी मराठी पाठ.९)ईदगाह – Idgah या कवितेवरील आधारित टेस्ट व स्वाध्याय सोडवा.

मराठी,पाठ९.ईदगाह,

idgah
idgah

ईदगाह- (idgah )-

छोट्या हमीदला त्याच्या अमीना आजीने ईदगाहला (idgah) तीन पैसे दिले. सगळी मुले मिठाई ,खेळणी खरेदी करत असताना अमितने चिमटा खरेदी केला. स्वयंपाक करताना आजीचे हात भाजतात म्हणून hence त्याने चिमटा खरेदी केला. so आजीने प्रेमाने हमीदला कुशीत घेतले.
अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

प्रश्न-1) गावात कशाची गडबड चालली होती?

उत्तर- गावात ईदगाहची गडबड चालली होती.

 

प्रश्न-2) मुलाचा आनंद का उतू चालला होता?

उत्तर- ईदगाहला जायचे म्हणून मुलांचा आंनद उतू चालला होता.

 

प्रश्न-3) हमीदच्या घरी कोण कोण होते?

उत्तर- हमीदच्या घरी फक्त अमिनाआजी होती.

 

प्रश्न-4) नमाज संपल्यावर लोक काय काय करतात?

उत्तर- नमाज संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारतात.

 

प्रश्न-5) अमीनाने दिलेल्या पैशातून हमीदने काय घेतले?

उत्तर- अमिनाने दिलेल्या पैशातून हमीदने एक चिमटा खरेदी केला.

 

प्रश्न-6) महमुदने कोणते खेळणे खरेदी केले?

उत्तर- महमूदने शिपाई खरेदी केला.

 

प्रश्न-7) पाणक्या कोणी खरेदी केला?

उत्तर- पाणक्या मोहसीनने खरेदी केला.

 

प्रश्न-8) हमीद कोणत्या आनंदात होता?

उत्तर- अब्बाजान पिशव्या भरून पैसे आणतील व अम्मिजान अल्लाहच्या घरून त्याच्यासाठी खूप छान गोष्टी आणतील अशा विश्वास असल्याने हमीद आनंदात होता.

 

दीर्घोत्तरी प्रश्न-

१) ईदच्या दिवशीची सकाळ कशी होती?

उत्तर:- ईदच्या दिवशीची सकाळ रम्य व सुंदर आहे. झाडे हिरवीगार आहेत.शेतात पिके डोलत आहेत. आकाश लालेलाल झाले आहे. सूर्य सुंदर दिसतो आहे. जणू तो सर्वांना ईदच्या शुभेच्छा देत आहे. गावात ईदगाहला जाण्याची गडबड सुरू आहे. मुलांना खूप आनंद झाला आहे.

 

२) ईदच्या दिवशी मुलांचा आनंद कसा आहे?

उत्तर- मुलांना ईदच्या दिवशी निघाला जायची घाई झाली आहे. जो तो आपापल्या वडिलांबरोबर निघाला चालला आहे. मुले कधी धावत धावत पुढे जायची. कधी झाडाखाली उभे राहून इतरांची वाट पाहायची.नमाजानंतर खेळणी घ्यायला जाणार म्हणून मुले आनंदात आहेत.

 

३) ईदची प्रार्थना कशी चालते त्याचे वर्णन करा?

उत्तर- चिंचेच्या गर्द सावलीत फरशीवर जाजम अंथरलेले असते. रोजे करणार्‍यांच्या लांबलचक रांगा लागल्या असतात. जो तो येतो मागे उभा राहतो. नमाज पडताना सर्व समान असतात. सगळे एकदम खाली वागतात. गुडघे टेकतात. प्रार्थनेचे हे दृश्य छान दिसते. नमस्ते संपल्यावर लोक एकमेकांना मिठी मारून भेटतात.

 

४) ईदगाह जवळच्या मेळ्यात हमीदने काय काय मौज केली?

उत्तर:- नमाज संपल्यावर मुले मेळ्याकडे धावली. मेळ्यात हत्ती, घोडे and उंट असलेली चक्र होती. महमूद ,मोशीन, नूर व सम्मी हे मित्र चक्रावर बसले. नंतर सारे खेळण्याच्या दुकानात कडे गेले. महमूदने शिपाई घेतला. तर मोहसीन ने पाणक्या खरेदी केला. नंतर ते मिठाईच्या दुकानात आले. कोणी गुलाबजाम तर कोणी जिलेबी व करंजी घेऊन खात होते. अशी हमीदच्या मित्रांनी मौज केली.

 

५) हमीदने आणलेला चिमटा पाहून अमिना आजीला काय वाटले?

उत्तर- हमीद जत्रेतून घरी आला तेव्हा अमीना आजीने त्याला कडेवर घेतले. त्याच्या हातातला चिमटा पाहून आजी दुःखी झाली. मेळ्यात न खाता-पिता याने चिमटा का आणला असे तिने विचारले. आजीचे हात स्वयंपाक करताना भाजू नयेत म्हणून हा चिमटा आणला हे कळताच तिचा राग गेला. तिचे मन भरून आले. तिला रडू कोसळले. पदर पसरून तिने हमीदला आशीर्वाद दिला.

Solve Test…..

Author: Active Guruji

Blogger

6 thoughts

  1. This Idgah , lesson is from Indian or Pakistani book? Why Non Muslim children have to learn about Islam? It does not enrich but sows the seed of wrong things. It’s unhealthy to teach wrong things. Hope some educated and unbiased experts are hired and not pro-muslim

  2. प्रगती पंडित खंडागळे

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.