7 June
7 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, दैनंदिन परिपाठ
7 जून ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५८ वा किंवा लीप वर्षात १५९ वा दिवस असतो.
JUNE
ठळक घटना आणि घडामोड
अकरावे शतक
- १०९९ – पहिली क्रुसेड – जेरुसलेमचा वेढा सुरू.
पंधरावे शतक
- १४९४ – तोर्देसियासचा तह – स्पेन व पोर्तुगालने नव्या जगाची आपसात वाटणी करून घेतली.
सतरावे शतक
- १६९२ – वेस्ट ईंडीझमधील पोर्ट रॉयल, जमैका येथे तीव्र भूकंप. अवघ्या ३ मिनिटांत १,६०० ठार, ३,००० जखमी.
एकोणिसावे शतक
- १८३२ – कॅनडात आलेल्या आयरिश नागरिकांच्या द्वारे कॉलेराचा प्रादुर्भाव सुरू झाला. ६,००० मृत्यूमुखी.
- १८६२ – अमेरिका व युनायटेड किंग्डमने गुलामांच्या व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला.
- १८६३ – फ्रेंच सैन्याने मेक्सिको सिटी जिंकले.
- १८६६ – आयरिश वंशाच्या १,८०० लुटारूंनी कॅनडात धुमाकुळ घातला. यानंतर केनेडियन सैन्याने त्यांना परत अमेरिकेत पळवून लावले.
विसावे शतक
- १९०५ – नॉर्वेने स्वीडनशी असलेला संघराज्याचा करार विसर्जित केला.
- १९१७ – पहिले महायुद्ध – मेसेन येथे दोस्त राष्ट्रांच्या सैन्याने पेरलेल्या सुरूंगांच्या स्फोटात १०,००० जर्मन सैनिक मृत्यूमुखी.
- १९३८ – डी.सी.४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
- १९४० – नॉर्वेचा राजा हाकोन सातव्याने देशातून पळ काढला.
- १९४२ – दुसरे महायुद्ध – जपानचे सैनिक एल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु व किस्का बेटांवर उतरले.
- १९४४ – दुसरे महायुद्ध – नॉर्मंडीत जर्मन सैन्याने कॅनडाच्या २३ युद्धबंद्यांना ठार मारले.
- १९४५ – नॉर्वेचा राजा हाकोन सातवा देशात परतला.
- १९४८ – चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.
- १९६५ – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
- १९८१ – इस्रायेलने इराकची ओसिराक परमाणु भट्टी नष्ट केली.
- १९८९ – सुरिनामची राजधानी पारामारिबो येथे डी.सी.८ प्रकारचे विमान कोसळले. १६८ ठार.
- १९९१ – फिलिपाईन्समधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
एकविसावे शतक
- २००१ – युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
- २००४ – शिरोमणी अकाली दल (लॉॅंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
जन्म
- १७६१ – जॉन रेनी, स्कॉटिश अभियंता.
- १८३७ – अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
- १९२८ – जेम्स आयव्हरी, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
- १९२९ – जॉन टर्नर, कॅनडाचा सतरावा पंतप्रधान.
- १९४५ – वुल्फगॅंग श्युसेल, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९५७ – नील रॅडफोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५८ – प्रिन्स, अमेरिकन संगीतकार.
- १९६४ – ग्रेम लॅबरूय, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७४ – महेश भूपती, भारतीय टेनिस खेळाडू.
- १९८१ – ऍना कुर्निकोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.
- १९८१ – अमृता राव, मराठी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
- १३२९ – रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
- १३५८ – अशिकागा तकाउजी, जपानी शोगन.
- १८२१ – ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु, रोमेनियाचा क्रांतीकारी.
- १८४० – फ्रेडेरिक विल्यम तिसरा, प्रशियाचा राजा.
- १९५४ – ऍलन ट्युरिंग ब्रिटिश गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
- १९७८ – रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड नॉरिश, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९९२ – डॉ. स. ग. मालशे, मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक.
- १९९८ – शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
- २००२ – बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.
प्रतिवार्षिक पालन
- सेते ग्युन्यो – माल्टा.
दिनविशेष, सुविचार, प्रार्थना, वाक्यप्रचार , बोधकथा, म्हणी, पसायदान, संविधान, प्रतिज्ञा, बालगीते, देशभक्तीपर गीते, परिपाठ
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा