31 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

31 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- शनिवार,

दिनांक- 31/12/2022,

मिती- पौष शुद्ध नवमी,

शके-1944,

सुविचार- चांगल्यातून चांगले निर्माण होते; वाईटातून वाईट.

म्हणी व अर्थ-
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप
-अतिशय उतावळेपणाची कृती

आजचा दिनविशेष-

गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७८

ठळक घटना आणि घडामोडी-

१६०० – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना

१८०२ – दुसरा बाजीराव याने तैनाती फौजा स्वीकारून वसई येथे तह केला.

जन्म-

१८६९ – हेन्री मॅटिसे चित्रकार.

१८७१ – गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव, वडोदरा येथील भारतीय आधुनिक व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिराचे स्थापक.

१९०७ – हरिवंशराय बच्चन, हिंदी कवी

१९१० – पं. मल्लिकार्जुन मन्सूर, ग्वाल्हेर घराण्याचे हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.

१९४३ – बेन किंग्जली अभिनेता.

मृत्यू-

१९२ – कोमॉडस, रोमन सम्राट.

३३५ – संत सिल्व्हेस्टर.

१६१० – लुडॉल्फ व्हान स्युलेन, जर्मन गणितज्ञ.

१६५० – दॉर्गोन, चीनी सम्राट.

१६७९ – जियोव्हानी आल्फोन्सो बोरेली, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.

१७९९ – ज्यॉॅं-फ्रांस्वा मारमोंटेल, फ्रेंच लेखक.

१८७२ – अलेक्सिस किवी, फिनिश लेखक.

१८७७ – गुस्ताव कुर्बे, फ्रेंच चित्रकार.

१८८९ – इयोन क्रेंगा, रोमेनियन लेखक.

१८९४ – थॉमस जोन्स स्टिल्ट्येस, डच गणितज्ञ.

१९०५ – अलेक्झांडर पोपोव्ह, रशियन भौतिकशास्त्रज्ञ.

१९२६ – वि.का. राजवाडे इतिहासाचार्य.

१९३६ – मिगेल दि उनामुनो, स्पॅनिश लेखक.

१९५२ – हॅंक विल्यम्स, अमेरिकन संगीतकार.

१९६४ – ओलाफुर थॉर्स, आइसलॅंडचा पंतप्रधान.

१९७१ – डॉ. विक्रम साराभाई, भारतीय अंतराळ संशोधक.

१९७७ – सबाह तिसरा अल-सलीम अल-सबाह, कुवैतचा शेख.

१९८० – मार्शल मॅकलुहान, केनेडियन लेखक.

१९८६ – राजनारायण, भारताचे केंद्रीय आरोग्य मंत्री.

१९९३ – झ्वियाद गामसाखुर्दिया, जॉर्जियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१९९७ – छोटा गंधर्व स्वरराज.

२००३ – आर्थर आर. फोन हिप्पेल, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

२००४ – जरार्ड देब्रू, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ.

२०११ – वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार.

२०१६ ‌- बाळासाहेब विखे पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे

कवी :- साने गुरुजी

बोधकथा-

सत्‍कृत्‍य-
एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत.
एके दिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता.
झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,”महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही.
तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?” यावर महादेव म्‍हणाले,”तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस.
पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल?
पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.
तात्पर्य – एका सत्‍कृत्‍यामुळेदेखील आपले आयुष्‍य बदलून जाऊ शकते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

कवी : साने गुरुजी

बालगीत-

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

कवयित्री : वंदना विटणकर

सामान्यज्ञान

1) भारताच्या अणू विज्ञानाचे जनक कोण आहे ?
-डाॅ. होमी भाभा.
2) तेलबियाचा राजा कोणत्या पिकाला म्हणतात ?
-भुईमूग.
3) What is the colour of a sunflower?
-Yellow
4) What is the colour of blood in a human body?
-Red
5) What is the colour of a leaf in a plant?
-Green
6) What colour is the Crow ?
-Black
7) Which color is at the top of the Indian national flag?
-Saffron
8) शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव सांगा.
-बाबाजीराजे
9) शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव सांगा.
-मालोजीराजे
10) शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव सांगा .
-शहाजीराजे
11) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा .
-जिजाबाई
12) शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव सांगा.
-शिवाजी शहाजी भोसले

व्यक्तीविशेष-

गजानन माणिक

गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांचा जन्म ३१ डिसेंबर १८७८ रोजी बडोदे येथे झाला. वस्ताद जुम्मादादांचे शिष्य व अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते.
महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमध्येही त्यांनी गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, लकडी, बनेटी, जोडी, असे देशी खेळ व व्यायाम प्रकारांचे शास्त्र निर्माण करून त्यांना सांघिक व्यायामाचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम माणिकरावांनी केले.
 त्यांनी बडोदे येथे ‘कन्या आरोग्य मंदिरा’ ची स्थापना केली व मुलींना व्यायाम शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. सैनिकी संचलने व कवायती यांच्यासाठी इंग्रजी आज्ञांऐवजी त्यांनी आज्ञाशब्द तयार केले.
बडोद्यातील १९१८ सालच्या फ्ल्यूच्या साथीत व १९२७ च्या महापुराच्या वेळी त्यांनी भरीव समाजकार्य केले. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी क्रांतिकारकांना व्यायाम मंदिरात गुप्त आश्रय दिला, त्यांना शस्त्रविद्येचे धडेही दिले. त्यांनी बडोद्यात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवाजयंती उत्सव सुरू केले. त्यांच्या समाजकार्याच्या गौरवार्थ बडोदे सरकारकडून त्यांना ‘राजरत्न’ व ‘राजप्रिय’ या पदव्या बहाल करण्यात आल्या.
माणिकराव हे आजन्म ब्रह्मचारी होते. बडोद्याच्या ‘लक्ष्मीविलास’ राजवाडय़ात भव्य शस्त्रसंग्रहालय उभारणा-या माणिकरावांनी ‘प्रतापशस्त्रागार’, ‘भारतीय व्यायाम’ हे ग्रंथ लिहिले. गजानन यशवंत माणिक यांचे २५ मे १९५४ रोजी निधन झाले.

मराठी परिपाठ,

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.