Aso tula deva majha
असो तुला देवा माझा, प्रार्थना
मराठी प्रार्थना ,असो तुला देवा माझा सदा नमस्कार ! (marathi prarthna), aso tula deva majha..असो तुला देवा माझा सदा नमस्कार lyrics

असो तुला देवा माझा
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
अधिक माहिती
जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
सामान्यज्ञान – येथे क्लिक करा
5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा
13 thoughts