29 डिसेंबर दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- गुरुवार, दिनांक- 29/12/2022,
मिती- पौष शुक्ल सप्तमी, शके-1944
वाक्प्रचार-
मनाई असणे- बंदी असणे
आजचा दिनविशेष-
ठळक घटना आणि घडामोडी
एकोणिसावे शतक-
१८१३ – १८१२ चे युद्ध – ब्रिटीश सैनिकांनी बफेलो, न्यूयॉर्क जाळले.
१८३५ – न्यूएकोटाचा तह – चेरोकी जमातीची मिसिसिपीच्या पूर्वेची सगळी जमीन अमेरिकेच्या स्वाधीन.
१८४५ – टेक्सास अमेरिकेचे २८वे राज्य झाले.
१८६२ – अमेरिकन यादवी युद्ध – चिकासॉ बायूची लढाई संपली.
१८९० – युनाइटेड स्टेट्स सेव्हन्थ कॅव्हेलरी(अमेरिकेचे ७वे घोडदल) कडून सू राष्ट्राच्या ४०० पुरुष, स्त्री व बालकांची वुन्डेड नी येथे कत्तल.
१८९१ – थॉमस अल्वा एडिसनने रेडियोसाठी पेटंट मिळविला.
विसावे शतक-
१९११ – सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.
१९१२ – विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग कॅनेडाच्या पंतप्रधानपदी.
१९३४ – जपानने १९२२ च्या वॉशिंग्टन नाविकी तह व १९३० च्या लंडन नाविकी तहातून अंग काढून घेतले.
१९३७ – आयरीश मुक्त राज्य संपुष्टात. त्याऐवजी आयर्लंडहा देश अस्तित्वात.
१९४० – दुसरे महायुद्ध-ब्रिटनची लढाई – लुफ्तवाफेने लंडनवर जबर बॉम्बफेक केली. ३,००० नागरिक ठार.
१९७२ – ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
१९७५ – न्यूयॉर्कच्या लाग्वार्डिया विमानतळावर बॉम्बस्फोट. ११ ठार.
१९८९ – वाक्लाव हावेल चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९९२ – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष फर्नान्डो कोलोर डी मेलोने राजीनामा दिला.
१९९४ – माझगाव डॉकने तयार केलेली क्षेपणास्त्र वाहक नौका भा.नौ.द. नाशक भारतीय नौदलात दाखल.
१९९८ – ख्मेर रूजच्या नेत्यांनी कंबोडियातील वंशहत्येबद्दल जगाची माफी मागितली. या प्रकारात १०,००,०००हून अधिक माणसांना मारण्यात आले होते.
एकविसावे शतक-
२००१ – पेरूची राजधानी लिमाच्या ऐतिहासिक मध्यवर्ती भागात आग. २७४ ठार.
२००५ – बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी.
जन्म-
१७०९ – रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
१८०० – चार्ल्स गुडईयर, अमेरिकन शोधक व उद्योगपती.
१८०८ – ऍन्ड्र्यू जॉन्सन, अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष.
१८०९ – विल्यम इवार्ट ग्लॅड्स्टोन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८४४ – उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.
१९०० – मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.
१९०४ – कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी
१९१७ – रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.
१९४२ – राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.
१९६० – डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
१९६७ – पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
१९७१ – दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.
२०१२ – टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
प्रार्थना-
केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा |
तुझ्यासारखा तूच देवा, तुला कुणाचा नाही हेवा |
वेळोवेळी संकटातुनी तारिशी मानवा |
वेडा होऊन भक्तीसाठी, गोपगड्यांसह यमुनाकाठी |
नंदाघरच्या गाई हाकिशी गोकुळी यादवा |
वीर धनुर्धर पार्थासाठी, चक्र सुदर्शन घेऊन हाती |
रथ हाकुनिया पांडवांचा पळविशी कौरवा |
बडबडगीत
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।
बोधकथा-
प्रश्नमंजुषा
व्यक्तीविशेष-
कार्य-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
मनाचे श्लोक
देशभक्तीपर गीत-
मंगल देशा
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ||
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ॥२॥