Learn from Home
Learn from Home,मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा ?
लक्ष्मण जगताप, बारामती
दरवर्षी १५ जूनला सुरू होणाऱ्या शाळा कोरोनामुळे बंद आहेत. सध्या शाळेचे वर्षे सुरू झाले आहे तरी अशा परिस्थितीतही शासनाने शाळांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहचविण्याची व्यवस्था केली आहे.
शाळांनी या पुस्तकांचे वाटप करून मुलांना आणि पालकांना खूप मोठा दिलासा दिला आहे. काम करणारी सरकारी यंत्रणा यासाठी निश्चित कौतुकास पाञ आहे.

शाळा सुरू होईपर्यंत मुलांना घरीच अॉनलाईन अभ्यास करावा लागणार आहे.
अनेक शाळा अॉनलाईन पद्धतीने मुलांना अभ्यास देत आहेत. मुलांवर कोणताही ताण न येऊ देता अभ्यास व अभ्यासापूरक इतर काही गोष्टी करून घ्याव्यात.
तसेच घरात असणाऱ्या महिला-पालक किंवा मोठे बहिण-भाऊ यांनी आपले काम पाहून काही वेळ मुलांसाठी द्यावा.
अभ्यास कसा घ्यायचा ?
*मुलांचे अभ्यासाचे वेळापञक बनवावे.मुलांचे अभ्यास ,जेवण ,खेळ व विश्रांती यांच्या वेळा निश्चित ठरवा.
*अभ्यासाठी मुलांचा कल पाहून दिवसभरात अभ्यास पूर्ण करुन घ्यावा.
*मुलांना रागावू नका. चिडू नका. जरा धीराने घ्या .
*मुलांना सोपे प्रश्न विचारुन बोलते करावे.
*लेखनाच्या सवयीत खंड पडू नये यासाठी सुंदर व वळणदार अक्षरात काही ओळी लिहून घ्याव्यात.
*अभ्यासाचा कंटाळा आल्यावर मुलांना काही वेळ स्वच्छतेचे नियम पाळून खेळू द्यावे.
*त्यांच्या आवडीची कोणतीही चित्रे काढू द्यावीत.
*ठराविक वेळेतच मोबाईलवर शैक्षणिक व्हिडीओ पालकांच्या देखरेखेखाली पाहू द्यावेत.
*गणितामधील संख्यावाचन तसेच बेरीज वजाबाकी इत्यादी सारख्या मूलभूत क्रियांचा सराव घ्यावा.नाणी नोटा प्रत्यक्ष हताळू द्याव्यात.
*त्यांच्या आवडीची गाणी, कविता गायला सांगावीत.
*गोष्टींची पुस्तके वाचण्यास देऊन आठवड्यातून एक दिवस घरातील सर्वांसमोर गोष्ट सांगण्याची संधी द्यावी.
*घरात मोकळ्या वेळेत शब्दभेंड्या ,पाढे पाठांतर ,स्पेलिंग पाठांतरासारखे खेळ घेऊन हसत खेळत अभ्यास घेता येईल.
*घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून काही वस्तू तयार करता येतील.उदा.कागदकाम ,शिवणकाम ,मातकाम इ.
*पाणी भरणे ,भाजी निवडणे ,इ.शक्य असलेली छोटी घरगुती कामे करण्याची सवय लावा.
*अभ्यासाबरोबर मुले आनंदी राहतील याकडे लक्ष द्या.
👌👌
My name is Kaveri jadhav
Sir your reply?
Hi Sir my name is yash kulkarni and number is 7620000831.
I Sir my name is yash kulkarni
👌👌👌👌👌👌👌
Satish
Rishabh khopade