8 Jully | 8 जुलै दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

8 Jully

8 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– शनिवार

दिनांक- 08/07/2023, 8 Jully

मिती- आषाढ कृ.6

शके– 1945

सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.

म्हणी व अर्थ – पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.

वाक्प्रचार- धमाल उडणे – मजा येणे, आनंद वाटणे.
बातम्या-
कोल्हापूर – शाळेचा स्लॅब कोसळून शिक्षक जखमी, पन्हाळा तालुक्यातील घटना
अजित पवारांना अतिरिक्त प्रधान सचिवांचे दालन, शिंदे, फडणवीसांसह सहाव्या मजल्यावर बसणार.
श्रीलंकेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजला २४३ धावांवर गुंडाळले.
मुंबई – पक्ष फोडण्याचे काम हे सरकार करत आहे त्यासाठी आम्ही ताकदीनिशी लढा देऊ – पंकजा मुंडे
कोल्हापुरातील राजाराम बंधारा गेला पाण्याखाली, जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी
कोल्हापूर – मंत्री हसन मुश्रीफांचे जंगी स्वागत, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले शक्तीप्रदर्शन
मुंबई – राज्यातील राजकीय घडामोडींमुळे पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं जाण्याची शक्यता
8 जुलै

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८९ वा किंवा लीप वर्षात १९० वा दिवस असतो.

पंधरावे शतक

  • १४९७ – वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.

विसावे शतक

  • १९१० – क्रांतिकारकांना पिस्तुली पूरवल्यामुळे अटक केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

एकविसावे शतक

  • २०११ – भारतीय रुपयाचे नवीन चिन्ह ( ₹ ) असलेली नाणी भारतीय चलनात आली.

जन्म

  • १८३९ – जॉन डी. रॉकफेलर, अमेरिकन उद्योगपती.
  • १८९५ – इगोर टॅम, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०८ – वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
  • १९०८ – नेल्सन रॉकफेलर, अमेरिकेचा ४१वा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९१४ – ज्योती बसू, बंगाली राजकारणी.
  • १९१६ – गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.
  • १९५८ – नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९७२ – सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – अनास्ताशिया मिस्किना, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू

  • ८१० – पेपिन, इटलीचा राजा.
  • ९७५ – एडगर, इंग्लंडचा राजा.
  • ११५३ – पोप युजीन तिसरा.
  • १६२३ – पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १८२२ – पर्सी बिशे शेली, इंग्लिश कवी.
  • १८५९ – ऑस्कार पहिला, नॉ़र्वे आणि स्वीडनचा राजा.
  • १९३० – सर जोसेफ वॉर्ड, न्यू झीलंडचा १७वा पंतप्रधान.
  • १९७३ – विल्फ्रेड ऱ्होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७९ – सिन-इतिरो-तोमोनागा, नोबेल पारितोषिक विजेता जपानी भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९७९ – रॉबर्ट बी. वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९९४ – किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९९ – पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
  • २००१ – उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ||
जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।।
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

बैल आणि बेडूक 
एके दिवशी बेडकाची मुलं खेळता-खेळता तलावाच्या बाहेर गेले. ते तलावाच्या नजीकच्या गावात जाऊन पोहोचले त्यांनी तिथे एक बैलाला बघितले. त्या बैलाला बघतातच त्यांना खूप आश्चर्य झाले.
या पूर्वी त्यांनी एवढे मोठे प्राणी बघितले नव्हते. त्या बैलाला बघून ते फार घाबरले. ते आश्चर्याने त्या बैलाला बघत होते तो आरामात गवत खात होता. गवत खाताना त्या बैलाने जोरात आवाज काढला.
बेडकाची मुलं घाबरून तिथून पळाली आणि तलावात येऊन लपून बसली. त्यांना घाबरलेले बघून त्यांच्या वडिलांनी घाबरण्याचे कारण विचारले.
तेव्हा त्यांनी घडलेले सर्व सांगितले आणि त्यांनी इतका मोठा प्राणी बघितला असे सांगत होते. त्यांना वाटत होते की तो बैलच खूप ताकतवर आहे आणि असं त्यांनी बोलून देखील दाखवले. हे ऐकतातच बेडकाचे अहंकार दुखावले गेले .
त्याने गर्वाने छाती फुगवून आपल्या मुलांना विचारले की “एवढा मोठा प्राणी होता का तो ?” त्याच्या मुलाने म्हटले की ” हो तो तुमच्या पेक्षा अधिक मोठा प्राणी होता. “
आता मात्र बेडकाला राग आला आणि त्याने अधिक छाती फुगवून विचारले ” की एवढा मोठा होता का तो प्राणी ? ” मुलांनी सांगितले की, हे तर काहीच नाही या पेक्षा देखील मोठा होता तो.”
असं ऐकल्यावर त्याने अजून स्वतःला फुगवायला सुरू केले असं करता करता अचानक त्याचे शरीर फुग्यारखे फाटले आणि त्याला खोट्या गर्वामुळे स्वतःचे प्राण गमवावे लागले.
तात्पर्य – कधीही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. गर्व केल्याने स्वतःचे नुकसान होतात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
 ~प्रेम धवन

बालगीत

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…
गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) एका तासाचे किती मिनिटे होतात ?
उत्तर = ६० मिनिटे
२) एका मिनिटाचे किती सेकंद होतात ?
उत्तर: ६० सेकंद
३) एका तासाचे किती सेकंद होतात ?
उत्तर: ३६०० सेकंद
४) घड्याळातील मोठा काटा काय दाखवतो ?
उत्तर : मिनीट
५) घड्याळातील लहान काटा काय दाखवतो?
उत्तर : तास

ENGLISH QUESTION

1) Which is the national bird of India?
Ans : Peacock
2) Which is the state bird of Maharashtra?
Ans : Green Pigeon
3) Which bird flies the highest in the sky?
Ans : Kite
4) Who is called the king of birds?
Ans : Eagle
5) Which is the fastest bird on land?
Ans : Ostrich

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#8 jully, 8 jully 2023, 8 jully 2021 panchang, 8 jully 2022 special day, 8 jully 2023 weather, 8 jully 2022 panchang in hindi, 8 jully is celebrated as, what is celebrated on 8 jully, 8 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.