31 october
31 ऑक्टोबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- मंगळवार
दिनांक- 31/10/2023, 31 ऑक्टोबर
मिती- आश्विन कृ. 2
शके– 1945
सुविचार- “आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दु: खी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात!”.
म्हणी व अर्थ – आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं- स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०४ वा किंवा लीप वर्षात ३०५ वा दिवस असतो.
एकोणिसावे शतक
- १८६३ – ग्रेट ब्रिटनने न्यू झीलंडच्या वैकाटोवर हल्ला केला
- १८६४ – नेव्हाडा अमेरिकेचे ३६वे राज्य झाले
- १८७६ – भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
- १८८० – बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग
विसावे शतक
- १९१३ – लिंकन हायवे या अमेरिकेच्या दोन्ही तीरांना जोडणारा मोटरकार जाऊ शकणारा अशा पहिला रस्त्याचे उद्घाटन
- १९१७ – पहिले महायुद्ध – बीरशेबाची लढाई
- १९२० – भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन काँग्रेस)ची स्थापना
- १९४१ – माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण
- १९४१ – दुसरे महायुद्ध – यु.एस.एस. रुबेन जेम्स या अमेरिकन विनाशिकेला जर्मन पाणबुडीने बुडविले. १०० खलाशी ठार
- १९४१ – हडर्सफील्ड, इंग्लंड येथील कपड्यांच्या कारखान्यात आग लागून ४९ ठार
- १९६३ – इंडियानापोलिसमधील आइस रिंकमध्ये स्फोट होउन ७४ ठार, ४०० जखमी
- १९८४ – भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधीची आपल्याच अंगरक्षकांकडून हत्या
- १९९४ – अमेरिकन ईगल एरलाइन्सचे ए.टी.आर. ७२ प्रकारचे विमान रोझलॉन, इंडियाना येथे कोसळले. ६८ ठार
- १९९६ – टॅम त्रांसपोर्तेस एरोस रिजनैस फ्लाइट ४०२ हे फोक्कर एफ. १०० प्रकारचे विमान साओ पाउलो येथे घरांवर कोसळले. जमीनीवरील दोघांसह ९८ ठार
- १९९९ – इजिप्तएर फ्लाइट ९९० हे विमान नान्टकेट, मॅसेच्युसेट्स जवळ समुद्रात कोसळले. २१७ ठार
- १९९९ – कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी जेसी मार्टिन मेलबोर्नला परतला
एकविसावे शतक
- २००० – सिंगापूर एरलाइन्स फ्लाइट ००६ हे बोईंग ७४७-४०० प्रकारचे विमान ताइपेइ विमानतळावरून उड्डाण करताना धावपट्टीवरील बांधकाम साहित्याला धडकले. ८३ ठार.
- २००० – उत्तर ॲंगोलातून उड्डाण केल्याकेल्या स्फोट होउन ॲंतोनोव्ह ए.एन. २६ प्रकारचे विमान कोसळले. ५० ठार
- २००० – सोयुझ टी.एम.-३१ प्रकारच्या अंतराळयानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहण्यासाठीचा पहिला गट रवाना. या दिवसापासून स्थानकात कायम मानववस्ती आहे
- २०१५ – कोगालिमाव्हिया फ्लाइट ९२६८ हे एरबस ए३२१ प्रकारचे विमान उत्तर साइनाई द्वीपकल्पावर कोसळले. २२४ ठार.
जन्म
- १३४५ – फर्नांडो पहिला, पोर्तुगालचा राजा
- १३९१ – दुआर्ते, पोर्तुगालचा राजा
- १४२४ – व्लादिस्लॉस, पोलंडचा राजा
- १७०५ – पोप क्लेमेंट चौदावा
- १८३५ – एडॉल्फ फोन बेयर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ
- १८७५ – सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान
- १८८७ – च्यांग कै-शेक, चिनी नेता
- १८८७ – विल्यम व्हायसॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
- १८९५ – सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९२२ – नोरोदोम सिहोनुक, कम्बोडियाचा राजा
- १९२६ – एच.आर.एफ़. कीटिंग, मुंबई शहर ही पार्श्वभूमी असलेल्या रहस्यकथा लिहिणारा इंग्रजी लेखक
- १९३१ – डॅन रादर, अमेरिकन पत्रकार
- १९४६ – रामनाथ परकार, भारतीय क्रिकेट खेळाडू
- १९६१ – पीटर जॅक्सन, न्यू झीलंडचा चित्रपट दिग्दर्शक
मृत्यू
- १४४८ – जॉन आठवा पॅलियोलोगस, बायझेन्टाईन सम्राट
- १७३२ – व्हिक्टर आमाद्युस दुसरा, सव्हॉयचा राजा
- १९७५ – सचिन देव बर्मन संगीतकार
- १९८४ – इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान
- १९९९ – डॉ.भय्यासाहेब ओंकार वास्तव शैलीत चित्रे काढणारे मराठी चित्रकार
- २००५ – अमृता प्रीतम, ज्ञानपीठविजेती लेखिका
प्रतिवार्षिक पालन
- हॅलोवीन – ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट पंथ.
- मृतकांचा दिवस – फिलिपाईन्स.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#31 october, 31 october 2023, 31 october 2021 panchang, 31 october 2022 special day, 31 october 2023 weather, 31 october 2022 panchang in hindi, 31 october is celebrated as, what is celebrated on 31, 31 october 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.