3 october
3 ऑक्टोबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- मंगळवार
दिनांक- 03/10/2023, 3 ऑक्टोबर
मिती- भाद्रपद कृ.2
शके– 1945
सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.
म्हणी व अर्थ – उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
ठळक घटना आणि घडामोडी
ऑक्टोबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७६ वा किंवा लीप वर्षात २७७ वा दिवस असतो.
- २३३३ – चीनी सम्राट याओच्या राज्यकालादरम्यान सध्याच्या कोरियामध्ये गोजोस्योन राष्ट्राची स्थापना.
अठरावे शतक
- १७३९ – रशिया व ऑट्टोमन साम्राज्यात निसाचा तह.
एकोणिसावे शतक
- १८६३ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनने दरवर्षीच्या नोव्हेंबरमधील चौथा गुरुवार हा थॅंक्सगिविंग दिन म्हणून पाळण्याचा आदेश दिला.
विसावे शतक
- १९०८ – व्हियेनामध्ये लेओन ट्रोट्स्की, एडॉल्फ जॉफ, माटव्हे स्कोबेलेव्ह व इतर रशियन नागरिकांनी प्रावदा हे बातमीपत्र सुरू केले.
- १९१८ – बोरिस तिसरा बल्गेरियाच्या राजेपदी.
- १९२९ – सर्बिया क्रोएशिया व स्लोव्हेनियाने एकत्र येउन युगोस्लाव्हिया राष्ट्राची निर्मिती केली.
- १९३२ – इराकला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.
- १९३५ – इटलीने इथियोपियावर हल्ला केला.
- १९४२ – जर्मनीतील पीनेमुंडे येथील तळावरून सर्वप्रथम व्ही-२ ए-४ क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण. हे क्षेपणास्त्र म्हणजे अंतराळात पोचलेली सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
- १९८१ – बेलफास्टमधील मझे कारागृहातील बंदीवास्यांचे उपोषण सात महिन्यांनी संपले.
- १९८५ – स्पेस शटल अटलांटिसने अंतराळात प्रथमतः झेप घेतली.
- १९९० – पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण.
- १९९५ – ओ.जे. सिम्पसनची आपल्या भूतपूर्व पत्नी निकोल सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनच्या खुनाच्या आरोपातून सुटका.
एकविसावे शतक
- २००३ – लास व्हेगास येथे नाट्यमंचावर वाघ व सिंहांकडून खेळ करवून घेणाऱ्या सिगफ्रीड आणि रॉय या जोडींपैकी रॉय हॉर्नवर एका वाघाने प्रेक्षकांसमोरच घातकी हल्ला चढवला. हॉर्न जेमतेम वाचला पण त्यांचा खेळ बंद करण्यात आला.
- २०१३ – लिब्यातून निघालेल्या निर्वासितांची नाव इटलीजवळ बुडून १३४ मृत्युमुखी.
जन्म
- १८६२ – जॉनी ब्रिग्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९१ – विल्यम लिंग, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९०५ – एरॉल हंट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९११ – सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९२१ – रे लिंडवॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९५२ – गॅरी ट्रूप, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७३ – नीव्ह कॅम्पबेल, केनेडीयन अभिनेत्री.
- १९८० – सॅराह कॉल्येर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८४ – ऍशली सिम्पसन, अमेरिकन गायिका.
मृत्यू
- १२२९ – संत फ्रांसिस.
- १५६८ – व्हाल्व्हाची एलिझाबेथ.
- १५९६ – फ्लोरें क्रेस्टियें, फ्रेंच लेखक.
- १९२९ – गुस्ताव स्ट्रेसमान, जर्मनीचा चान्सेलर.
प्रतिवार्षिक पालन
- जर्मन एकता दिन – जर्मनी.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#3 october, 3 october 2023, 3 october 2021 panchang, 3 october 2022 special day, 3 october 2023 weather, 3 october 2022 panchang in hindi, 3 october is celebrated as, what is celebrated on 3 october, 3 october 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.