Gurupournima | गुरुपौर्णिमा महत्व

Gurupournima

गुरुपौर्णिमा महत्व –

गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा होय. Gurupournima Special Gift….

Gurupournima
Gurupournima

महर्षी व्यास यांना  स्मरण करण्याचा दिवस. आपल्या गुरूच्या गुरुदक्षणेसाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जाते.

प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत गुरु शिष्याची खूप मोठी परंपरा आहे. म्हणून गुरूला खूप आदराचे स्थान आहे .

पौराणिक कथांमध्ये गुरुमहिमा वर्णन केलेला आहे. गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होवू शकत नाही.

आपल्यातील अज्ञानरुपी अंधःकार दूर करुन ज्ञानरुपी  ज्योत प्रकाशमान करण्याचे कार्य गुरु करतात.

gurupounima

व्यक्तीचा पहिला गुरु म्हणजे आई.जन्म दिल्यापासून ते शेवटपर्यंत आई गुरुची भूमिका पार पाडते. बोलायला शिकण्यापासून ते उभे राहण्यापर्यंतचे सर्व शिक्षण आईच्या मार्गदर्शनाने होते.

आई आपल्या लेकराला आयुष्यभर शिकवत असते. एक आई काय करु शकते याचे उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ.

माँसाहेबांनी आई शिवरायांच्या रुपाने एक कर्तृत्ववान राजा आपल्याला घडविला. म्हणूनच आईच्या गुरुपणाची थोरवी गाताना म्हणतात-  ‘आई माझा गुरू  ! आई कल्पतरु’

आईच्या मार्गदर्शनाखाली अनौपचारिक शिक्षणाचा सुरू झालेला प्रवास शाळेच्या टप्यावर येऊन पोहचतो. शाळा नावाच्या शिक्षण व्यवस्थेत मग गुरुचे स्थान शिक्षकांना मिळतेआणि हा प्रवास असाच पुढे सुरू राहतो. या मार्गात विविध टप्प्यात अनेक नावे धारण केलेले गुरु भेटतात.
ते म्हणजे गुरुजी बाई,सर, मॕडम.परंतु यातील गुरुजी नावाला एक मायेचा ओलावा व जिव्हाळ्याचा पदर असतो. त्या पदराखाली घेऊन  गुरुजी शिकवत असतात. म्हणून,
आमचे गुरुजी …आमचे सर..असे शब्द उच्चारुन बघा. कोणत्या -which शब्दांत आपलेपणाचा गोडवा वाटतो. हे आपल्या लक्षात येईल.
पण काळ बदलला तशी शिक्षण व्यवस्था बदलली गुरुजींची जागा सरांनी आणि therefor बाईंची जागा मॕडमने घेतली. पाश्यात्यांच्या अनुकरणाने झालेला हा सगळा बदल.
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुंचे स्मरण होते.
गुरू आपल्या शिष्याला चांगल्या वाईटाची जाणीव करुन देतात. शिष्याला जीवनाचा योग्य मार्ग दाखवितात. त्याच्या जीवनाची नौका भरकटू नये यासाठी ज्ञानाची शिदोरी देतात.व त्याचा जीवन प्रवास सुखकर करतात.
माझ्या शिष्याचे कल्याण व्हावे याचा अखंड जप करतात. एखाद्या शिष्याच्या कार्य कर्तृत्वाचा सुगंध आसमंतात दरवळतो .त्यावेळी गुरु भरुन पावतो.त्याच्या आनंदाला उधाण येतं.इतकी ताकद गुरु शिष्य नात्यात आहे. hence म्हणून गुरुविना आपले जीवन अधुरेच असते.
गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,
पुढे चालवू आम्ही हा वारसा,


गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
अशा सुंदर शब्दांत गुरु -शिष्य नात्याचे गोडवे गायले आहेत. गुरु आपल्या जीवनाची मशागत करतो. संस्कारांचे खतपाणी देऊन त्याला सुंदर फुलवितो.
गुरुच्या आशीर्वादाशिवाय  यशप्राप्ती होऊ शकत नाही.आई वडील ,शिक्षक and पुस्तक यांच्याबरोबर निसर्गही आपला गुरु असतो.
तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल तर योग्य मार्गावर आणण्याचे काम आपले गुरु  करतात.
गुरु म्हणजे एक प्रकारचा परीसच असतो. so त्याच्या स्पर्शाने शिष्याच्या आयुष्याचे सोनं होतं.
गुरु द्रोणाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन सारखा श्रेष्ठ धर्नुधारी तयार झाला.आजच्या काळातील रमाकांत आचरेकर यांच्या सारखे गुरु मिळाले म्हणून सचिन तेंडुलकर सारखा महान खेळाडू घडला.
अशा कितीतरी गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले आहे.
hence या गुरुपौर्णिमेच्या दिनी आई-वडील, शिक्षक आणि निसर्ग या महान गुरुंना वंदन करुया.
लेखन-
श्री.लक्ष्मण जगताप सर,
बारामती

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.