2 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ,Daily Routine

2 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- सोमवार,

दिनांक- 02/01/2023,

मिती- पौष शुद्ध एकादशी, पुत्रदा एकादशी

शके-1944,

सुविचार- सुरुवात कशी झाली यावर  बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून  असतो.

म्हणी व अर्थ-
उंटावरून शेळ्या हाकणे –
आळस, हलगर्जीपणा करणे.

आजचा दिनविशेष-

2 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २रा किंवा लीप वर्षात २रा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी-

अठरावे शतक-

१७५७ – ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले. प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला.

एकोणिसावे शतक-

१८८१ – लोकमान्य टिळकांनी संपादित केलेल्या मराठा या दैनिकाची सुरुवात झाली.

१८८५ – पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.

विसावे शतक-

१९३६ – मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना.

१९४२ – दुसरे महायुद्ध – जपानने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जिंकली.

१९४६ – आल्बेनियाच्या राजा झॉगने राज्यत्याग केला.

१९५१ – सोवियेत संघाच्या ल्युना-१ अंतरिक्षयानाचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण.

१९५५ – पनामाच्या राष्ट्राध्यक्ष होजे ॲंतोनियो रेमोनची हत्या.

१९७१ – इब्रॉक्सच्या दुसऱ्याा दुर्घटनेत ६६ प्रेक्षक ठार.

१९७४ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने अमेरिकेतील पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी तेथील महामार्गांवरील गतिमर्यादा कमी करून ताशी ५५ मैल (८९ किमी) केली.

१९८९ – मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हाश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या

१९९९ – अमेरिकेच्या मध्य भगातील हिमवादळात मिलवॉकीमध्ये १४ इंच तर शिकागोमध्ये १९ इंच हिम पडले. शिकागोत तापमान -१३ °F (-२५ °C) इतके खाली गेले. ६८ मृत्यू.

२००० – संत ज्ञानेश्वरांची मुद्रा असलेल्या चलनी नाण्याचे भारतीय व्यक्तीपंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२००० – पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

एकविसावे शतक-

२००१ – एदुआर्दो दुहाल्दे आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

२००६ – अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील सेगो येथील कोळशाच्या खाणीत अपघात होऊन १२ कामगार ठार तर एक गंभीररीत्या जखमी.

२०१६ – सौदी अरेबियाने दहशतवादी असल्याचे ठरवून ४६ लोकांना मृत्युदंड दिला.

जन्म-

१६४२ – महमद चौथा, ऑट्टोमन सुलतान.

१९१० – श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.

१९३२ – हरचंदसिंग लोंगोवाल, अकाली दलाचे अध्यक्ष

१९४० – श्रीनिवास वरदन, भारतीय गणितज्ञ.

१९४२ – डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.

१९५९ – कीर्ति आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९६० – रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९६४ – रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९७० – ॲंथनी स्टुअर्ट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९७३ – जॉन बेनॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

१३१६ – अल्लाउद्दीन खिलजी, दिल्लीचा सुलतान.

१९३५ – मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर, टिळक अनुयायी स्वातंत्र्यसैनिक, मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील

१९४३ – भाई कोतवाल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.

१९४४ – महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, मराठी समाजसुधारक.

१९४६ – ज्यो डार्लिंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९५२ – भास्कर वामन भट, भारतीय इतिहास संशोधक.

१९८९ – सफदर हाश्मी, भारतीय पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवी आणि गीतकार.

१९९५ – सियाद बारे, सोमालियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९९९ – विमला फारुकी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या

२००२ – अनिल अग्रवाल, भारतीय पर्यावरणवादी.

२०१५ – वसंत गोवारीकर, भारतीय शास्त्रज्ञ.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

साधू आणि गवळण
एका गावात एक साधू राहत होता. लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे.
एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले, “आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला.” साधू हसत म्हणाला,”लोक तर ईश्वराच्या नावावर संसार सागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही.” त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला.
दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जागा झाला. दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला. त्याने विचारले,”रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?” गवळण म्हणाली,”महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले,आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले”.
साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्यापाठोपाठ नदीत गेला. जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले,” तुम्ही आपलाच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता.” गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.
तात्पर्य : दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

कवी : साने गुरुजी

बालगीत-

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

कवयित्री : वंदना विटणकर

सामान्यज्ञान

● भारतातील केशरचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
~ जम्मू काश्मिर.
● जगातील सर्वांत मोठे बेट कोणते ?
~ ग्रीनलँड.
● भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो ?
~ २४ डिसेंबर.
● संजय हे कोणाचे टोपणनाव आहे ?
~ माधव पंढरीनाथ शिखरे.
● भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
~ मोर.
● What is the National Animal of India?
~ Tiger
● What is the National Bird of India?
~ Indian Peacock
● What is the National Flower of India?
~ Lotus
● What is the National Anthem of India, and who wrote it?
~ Jana Gana Mana, written by Rabindranath Tagore
● What is the National Song of India?
~ Vande Mataram, written by Bankim Chandra Chatterjee

व्यक्तीविशेष-

विठ्ठल रामजी शिंदे

(जन्म : जमखिंडी, २३ एप्रिल १८७३; – २ जानेवारी १९४४)

विठ्ठल रामजी शिंदे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे व महर्षी शिंदे असेही म्हटले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते.

त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत.

एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या.

ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला.

प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महर्षी शिंदे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी राजकीय हक्कांवरून मतभेद होते.

जीवन-

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘’डिप्रेस्ड क्लास मिशन’’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली.

या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती :

अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ,

अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे,

त्यांच्या अडचणींचे निवारण करणे,

अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी.

या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

लेखन-

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून ‘ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर’ या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, ‘माझ्या आठवणी व अनुभव’ हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

  • ग्रंथसंपदा:-

  1. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३
  2. Untouchable of India
  3. History of Parihars
  4. माझ्या आठवणी व अनुभव (Autobiography)
  5. भागवत धर्माचा विकास (लेख)
  6. मराठ्यांची पूर्वपीठिका (लेख)
  7. कानडी – मराठी संबंध (लेख)
  8. कोकणी – मराठी संबंध (लेख)
  9. Thiestic directory

मराठी परिपाठ,

परिपाठ ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.