18-हिवाळा
मराठी ,बालभारती
इ.2री
१) डोंगराच्या पलीकडे काय जळत आहे ?
उत्तर- डोंगराच्या पलीकडे शेकोटी जळत आहे .
२) झाडावर काय डुलत आहे ?
उत्तर- झाडावर पिवळी फुले डुलत आहे .
३) हिवाळ्यात पिकून कोणती फळे पिवळी पडतात ?
उत्तर-हिवाळ्यात पेरू,चिंच व बोरे ही फळे पिकून पिवळी पडतात .
४) हिवाळ्यात कोण उंडारत फिरतो ?
उत्तर-हिवाळ्यात गाईचा गोऱ्हा उंडारत फिरतो .
५) तुला माहित असलेली काही फळांची नावे सांग .
उत्तर- फणस,आंबा,सीताफळ,पेरू,चिकू,केळी .
६) जोड्या जुळव .
१) डोंगराच्या पलीकडे जळणारी शेकोटी – उगवता सूर्य
२) धुक्यामुळे निळसर दिसणारे – डोंगर
३) तळ्यात विरघळणारे – धुके
४) झाडावर डुलणारी – पिवळी फुले
५) पिकून पिवळे झालेले – पेरू
७) उसाला लांब लांब काय लागले आहेत ?
उत्तर- उसाला लांब लांब तुरे लागले आहेत .
८) ‘ उंच’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
उत्तर – उंच * बुटका
९ ) चिंचेची चव कशी असते ?
उत्तर – चिंचेची चव आंबट असते.
फारच सुंदर
कशिश आनंद बोराडे
खुपच छान उपक्रम