30 November
30 नोव्हेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- गुरुवार
दिनांक- 30/11/2023, 30 नोव्हेंबर
मिती- कार्तिक कृ. 3
शके- 1945
सुविचार- सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे.
म्हणी व अर्थ – ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
ठळक घटना आणि घडामोडी
नोव्हेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३४ वा किंवा लीप वर्षात ३३५ वा दिवस असतो.
अठरावे शतक
- १७८२ – अमेरिकन क्रांती – पॅरिसमध्ये अमेरिका व ग्रेट ब्रिटनच्या प्रतिनिधींनी प्राथमिक संधी करार मान्य केला. या करारावर १७८३ मध्ये पॅरिसचा तह म्हणून शिक्का-मोर्तब झाले.
एकोणविसावे शतक
- १८०३ – न्यू ऑर्लिअन्स येथे स्पेनच्या प्रतिनिधीने लुईझियाना प्रांत फ्रांसच्या प्रतिनिधीकडे हस्तांतरित केला. २० दिवसांनी फ्रांसने हा प्रांत यू.एस.ला लुईझियाना परचेसचा हिस्सा महणून विकला.
- १८५३ – क्रिमीअन युद्ध – सिनोपच्या लढाईत रशियाच्या नौदलाने ऑट्टोमन जहाजांचा तांडा बुडविला.
- १८७२ – पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.
विसावे शतक
- १९३९ – रशियाच्या सैन्याने फिनलंडवर चढाई करून मॅनरहाइम रेषेपर्यंत धडक मारली.
- १९४३ – दुसरे महायुद्ध – अमेरिकन अध्यक्ष फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हिएत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.
- १९६६ – बार्बाडोसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९६६ – दक्षिण यमनच्या प्रजासत्ताकला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
एकविसावे शतक
- २००४ – लायन एर फ्लाइट ५३८ हे विमान इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सुरकर्ता गावाजवळ कोसळले. २६ ठार.
जन्म
- ५३९ – तूर्सचा ग्रेगोरी, फ्रांसचा इतिहासकार.
- १७५६ – अर्न्स्ट क्लाड्नी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १७६८ – जेड्रेज स्नियाडेकी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, लेखक.
- १८१० – ऑलिव्हर विन्चेस्टर, अमेरिकन संशोधक.
- १८१७ – थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
- १८३५ – सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.
- १८४७ – अफोन्सो ऑगुस्तो मोरेरा पेना , ब्राझिलचा सहावा राष्ट्राध्यक्ष.
- १८५७ – बॉबी एबेल , इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८५८ – जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ – गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८७४ – सर विन्स्टन चर्चिल, नोबेल पारितोषिक विजेता युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९१५ – हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ.
- १९३५ – आनंद यादव, मराठी लेखक.
- १९३६ – दिमित्री व्हिक्टोरोविच अनोसोव्ह, रशियन गणितज्ञ.
मृत्यू
- १०१६ – एडमंड दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १७१८ – चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
- १९०० – ऑस्कार वाइल्ड, आयरिश लेखक.
- १९०१ – एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक.
- २००७ – एव्हेल कनीव्हेल, अमेरिकन साहसिक.
- २०१२ – विजय देवधर, मराठी लेखक.
प्रतिवार्षिक पालन
- बार्बाडोस – स्वातंत्र्य दिन.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#30 november, 30 november 2023, 30 november 2021 panchang, 30 november 2022 special day, 30 november 2023 weather, 30 november 2022 panchang in hindi, 30 november is celebrated as, what is celebrated on 30 november, 30 november 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.