28 डिसेंबर दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

28 डिसेंबर दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- बुधवार, दिनांक- 28/12/2022,
मिती- पौष शु. षष्ठी, शके-1944
सुविचार-कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझं वाटत नाही.

वाक्प्रचार-
अधीर होणे – उत्सुक होणे.
म्हणी व अर्थ-
एक ना धड भाराभर चिंध्या –
एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.

आजचा दिनविशेष-

28 डिसेंबर-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन

पाचवे शतक-

४१८ – संत बॉनिफेस पहिला पोपपदी.

अकरावे शतक-

१०६५ – लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर ऍबी खुली.

सतरावे शतक-

१६१२ – गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.

१६५९ – कोल्हापूरची लढाई.

एकोणिसावे शतक-

१८३२ – जॉन सी. कॅल्हूनने अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

१८३५ – दुसऱ्या सेमिनोल युद्धात ओसिओलाने सेमिनोल योद्ध्यांसह अमेरिकन सैन्यावर हल्ला चढविला.

१८३६ – दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्य व एडिलेड शहराची स्थापना.

१८३६ – स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.

१८४६ – आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.

१८७९ – डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.

१८८२ – मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना

विसावे शतक-

१९०८ – मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५,००० ठार.

१९७३ – अलेक्सांद्र सोल्झेनित्सिनने गुलाग आर्किपेलागो प्रकाशित केले.

१९९५ – कझाखस्तानमधील बैकानूर अंतराळतळावरून भारताच्या आय.आर.एस.-१सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९९९ – तुर्कमेनिस्तानने सपार्मुरात नियाझोवला आजन्म राष्ट्राध्यक्ष घोषित केले.

एकविसावे शतक-

२००० – एड्रियन नास्तासे रोमेनियाच्या पंतप्रधानपदी.

जन्म-

११६४ – रोकुजो, जपानी सम्राट.

१८९९ – गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.

१८५६ – वुड्रो विल्सन, अमेरिकेचा २८वा राष्ट्राध्यक्ष.

१९०३ – जॉन फोन न्यूमन, हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ व तर्कशास्त्रज्ञ.

१९११ – फणी मुजुमदार, हिंदी चित्रपट निर्माते.

१९२२ – स्टॅन ली, कॉमिक्स लेखक, स्पायडर मॅन, हल्क, एक्स मेन, कॅप्टन अमेरिका, इ. काल्पनिक व्यक्तिमत्त्वांचा जनक.

१९२४ – मिल्टन ओबोटे, युगांडाचे राष्ट्राध्यक्ष.

१९३२ – धीरूभाई अंबाणी, भारतीय उद्योगपती.

१९३७ – रतन टाटा, भारतीय उद्योगपती.

१९४० – ए.के. ॲंटनी भारतीय परराष्ट्रमंत्री.

१९४५ – बीरेंद्र बीर बिक्रम शाह , नेपाळचे राजे

१९५२ – अरुण जेटली, भारतीय वकील व केंद्रीय मंत्री.

१९६९ – लिनस तोरवाल्ड्स, फिनलंडचा प्रोग्रॅमर, लिनक्स या गणकयंत्रप्रणालीचा जनक.

१९७२ – पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू.

मृत्यू-

१३६७ – आशिकागा योशियाकिरा, जपानी शोगन.

१४४६ – प्रतिपोप क्लेमेंट आठवा.

१५०३ – पियेरो लोरेंझो दी मेदिची, फ्लोरेंसचा राज्यकर्ता.

१६९४ – मेरी दुसरी, इंग्लंडची राणी.

१७०३ – मुस्तफा दुसरा, ऑट्टोमन सुलतान.

१८५९ – थॉमस मॅकॉले, ब्रिटीश कवी, राजकारणी व इतिहासकार.

१९१६ – एदुआर्द स्ट्रॉस, ऑस्ट्रियाचा संगीतकार.

१९६७ – द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.

१९७१ – नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.

१९७७ – सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.

१९८१ – डेव्हिड अब्राहम चेऊलकर तथा डेव्हिड, हिंदी चित्रपटांतील चरित्र अभिनेता.

२००० – मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष

२००० – उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.

२००३ – चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.

२००३ – कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.

२००४ – जेरी ऑर्बाख, अमेरिकन अभिनेता.

२००६ – प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.व व्हायोलिनवादक

प्रतिवार्षिक पालन-

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना दिन

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

प्रार्थना-

देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल. ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला. कासव हळूहळू चालत ससापर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली. ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससा च्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.

तात्पर्य :

कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे || धृ ||
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥१॥
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे॥ २ ॥
जरी अनेक अपुले धर्म,
जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३॥
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!”
– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

बालगीत –

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

प्रश्नमंजुषा-

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute?
Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are there in half hour?
Ans : 30 minutes
6) महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : मुंबई
7) गुजरात राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : गांधीनगर
8) मध्यप्रदेश राज्याची राजधानी कोणती?
उत्तर : भोपाळ
9) कर्नाटक राज्याची राजधानी कोणती?
उत्तर : बेंगळुरू
10) गोवा राज्याची राजधानी कोणती?
उत्तर : पणजी

व्यक्तीविशेष-गजानन माडखोलकर

 गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी मुंबईत झाला. ते विख्यात मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक. जन्म व शिक्षण मुंबईत. गणित विषयात गती नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत तथापि संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता.
साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशाचे विभागसंपादक, नागपूरच्या दैनिक महाराष्ट्राचे साहाय्यक संपादक अशा विविध नोकऱ्या केल्यानंतर नागपूरच्या नरकेसरी स्मारक मंडळाने काढलेल्या तरुण भारत ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले. एक पत्रकार ह्या नात्याने त्यांनी तात्कालिक महत्त्वाच्या अनेक विषयांवर लेखन केले. प्रखर राष्ट्रवादी वृत्ती, वाङ्‌मयगुणांनी युक्त अशी प्रसन्न भाषाशैली आणि तर्कशुद्ध विवेचनपद्धती ही त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनाची वैशिष्ट्ये होती.
आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही कविता–ह्यांत संस्कृत काव्यरचनेचाही समावेश आहे–केल्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते.
त्या मंडळाच्याउषा(१९२४) ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.देवयानी(१९६४) हे त्यांनी लिहिलेले नाटक.रातराणीची फुले(१९४०) आणिशुक्राचे चांदणे(१९४८) ह्या त्यांच्या कथासंग्रहातील कथा गाजल्या होत्या.१९३३ मध्येमुक्तात्माही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर कांदबरीकार म्हणून त्यांना ख्याती लाभली.आधुनिक कविपंचक (१९२१) हे माडखोलकरांचे पहिले पुस्तक समीक्षात्मक होते.
रेव्ह. टिळक, केशवसुत, गोविंदाग्रज, विनायक व बालकवी ह्या पाच कवींच्या कवितेचा रसग्रहणात्मक परामर्श ह्या पुस्तकात घेतलेला असून ह्या पहिल्या पुस्तकाने समीक्षक म्हणून ते प्रसिद्धीस आले. प्रस्तुत पुस्तक हे रसास्वादी समीक्षेचे उत्तम प्रत्यक्षिक मानले जाते. समीक्षकाला आवश्यक असलेली चिकित्सा आणि रसिकता ह्यांचा सुंदर समन्वय ह्या पुस्तकात दिसतो.
१९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचारपसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडेही ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.
१९४६ साली बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि ह्याच साहित्यसंमेलनात संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मंजूर झाला होता. नागपूर येथे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी ते निधन पावले.

मराठी परिपाठ

परिपाठ सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा, परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष मराठी,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.