25 September
25 सप्टेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- सोमवार
दिनांक- 25/09/2023, 25 सप्टेंबर
मिती- भाद्रपद शु. 10
शके– 1945
सुविचार- ट्यालेंट सगळ्यांत असते, त्यानुसार जगण्याच धेर्य मात्र सगळ्यात नसते.
म्हणी व अर्थ – आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे
अर्थ :~ अपेक्षे पेक्षा जास्त फायदा होणे.
ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६८ वा किंवा लीप वर्षात २६९ वा दिवस असतो.
-
अठरावे शतक
- १७८९ – अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना नागरिकांचा हक्कनामा म्हणून ओळखले जाते.
-
एकोणिसावे शतक
- १८४६ – मेक्सिकन अमेरिकन युद्ध – झॅकरी टेलरने मेक्सिकोतील मॉंटेरे शहर काबीज केले.
-
विसावे शतक
- १९८१ – सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
- १९६२ – अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
- १९९९ -अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन, रसायनशास्त्रज्ञ प्रा.एम.एस. शर्मा आणि डॉ.पाल रत्नासामी यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
-
एकविसावे शतक
- २००३ – जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.
जन्म
- १३५८ – आशिकागा योशिमित्सु, जपानी शोगन.
- १६९४ – हेन्री पेल्हाम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १७११ – कियानलॉॅंग, चीनी सम्राट.
- १८६२ – बिली ह्युस, ऑस्ट्रेलियाचा सातवा पंतप्रधान.
- १८८१ – गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.
- १९२१ – सर रॉबर्ट मल्डून, न्यू झीलँडचा पंतप्रधान.
- १९२२ – बॅ. नाथ पै, स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ.
- १९२२ – हॅमर डिरॉबुर्ट, नौरूचा पहिला पंतप्रधान.
- १९२६ – बाळ कोल्हटकर – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.
- १९२९ – जॉन रदरफोर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९३२ – अडोल्फो सुआरेझ, स्पेनचा पंतप्रधान.
- १९३८ – जोनाथन मोत्झफेल्ट, ग्रीनलँडचा पहिला पंतप्रधान.
- १९४२ – पीटर पेथेरिक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४४ – ग्रेसन शिलिंगफोर्ड, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९४६ – बिशनसिंग बेदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४७ – ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य
- १९४९ – इन्शान अली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९५३ – सुरेंद्र पाल, हिंदी चित्रपट अभिनेता
- १९५९ – अँडी वॉलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६१ – टिम झोहरर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९६२ – राजू कुलकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९६५ – मिन्हाजुल आबेदिन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- १९६५ – डेव्ह रंडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ – हान्सी क्रोन्ये, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ – कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.
मृत्यू
- १०६६ – हॅराल्ड तिसरा, नॉर्वेचा राजा.
- १५०६ – फिलिप पहिला, कॅस्टिलचा राजा.
- १५३४ – पोप क्लेमेंट सातवा.
- १६१७ – गो-योझेई, जपानी सम्राट.
- १६८० – सॅम्युएल बटलर, इंग्लिश कवी
- १९८३ – लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा.
- १९९८ – कमलाकर सारंग – रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.
- २००४ – अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.
प्रतिवार्षिक पालन
-
- सेना दिन – मोझाम्बिक.
- जागतिक फार्मासिस्ट दिवस
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#25 september, 25 september 2023, 25 september 2021 panchang, 25 september 2022 special day, 25 september 2023 weather, 25 september 2022 panchang in hindi, 25 september is celebrated as, what is celebrated on 25 september, 25 september 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.