दिनदर्शिका | दुसरी-मराठी

दिनदर्शिका 

दुसरी-मराठी

 १) वर्षाचे महिने किती ?

उत्तर- वर्षाचे महिने बारा असतात.

२) ऑगस्ट महिन्याचे दिवस किती ?

उत्तर- ऑगस्ट महिन्याचे दिवस ३१ असतात.

३) २६ जानेवारीला काय म्हणतात?

उत्तर- २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणतात.

४) मराठी महिन्यांची नावे सांगा.

उत्तर- चैत्र,वैशाख,जेष्ठ,आषाढ,श्रावण,भाद्रपद,आश्विन,कार्तिक,मार्गशीर्ष,पौष,माघ,फाल्गुन.

५) ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

उत्तर- स्वातंत्र्य × पारतंत्र्य

६) वचन बदला.

महिना   –    ?

उत्तर-  महिना  – महिने

७) सर्वात कमी दिवस कोणत्या महिन्यात असतात?

उत्तर- फेब्रुवारी

८) आपला स्वातंत्र्यदिन कोणत्या महिन्यात येतो?

उत्तर- आपला स्वातंत्र्यदिन ऑगस्ट महिन्यात येतो.

९) दिनदर्शिकेत काय काय असते?

उत्तर- दिनदर्शिकेत सण,उत्सव,थोर नेते जयंती व पुण्यतिथी यांची माहिती असते.

१०) तुला उन्हाळी सुट्टी कोणत्या महिन्यात असते?

उत्तर- जून

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.