5 june dinvishesh | 5 जून दिनविशेष

5 June

5 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, दैनंदिन परिपाठ

5 june हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५६ वा किंवा लीप वर्षात १५७ वा दिवस असतो.

JUNE



ठळक घटना आणि घडामोडी

पहिले शतक

  • ७० – रोमन सेनापती टायटसच्या सैन्याने जेरुसलेमची फळी फोडली व शहरात घुसले.

चौदावे शतक

  • १३०५ – क्लेमेंट पाचवा पोपपदी.

एकोणिसावे शतक

  • १८३२ – पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांचा उठाव.
  • १८४९ – डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
  • १८६४ – अमेरिकन यादवी युद्ध-पीडमॉंटची लढाई – दक्षिणेचा पराभव.

विसावे शतक

  • १९०० – दुसरे बोअर युद्ध – ब्रिटिश सैन्याने प्रिटोरिया जिंकले.
  • १९०७ – स्वामीनारायण पंथाची स्थापना.
  • १९१५ – डेन्मार्कमध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क.
  • १९१७ – पहिले महायुद्ध – अमेरिकेत सक्तीची सैन्यभरती सुरू.
  • १९२४ – अर्न्स्ट अलेक्झांडरसनने पहिला फॅक्स संदेश स्वतःच्या वडिलांना पाठवला.
  • १९३३ – अमेरिकेने गोल्ड स्टॅन्डर्ड रद्द केले.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सने नॉर्मंडीवर तुफान बॉम्बफेक केली.
  • १९४६ – शिकागोच्या लासाल हॉटेलमध्ये आग. ६१ ठार.
  • १९५९ – सिंगापुरमध्ये सर्वप्रथम सरकारची स्थापना.
  • १९७५ – सहा दिवसांच्या युद्धानंतर सुएझ कालवा पुन्हा खुला.
  • १९७७ – सेशेल्समध्ये उठाव.
  • १९८४ – अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीने मंदिरावर हल्ला करण्याचा आदेश दिला.
  • १९८९ – चीनची राजधानी बिजींगच्या तियेनआनमेन चौकातील चळवळीदरम्यान एका अज्ञात निःशस्त्र व्यक्तीने रणगाड्यासमोर उभे राहून रणगाडा थांबवला. हे छायाचित्र या चळवळीचा मानबिंदू ठरले.

एकविसावे शतक

  • २०१३ – चीनच्या जिलिन प्रांतातील मिशाझी गावात असलेल्या कुक्कुटमांस तयार करण्याच्या कारखान्यात आग लागून ११९ कामगार ठार. ६० जखमी.

जन्म

  • १७७१ – अर्नेस्ट पहिला, हॅनोव्हरचा राजा.
  • १८५० – पॅट गॅरेट, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील पोलीस अधिकारी.
  • १८७८ – पांचो व्हिया, मेक्सिकोचा क्रांतीकारी.
  • १८७९ – नारायण मल्हार जोशी, भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक.
  • १९०० – डेनिस गॅबॉर, हंगेरीयन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९१२ – एरिक हॉलिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१६ – सिड बार्न्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३९ – ज्यो क्लार्क, कॅनडाचा १६वा पंतप्रधान.
  • १९४५ – अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५० – हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
  • १९७४ – मर्व्हिन डिलन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १०१७ – सांजो, जपानी सम्राट.
  • १३१६ – लुई दहावा, फ्रांसचा राजा.
  • १९१६ – लॉर्ड होरेशियो किचनर, ब्रिटिश फील्ड मार्शल, भारताचा व्हाईसरॉय.
  • १९७३ – माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.
  • १९८७ – ग. ह. खरे, भारतीय इतिहासतज्ञ.
  • २००४ – रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • २०१६ – एलिनॉर झेलियट, अमेरिकन लेखिका आणि इतिहासकार.
  • २०२३ – गुफी पेंटल, हिंदी दूरचित्रवाहिनी व हिंदी चित्रपट अभिनेते

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक पर्यावरण दिन
  • संविधान दिन – डेन्मार्क.
  • मुक्ती दिन – सेशेल्स.

दिनविशेष, सुविचार, प्रार्थना, वाक्यप्रचार , बोधकथा, म्हणी, पसायदान, संविधान, प्रतिज्ञा, बालगीते, देशभक्तीपर गीते, परिपाठ

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा