6 august | 6 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

6 august

6 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- रविवार

दिनांक- 06/08/2023, 6 ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 6

शके– 1945

सुविचार- हृदयात दोनच शब्द असतात ते म्हणजे आई.

There are only two words in the heart and that is mother.

म्हणी व अर्थ : आधी पोटोबा मग विठ्ठोबा – आधी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.

वाक्प्रचार-  कंठस्नान घालणे – शिरच्छेद करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

 

ऑगस्ट ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१८ वा किंवा लीप वर्षात २१८ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५३८ – गॉंझालो हिमेनेझ दि केसादाने कोलंबियामध्ये बोगोटा शहराची स्थापना केली.

एकोणिसावे शतक

  • १८०६ – शेवटच्या पवित्र रोमन सम्राट फ्रांसिस दुसऱ्याने पदत्याग केला व पवित्र रोमन साम्राज्याचा शेवट झाला.
  • १८२५ – बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १८६१ – ब्रिटनने नायजेरियाचे लागोस शहर बळकावले.
  • १८९० – न्यू यॉर्कच्या ऑबर्न तुरुंगात विल्यम केमलरला विजेचे झटके देउन मृत्युदंड.

विसावे शतक

  • १९०१ – ओक्लाहोमामधील कायोवा जमातीसाठी राखून ठेवण्यात आलेली जमीन श्वेतवर्णीयांना बळकावण्याची मुभा देण्यात आली व त्याद्वारे या जमातीला स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले.
  • १९१४ – पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९१७ – पहिले महायुद्ध – माराशेष्टीची लढाई.
  • १९२६ – हॅरी हुडिनीने पाण्याखाली एका सीलबंद पेटीत ९१ मिनिटे राहून नंतर सुटका करून घेतली.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध – अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर एनोला गे या नावाच्या विमानातून लिटल बॉय नाव दिलेला परमाणु बॉम्ब टाकला. अंदाजे ७०,००० क्षणात ठार तर अजून हजारो पुढील काही वर्षांत भाजल्याने व किरणोत्सर्गाने मृत्युमुखी.
  • १९६० – क्युबाची क्रांती – अमेरिकेने घातलेल्या व्यापारबंदीला उत्तर म्हणून क्युबाने अमेरिकेसह सगळ्या परदेशी बँकाचे राष्ट्रीयीकरण केले.
  • १९६२ – जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६६ – ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.
  • १९९० – पहिले अखाती युद्ध – कुवैत बळकावल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांनी इराकवर व्यापारी बंधने लादली.
  • १९९७ – कोरियन एरलाइन्स फ्लाइट ८०१ हे बोईंग ७४७-३०० प्रकारचे विमान गुआमच्या विमानतळावर उतरताना कोसळले. २२८ ठार.

जन्म

  • ११८० – गो-तोबा, जपानी सम्राट.
  • १६९७ – चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८०९ – आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.
  • १८८१ – अलेक्झांडर फ्लेमिंग, स्कॉटिश जीवशास्त्रज्ञ.
  • १९१६ – दॉम मिंटॉफ, माल्टाचा पंतप्रधान.
  • १९२८ – अँडी वॉरहोल, अमेरिकन चित्रकार.
  • १९७० – एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.
  • १९९० – जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.

मृत्यू

  • २५८ – पोप सिक्स्टस दुसरा.
  • ५२३ – पोप हॉर्मिस्दस.
  • १२७२ – स्टीवन पाचवा, हंगेरीचा राजा.
  • १४५८ – पोप कॅलिक्स्टस तिसरा.
  • १९७३ – फुलजेन्सिओ बॅटिस्टा, क्युबाचा हुकुमशहा.
  • १९७८ – पोप पॉल सहावा.
  • १९९१ – शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
  • २००२ – एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – बॉलिव्हिया, जमैका.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

असो तुला देवा !
माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील
फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील
मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील
सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल
उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल
सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल
पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला
बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची
मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया !
बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

कावळा आणि कोल्हा
एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.
चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.
आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली, त्यासाठी एक युक्ती सुचवली.
कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे.
फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”
कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.
जात असताना कोल्ह्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.
कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील.
व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने‌ ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली.
अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक कळली.
तात्पर्य: कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये. लालच खूप वाईट सवय आहे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव सांगा.
उत्तर : बाबाजीराजे
२)शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव सांगा.
उत्तर : मालोजीराजे
३) शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव सांगा .
उत्तर : शहाजीराजे
४) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा .
उत्तर : जिजाबाई
५) शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव सांगा.
उत्तर : शिवाजी शहाजी भोसले

ENGLISH QUESTION

1) Where does the Crow live?
Ans : Nest
2) Where does the Duck live?
Ans : Water
3) Where does the Cat  live?
Ans : Home
4) Where does the Deer live?
Ans : Forest
5) Where does the Elephant  live?
Ans : Forest

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#6 august, 6 august 2023, 6 august 2021 panchang, 6 august 2022 special day, 6 august 2023 weather, 6 august 2022 panchang in hindi, 6 august is celebrated as, what is celebrated on 6 august, 6 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.