6 June
6 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, दैनंदिन परिपाठ
6 june हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५७ वा किंवा लीप वर्षात १५८ वा दिवस असतो.
JUNE
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५२३ – गुस्ताफ व्हासाची स्वीडनच्या राजेपदी निवड.
सतरावे शतक
- १६५४ – स्वीडनची प्रोटेस्टंट राणी क्रिस्टीनाने कॅथोलिक पंथ स्वीकारला व राज्य सोडून दिले. तिच्यानंतर तिचा चुलतभाउ चार्ल्स दहावा राजा झाला.
- १६७४- छ. शिवराय मराठा स्वराज्याचे संस्थापक यांचा राज्याभिषेक (शिवराज्याभिषेक दिन)
अठरावे शतक
- १७५२ – मॉस्कोत प्रचंड आग. १८,००० घरे आगीत नष्ट.
एकोणिसावे शतक
- १८०९ – स्वीडनने नवीन संविधान अंगिकारले.
- १८१३ – १८१२ चेयुद्ध – स्टोनी क्रीकची लढाई – जॉन व्हिन्सेन्टच्या नेतृत्वाखाली ७०० ब्रिटिश सैनिकांनी २,००० अमेरिकन सैनिकांचा पराभव केला.
- १८४४ – लंडनमध्ये यंग मेन्स क्रिस्चियन असोसिएशन (वाय.एम.सी.ए.)ची स्थापना.
- १८५९ – ऑस्ट्रेलियात क्वीन्सलॅंड प्रांताची रचना.
- १८६२ – अमेरिकन यादवी युद्ध – उत्तरेने मेम्फिस, टेनेसी जिंकले.
- १८८२ – मुंबईत चक्रीवादळ. १,००,०००हून अधिक ठार.
विसावे शतक
- १९१२ – अलास्कातील नोव्हारुप्टा ज्वालामुखीचा उद्रेक.
- १९१८ – पहिले महायुद्ध – बेलेउ वूडची लढाई.
- १९२५ – वॉल्टर पर्सी क्राइस्लरने क्राइस्लर कॉर्पोरेशनची स्थापना केली.
- १९३३ – अमेरिकेत कॅम्डेन, न्यू जर्सी येथे प्रथम ड्राइव्ह इन थियेटर सुरू.
- १९३४ – अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.
- १९४४ – दुसरे महायुद्ध – डी डे – ऑपरेशन ऑव्हरलॉर्ड या सांकेतिक नावाने ओळखले जाणारी मोहिम सुरू. १,५५,००० दोस्त राष्ट्रांचे सैनिक नॉर्मंडी येथे समुद्रकिनाऱ्यावरून फ्रांसमध्ये घुसले.
- १९६६ – श्यामवर्णीय नागरिकांच्या नागरी हक्कांसाठी मिसिसिपीत पदयात्रा करणाऱ्या जेम्स मेरेडिथची हत्या.
- १९६८ – आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.
- १९७१ – सोवियेत संघाने सोयुझ ११चे प्रक्षेपण केले.
- १९७१ – दुआर्ते, कॅलिफोर्निया गावाजवळ ह्यूज एरवेस्टचे डी.सी.९ व अमेरिकच्या सैन्याचे एफ.४ प्रकारच्या विमानांमध्ये हवेत टक्कर. ५० ठार.
- १९७४ – स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
- १९८१ – भारताच्या बिहार राज्यात सहार्सा शहराजवळ मध्ये बागमती नदीवरील पुलावर रेल्वे गाडी घसरली. अधिकृत २६८ ठार, ३०० गायब. अनधिकृत आकडा – १,००० ठार.
- १९८२ – इस्रायेलने लेबेनॉनवर आक्रमण केले.
- १९८४ – ऑपरेशन ब्ल्यु स्टार समाप्त. ५७६ ठार, ३३५ जखमी.
- १९९३ – मोंगोलियात सर्वप्रथम राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.
जन्म
- १२३६ – वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान.
- १५०२ – होआव तिसरा, पोर्तुगालचा राजा.
- १७१४ – होजे पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७७२ – मारिया तेरेसा, ऑस्ट्रियाची सम्राज्ञी.
- १८७२ – अलेक्झांड्रा, रशियाची झारिना.
- १८९१ – मारुती वेंकटेश अय्यंगार, कन्नड कवी, कथाकार कादंबरीकार.
- १९०१ – सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९०९ – गणेश रंगो भिडे, अभिनव मराठी ज्ञानकोशकार.
- १९२९ – सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
- १९३० – फ्रँक टायसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९३४ – आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा.
- १९४३ – आसिफ इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९५६ – ब्यॉर्न बॉर्ग, स्वीडनचा टेनिस खेळाडू.
- १९५६ – अँडी पायक्रॉफ्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९५७ – माईक गॅटिंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५९ – ताहिर नक्काश, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- १९६९ – सुनील जोशी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १३९३ – गो-एन्यु, जपानी सम्राट.
- १८६१ – काउंट कॅमियो बेन्सो दि कॅव्हूर, इटलीचा पंतप्रधान.
- १८९१ – सर जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पंतप्रधान.
- १९६१ – कार्ल गुस्टाफ युंग, स्विस मानसशास्त्रज्ञ.
- १९७६ – जीन पॉल गेटी, अमेरिकन उद्योगपती.
- २००२ – शांता शेळके, मराठी कवियत्री.
- २००५ – ऍन बॅन्क्रॉफ्ट, अमेरिकन अभिनेत्री.
प्रतिवार्षिक पालन
- शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक – भारत
- राष्ट्र दिन – स्वीडन.
- क्वीन्सलॅंड दिन – ऑस्ट्रेलिया.
दिनविशेष, सुविचार, प्रार्थना, वाक्यप्रचार , बोधकथा, म्हणी, पसायदान, संविधान, प्रतिज्ञा, बालगीते, देशभक्तीपर गीते, परिपाठ
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा
@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा