23 February, शालेय परिपाठ | Daily Routine

23 February

23 फेब्रुवारी दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– गुरुवार

दिनांक- 23/02/2023

मिती- फाल्गुन शुक्ल- 4

शके– 1944

सुविचार- खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे.

म्हणी व अर्थ-
घरोघरी मातीच्या चुली –
अर्थ : सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे.

मागील महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी

डिसेंबर, जानेवारी , फेब्रुवारी महिन्यावर क्लिक करा.

आजचा दिनविशेष- 

संत गाडगेबाबा जयंती– संत गाडगे बाबा (जन्म :- शेंडगाव, २३ फेब्रुवारी १८७६; – अमरावती, २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत.

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर दिन, धर्मवीरगड पेडगाव

रमण लांबा (जन्म- उत्तर प्रदेश, भारत, जानेवारी २, इ.स. १९६०; – ढाका, बांग्लादेश, मृत्यू- फेब्रुवारी २३, इ.स. १९९८)

हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले खेळाडू होते. ते उजव्या हाताने फलंदाजी करत असत.

भारतीय राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाकडून ते ४ कसोटी, तसेच ३२ एकदिवसीय सामने खेळले. ढाका क्लबस्तरीय क्रिकेट सामन्यात शॉर्ट लेग क्षेत्ररक्षकाच्या जागेवरून शिरस्त्राणाविना क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागून त्यांचा मृत्यू झाला.

ठळक घटना आणि घडामोडी-

पंधरावे शतक-

१४५५ – गटेनबर्ग बायबल प्रकाशित. पाश्चिमात्य देशांतील हे पहिले मुद्रित पुस्तक होय.

सतरावे शतक-

१६६० – चार्ल्स अकरावा स्वीडनच्या राजेपदी.

अठरावे शतक-

१७३९ – चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत मानाजी आंग्रे यांनी रेवदंड्यावर हल्ला चढवला.

एकोणिसावे शतक-

१८३६ – टेक्सासच्या सान ॲंटोनियो गावाच्या किल्ल्याला (अलामो) मेक्सिकन सैन्याने वेढा घातला.

१८७० – अमेरिकन यादवी युद्ध – मिसिसिपी परत अमेरिकेत दाखल.

१८८६ – अमेरिकेची  रसायनशास्त्री आणि संशोधक  मार्टिन हेल ने ऍलिम्युनिअमचा शोध लावला

१८८७ – फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.

१८९३ – रूडॉल्फ डिझेलने डिझेल ईंजिनचा पेटंट मिळवला.

विसावे शतक-

१९०३ – क्युबाने आपला ग्वान्टानामो बे हा प्रदेश अमेरिकेला ‘तहहयात’ भाड्याने दिला.

१९०४ – पनामाने १,००,००,००० अमेरिकन डॉलरच्या बदल्यात पनामा कालवा अमेरिकेच्या ताब्यात दिला.

१९१९ – इटलीत बेनितो मुसोलिनीने फाशीस्ट पार्टीची स्थापना केली.

१९३४ – लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.

१९४० – दुसरे महायुद्ध – सोवियेत संघाने लासी बेट जिंकले.

१९४१ – डॉ.ग्लेन टी. सीबॉर्गने किरणोत्सर्गी पदार्थ प्लुटोनियमची प्रथमतः निर्मिती केली.

१९४५ – दुसरे महायुद्ध – ईवो जिमाची लढाई – काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचले व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.

१९४५ – दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.

१९४७ – आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था(ISO)ची स्थापना.

१९५५ – एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

१९६६ – सिरीयात लश्करी उठाव.

१९९१ – पहिले अखाती युद्ध – दोस्त राष्ट्रांची सौदी अरेबियातून इराकवर खुश्की मार्गाने चाल.

१९९१ – थायलंडमध्ये लश्करी उठाव.

१९९६  कोकण रेल्वेच्या चिपळूण–खेड टप्प्यावर वाहतूक सुरू झाली.

१९९७ – रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.

१९९९ – ऑस्ट्रियाच्या गाल्ट्युर गावावर हिमप्रपात. ३१ ठार.

एकविसावे शतक-

२००६ – इराकमध्ये  जातीय हिंसेत १५९ लोक मारले गेले.

जन्म-

१४१७ – पोप पॉल दुसरा.

१६४६ – तोकुगावा त्सुनायोशी, जपानी शोगन.

१६८५ – जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल, जर्मन संगीतकार.

१८४२ – जेम्स लिलिव्हाइट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८७४ – कॉन्स्टेन्टिन पाट्स, एस्टोनियाचा राष्ट्राध्यक्ष.

१८६७ – जॅक बोर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८७६ – देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ संत गाडगे महाराज यांचा जन्म.

१९०४ – हेन्री प्रॉम्नित्झ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९०६ – फ्रॅंक वॉर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९०८ – विल्यम मॅकमेहोन, ऑस्ट्रेलियाचा २०वा पंतप्रधान.

१९१३ – प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार

१९२५ – इयान स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९४० – पीटर फोंडा, अमेरिकन अभिनेता.

१९४१ – रॉबिन बायनो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९४७ – जॉफ कोप, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९५४ – व्हिक्टर युश्चेन्को, युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष.

१९५७ – येरेन नायडू – तेलुगू देसम पक्षाचे लोकसभेतील नेते.

१९६५ – स्टीव्ह एलवर्थी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१०६५ – अशोक कामटे, मुंबईवरील दहशतवादी हल्ला शहीद झालेले पोलीस कमिशनर

१९६८ – वॉरन हेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७३ – ब्रॅड यंग, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९७४ – हर्शल गिब्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

११०० – झ्हेझॉॅंग, चीनी सम्राट.

१४४७ – पोप युजेनियस चौथा.

१४६४ – झेंगटॉॅंग, चीनी सम्राट.

१४६८ – योहान गटेनबर्ग, जर्मन मुद्रक, प्रकाशक.

१७३० – पोप बेनेडिक्ट तेरावा.

१७६६ – स्तानिस्लॉ लेस्झिन्सकी, पोलंडचा राजा.

१७७७ – कार्ल फ्रीडरीश गाऊस, जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ.

१८४८ – जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.

१८५५ – कार्ल फ्रीडरिक गॉस, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

१८७९ – आल्ब्रेख्ट ग्राफ फॉन रून, प्रशियाचा पंतप्रधान.

१९६५ – स्टॅन लॉरेल, अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग.

१९६९ – सौद, सौदी अरेबियाचा राजा..

१९९० – अमृतलाल नागर, हिंदी लेखक.

१९९० – होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वाडोरचा राष्ट्राध्यक्ष.

१९९८ – रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

२००० – वासुदेवशास्त्री धुंडिराज तांबे, संस्कृत अभ्यासक.

२००४ – विजय आनंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.

२००४ – सिकंदर बख्त, भारतीय राजकारणी, केरळचा राज्यपाल.

२००८ – यानेझ द्र्नोव्सेक, स्लोव्हेनियाचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन-

प्रजासत्ताक दिन – गुयाना.

राष्ट्र दिन – ब्रुनेई.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत- mp3

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार !
माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !
तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी ? देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !

बोधकथा-

एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. पूजा-पाठ करून जे द्रव्य मिळेत, त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी एका यजमानने त्या गरीब ब्राह्मणाला दोन चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या.
दानात मिळालेल्या त्या दोनी गायी त्यानं घरी आणल्या अन् त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं. एके काळी शिळी पोळी भाजी खाणार तो ब्राह्मण! गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला.
द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोनही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती. सुयोग्य संधी बघायची अन् ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या, असा त्या चोराचा डाव होता. एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली. परस्परांनी एकमेकांना ‘तू कुठे अन् का जातोस,’ ते विचारलं.
चोर म्हणाला, ‘मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे. पण तू कुठे चालला आहेस?’
अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे. ह्या ब्राह्मणानं मंत्र-तंत्र करून मला दूर घालवायचं, माझं अन्न-पाणी तोडलंय, पण आज मी त्यालाच खाणार आहे.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला
वीरों को हरषाने वाला
मातृभूमि का तन-मन सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर जोश बढ़े क्षण-क्षण में,
काँपे शत्रु देखकर मन में,
मिट जावे भय संकट सारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इस झंडे के नीचे निर्भय,
हो स्वराज जनता का निश्चय,
बोलो भारत माता की जय,
स्वतंत्रता ही ध्येय हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
आओ प्यारे वीरों आओ,
देश-जाति पर बलि-बलि जाओ,
एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।
इसकी शान न जाने पावे,
चाहे जान भले ही जावे,
विश्व-विजय करके दिखलावे,
तब होवे प्रण-पूर्ण हमारा, झंडा ऊँचा रहे हमारा।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_जागतिक महिला दिन – येथे क्लिक करा 

@_सामान्यज्ञान – येथे क्लिक करा 

@_5वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

@_8वी शिष्यवृत्ती – येथे क्लिक करा

23 february, 23 feb 2022, 23 februare 2021 panchang, 23 february 2022 special day, 23 february 2023 weather, 23 february 2022 panchang in hindi, 23 february is celebrated as, what is celebrated on 23 february, 23 february 2022

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.