30 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

30 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- शुक्रवार , दिनांक- 30/12/2022,
मिती- पौष शुक्ल अष्टमी, शके-1944
सुविचार- सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची गोष्ट आहे.

वाक्प्रचार-
अधीर होणे – उत्सुक होणे.
म्हणी व अर्थ-
कुंपनानेच शेत खाल्ले-
अर्थ- पहारेकऱ्याने चोरी केली.

आजचा दिनविशेष-

30 डिसेंबर १९७१ – विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ यांचा मृत्यु

ठळक घटना आणि घडामोडी

एकोणिसावे शतक-

१८०३ – अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.

१८५३ – गाड्सडेन खरेदी – अमेरिकेने गिला नदीच्या दक्षिणेची व रियो ग्रान्देच्या पश्चिमेची ७७,००० वर्ग किलोमीटर जमीन मेक्सिकोकडून १,००,००,००० डॉलरच्या बदल्यात विकत घेतली.

१८६२ – अमेरिकन यादवी युद्ध – यु.एस.एस. मॉनिटर उत्तर कॅरोलिनातील केप हॅटेरास जवळ बुडाली.

१८८० – ट्रान्सवाल प्रजासत्ताक झाले. पॉल क्रुगर अध्यक्षपदी.

१८९६ – फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये होजे रिझालला फायरिंग स्क्वॉडने मृत्यूदंड. (पहा – रिझाल दिन).

१८९७ – नातालने झुलुलॅंड बळकाविले.

विसावे शतक-

१९०३ – शिकागोच्या इरोक्वो थियेटरला आग. ६०० ठार.

१९२२ – सोवियेत संघराज्याची स्थापना.

१९२४ – एडविन हबलने जगात अनेक आकाशगंगा असल्याचा दावा सिद्ध केला.

१९२७ – एशियातील सगळ्यात जुनी भुयारी रेल्वे, गिंझा लाईन टोक्योमध्ये सुरू.

१९४० – कॅलिफोर्नियातील पहिला द्रुतगतीमार्ग, अरोयो सेको पार्कवे खुला.

१९४३ – नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.

१९४४ – ग्रीसचा राजा जॉर्ज दुसऱ्याने राज्य सोडले.

१९४७ – रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.

१९५३ – जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत – १,१७५ डॉलर.

१९६५ – फर्डिनांड मार्कोस फिलिपाईन्सच्या अध्यक्षपदी.

१९७२ – व्हियेतनाम युद्ध – अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.

१९९६ – आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.

१९९७ – अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.

एकविसावे शतक-

२००० – मनिलात काही तासात अनेक बॉम्बस्फोट. २२ ठार, १०० जखमी.

२००१ – आर्जेन्टिनात ब्युएनोस एर्सच्या रिपब्लिका क्रोमेन्योन नाईटक्लबमध्ये आग. १९४ ठार.

२००४ – भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.

जन्म-

३९ – टायटस, रोमन सम्राट.

१६७३ – तिसरा एहमेद, ऑट्टोमन सुलतान.

१८६५ – रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.

१८७९ – रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.

१८८४ – हिदेकी तोजो, दुसऱ्या महायुद्धातील जपानी पंतप्रधान.

१८८७ – कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.’भारतीय विद्याभवन’चे संस्थापक.

१९०२ – डॉ. रघू वीरा, भारतीय भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य.

१९३५ – ओमार बॉन्गो, गॅबनचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू-

१५९१ – पोप इनोसंट नववा.

१८९६ – होजे रिझाल, फिलिपाईन्सचा क्रांतिकारी.

१९७४ – शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.

१९८२ – दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी मराठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक.

१९८६ – हॅरोल्ड मॅकमिलन, ब्रिटनचा पंतप्रधान.

१९८७ – दत्ता नाईक ऊर्फ एन. दत्ता, भारतीय संगीतकार

१९९२ – शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.

२००१ – हर्षद महेता, भारतीय शेरदलाल.

२००६ – सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन-

रिझाल दिन – फिलिपाईन्स.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्‍त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

बोधकथा-

मनःशांती 
एकदा भगवान विष्णूंनी ठरविले की, आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करावयाच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन, कोणी संतान, कोणी स्वास्थ्य तर कोणी वैभव मागत होते.
विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते. लक्ष्मीने पाहिले की, हळूहळू विष्णूचे भांडार रिकामे होत चालले आहे. तेव्हा विष्णूचा हात धरत ती म्हणाली, अशा रीतीने देत राहिलात तर वैकुंठाचे सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे?
स्मित चेहर्‍याने विष्णूंनी उत्तर दिले, ‘तू अजिबात चिंता करू नकोस. मज जवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर या पैकी कोणीच अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तो पर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस.’
लक्ष्मीने विचारले, ‘सांगा बघू अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे. माझ्या तर काही लक्षात येत नाही.’ विष्णू म्हणाले, ‘तिचं नाव आहे शांती’.
जर मनःशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरते. म्हणून मी शांती सांभाळून ठेवली आहे.

तात्पर्य :

मन शांती महत्वाची आहे.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे || धृ ||
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥१॥
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे॥ २ ॥
जरी अनेक अपुले धर्म,
जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३॥
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!”
– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

बालगीत –

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

प्रश्नमंजुषा-

✪ पाव ( ब्रेड ) तयार करतांना कशाचा उपयोग करतात ?
  ➜ यिस्ट.
 ✪ गुरांच्या हिरव्या चारयासाठी कशाला प्राधान्य देतात ?
  ➜ कुरण शेतीला.
 ✪ अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?
  ➜ परजीवी वनस्पती.
 ✪ रबराच्या झाडापासून निघणारया द्रव्यास काय म्हणतात ?
  ➜ लॅटेक्स.
 ✪ सफ्रीनचा रंग कसा असतो ?
  ➜ केसरी

व्यक्तीविशेष-

निर्मलाताई आठवले-
निर्मलाताईंचा जन्म ३ ऑगस्ट १९२६ रोजी राजापूर तालुक्यात झाला. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याशी विवाह झाल्यानंतर निर्मलाताईंनी स्वत:ला स्वाध्याय कार्यात वाहून घेतले. स्वाध्याय कार्यात निर्मलाताईंचं योगदान मोठं होतं.
स्वाध्याय परिवारामध्ये त्या ‘ताई’ म्हणून ओळखल्या जात. पांडुरंग शास्त्रींच्या निधनानंतर निर्मलाताई ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातच वास्तव्याला होत्या. तिथं त्या स्वाध्यायी बंधुभगिनींना मार्गदर्शन करत.
स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत पांडुरंगशात्री आठवले यांच्या पत्नी निर्मलाताई आठवले यांचं सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास निधन (३० डिसेंबर २०१६) झालं. ठाणे येथील तत्त्वज्ञान विद्यापीठातील त्यांच्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९० वर्षांच्या होत्या. स्वाध्यायींना मातृवत असलेल्या निर्मलाताईंच्या निधनामुळं स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली होती.

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा, परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.