Dhadshi Hali | चौथी मराठी पाठ10 | धाडशी हाली

Dhadshi Hali

चौथी मराठी, पाठ10) धाडशी हाली-Dhadshi Hali,online test-पाठाचा स्वाध्याय

ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील आदिवासी पाड्यात राहणाऱ्या हाली बरफ या मुलींनी आपल्या बहिणीला वाघाच्या तावडीतून सोडविले. या धाडसाबद्दल हालीला ‘वीर बापूराव गायधनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या पाठात प्राध्यापक जयंत पाटील यांनी Dhadshi Hali ची मुलाखत घेतलेली आहे.

प्रश्न-१) हालीला कोणता पुरस्कार मिळाला?

उत्तर- हालीला वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार मिळाला.

प्रश्न-२) हाली लाकडे गोळा करायला कुठे गेली होती?

उत्तर- खाली लाकडी गोळा करायला जंगलात गेली होती.

प्रश्न-३) हालीच्या बहिणीवर कोणी हल्ला केला?

उत्तर- हालीच्या बहिणीवर वाघाने हल्ला केला.

प्रश्न-४) हालीला दिल्लीला जाण्यासाठी कोणी मदत केली?

उत्तर-हालीचा मामा, गावचे लोक, शहापूरचे लोक व गावचे शिक्षक यांनी हालीला दिल्लीला जाण्यासाठी मदत केली.

प्रश्न-५) हालीने कोणता संदेश दिला?

उत्तर- न घाबरता लोकांना वाचवले पाहिजे असा संदेश हालीने दिला.

प्रश्न-६) हाली शाळेत का गेली नाही ?

उत्तर- कुटुंब मोठे व घरची गरिबी यामुळे हाली शाळेत गेली नाही.

प्रश्न-७) दिल्लीला हालीच्या सोबत कोण गेले?

उत्तर-दिल्लीला हालीच्या सोबत तिची आई व मामा गेले.

दीर्घोत्तरी प्रश्न-

प्रश्न-१)  हालीने दाखविलेल्या धाडसाचे वर्णन करा.

उत्तर- हाली तिच्या बहिणी सोबत जंगलात लाकडे गोळा करायला गेली होती. so तेव्हा एका वाघाने हालीच्या धाकट्या बहिणीवर हल्ला केला. हे पाहताच प्रथम थोडी घाबरी झाली पण whenever ती डगमगली नाही तिने आरडाओरडा करून लोकांना बोलावले. मोठमोठे दगड वाघाच्या अंगावर फेकले. वाघ पळून गेला. अशा प्रकारे हालीने धाडस दाखवले.

प्रश्न-२) हालीला वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार का मिळाला?

स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवणार्‍या मुला-मुलींना वीर बापूराव गायधनी शौर्य पुरस्कार दिला जातो. हालीने न डगमगता वाघाशी झुंज दिली and आपल्या बहिणीचा प्राण वाचवला.hence म्हणून तिला वीर बापूराव गायधनी पुरस्कार मिळाला.

विरुद्धार्थी शब्द लिहा.

अंधार * प्रकाश, धाडसी * भित्रा , उलट * सुलट, चांगला * वाईट , लहान * मोठा, गरीब * श्रीमंत

लिंग बदला.

वाघ – वाघीण , मुलगी – मुलगा , भाऊ – बहीण, हत्ती – हत्तीण

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

१) गायब होणे – अदृश्य होणे.

२) गौरव करणे – सन्मान करणे.

३) वावर असणे – फिरणे.

४) खडानखडा माहिती असणे – संपूर्ण माहिती असणे.

५) संवर्धन करणे – काळजीपूर्वक वाढवणे.

६) झुंज देणे – लढणे.

७) धाडस दाखवणे – हिंमत दाखवणे.

८) मोलमजुरी करणे – कष्टाची कामे करून पैसे मिळवणे.
Solve Test…

Author: Active Guruji

Blogger

2 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.