27 डिसेंबर दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार-मंगळवार, दिनांक- 27/12/2022
मिती- पौष शुद्ध पंचमी, शके-1944
सुविचार- गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र.
आजचा दिनविशेष-
ठळक घटना आणि घडामोडी
अठरावे शतक-
१७०३ – पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला (वाइनला) इंग्लंडमध्ये प्राधान्य.
एकोणिसावे शतक-
१८३१ – चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.
विसावे शतक-
१९११ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात जन गण मन हे रविंद्रनाथ टागोर यांनी रचलेले गीत प्रथमच म्हणण्यात आले. २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला हे भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली.
१९१८ – बृहद् पोलंड (ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड
१९४५ – २९ देशांनी केलेल्या करारानुसार जागतिक बँक (World Bank) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) यांची स्थापना करण्यात आली.
१९४५ – कोरियाची फाळणी.
१९४९ – इंडोनेशियाला नेदरलॅंड्सपासून स्वातंत्र्य.
१९७८ – ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.
१९७५ – बिहारमधील (आताचे झारखंड) चासनाला येथे कोळशाच्या खाणीत अचानक पाणी शिरून झालेल्या दुर्घटनेत ३७२ कामगार काही मिनिटांत ठार झाले.
१९७९ – अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला अध्यक्षपदी बसविले.
१९८५ – पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी रोम व व्हियेनाच्या विमानतळावर २० प्रवाश्यांना ठार मारले.
१९८६ – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने बाग्रामचा विमानतळ काबीज केला.
एकविसावे शतक-
२००७ – पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची गोळ्या घालून हत्या.
जन्म-
१५७१ – योहान्स केप्लर, जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ.
१६५४ – जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
१७१७ – पोप पायस सहावा.
१७७३ – जॉर्ज केली, इंग्लंडचा शास्त्रज्ञ, शोधक व राजकारणी.
१७९७ – मिर्झा गालिब, उर्दू कवी.
१८२२ – लुई पास्चर, फ्रांसचा शास्त्रज्ञ.
१८७६ – भास्कर वामन भट, इतिहास संशोधक.
१८९८ – पंजाबराव देशमुख, स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, विदर्भात त्यांनी केलेले शिक्षणप्रसाराचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटलांच्या तोडीचे मानले जाते.
१९०१ – मार्लिन डीट्रीच, जर्मन अभिनेत्री.
१९२३ – श्री. पु. भागवत, प्रकाशक, समीक्षक, संपादक, लेखक व प्राध्यापक.
१९२४ – सुमती देवस्थळे, मराठी लेखिका.
१९४४ – विजय अरोरा – हिंदी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता.
१९६५ – सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.
मृत्यू-
४१८ – पोप झोसिमस.
१९०० – विल्यम जॉर्ज आर्मस्ट्रॉंग, ब्रिटीश स्थापत्यशास्त्री.
१९६५ – देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.
१९९७ – मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.
२००२ – प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.
२००५ – केरी पॅकर, ऑस्ट्रेलियाचा उद्योगपती आणि क्रिकेट प्रायोजक.
२००७ – बेनझीर भुट्टो, पाकिस्तानी पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन-
जागतिक बँक वर्धापन दिन
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
प्रार्थना-
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
कवी :- साने गुरुजी
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी
बालगीत-
ए आई मला पावसात जाउ दे
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
कवयित्री : वंदना विटणकर