22 June | 22 जून दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

22 June

22 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– गुरुवार

दिनांक- 22/06/2023, 22 June

मिती- आषाढ शुक्ल 4, विनायक चतुर्थी

शके– 1945

सुविचार- अन्याय आणि अत्याचार ह्याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव.

म्हणी व अर्थ-

  • हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे- ज्या घरी स्वच्छता असते; त्या घरी धनधान्य,संपत्ती भरपूर असते.

 

22 JUNE
22 जून

ठळक घटना आणि घडामोडी

22 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७३ वा किंवा लीप वर्षात १७४ वा दिवस असतो.

इ.स.पूर्व तिसरे शतक

  • २१७ – ईजिप्तच्या टॉलेमी चौथ्याच्या सैन्याने ॲंटियोकस तिसऱ्याचा पराभव केला.

इ.स.पूर्व दुसरे शतक

  • १६८ – लुसियस एमिलियस पॉलसच्या नेतृत्वाखाली रोमन सैन्याने मेसिडोनियाच्या पर्स्युसचा पराभव केला.

चौदावे शतक

  • १३७७ – वयाच्या दहाव्या वर्षी दुसरा रिर्चड इंग्लंडचा राजा झाला.

सतरावे शतक

  • १६३३ – पोपच्या दबावाखाली गॅलिलियोने कबूल केले की पृथ्वीच सूर्यमालेचा केन्द्रबिंदू आहे, सूर्य नव्हे.

अठरावे शतक

  • १७५७ – पलाशीची लढाई. या लढाईत विजय मिळाल्याने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला.
  • १७७२ – एखाद्या गुलामाने इंग्लंडमध्ये प्रवेश केला, तर त्याला स्वतंत्र नागरिक समजण्यात येऊ लागले.

एकोणिसावे शतक

  • १८१२ – नेपोलियन बोनापार्टने रशियावर चढाई केली.
  • १८९३ – युनायटेड किंग्डमच्या युद्धनौका एच.एस.एस. कॅम्परडाउनने एच.एम.एस. व्हिक्टोरियाला धडक दिली. व्हिक्टोरिया ३५८ खलाशी व अधिकाऱ्यांसह बुडाली.
  • १८९७ – चार्ल्स रॅंड याला दामोदर हरी चाफेकर यांनी पुण्यातील जुलमाचा प्रतिशोध म्हणून बंदुकीने गोळ्या घातल्या.
  • १८९८ – स्पॅनिश-अमेरिकन युद्ध – अमेरिकन सैनिक क्युबात उतरले.

विसावे शतक

  • १९११ – जॉर्ज पाचवा तथा पंचम जॉर्ज इंग्लंडच्या राजेपदी.
  • १९३७ – कॅमिल शॉटेम्प्स फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९४० – सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसबाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
  • १९४० – दुसरे महायुद्ध – फ्रांसने जर्मनीसमोर हार पत्करून संधी केली.
  • १९४१ – जर्मनीने रशियावर चढाई केली.
  • १९६२ – एर फ्रांसचे बोईंग ७०७ जातीचे विमान वेस्ट ईंडीझमधील ग्वादालुपे बेटाजवळ कोसळले.
  • १९६३ – पॉल सहावा पोपपदी.
  • १९७६ – कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.
  • १९७८ – प्लुटोचा उपग्रह खारॉनचा शोध लागला.
  • १९८३ – तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडचा उपांत्य फेरीत पराभव केला.
  • १९८३ – तिसऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत वेस्ट ईंडीझने पाकिस्तानचा उपांत्य फेरीत पराभव केला.
  • १९८६ – मेक्सिकोच्या डियेगो माराडोनाने इंग्लंडविरुद्ध हॅंड ऑफ गॉड व गोल ऑफ द सेन्चुरी नावाने प्रख्यात झालेले गोल नोंदवून विजय मिळवला.

एकविसावे शतक

  • २००२ – इराणमध्ये भूकंप. २६१ ठार.

जन्म

  • १७१३ – लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ – वामन कुमार, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १८९६ – बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.
  • १९०८ – डॉ. विष्णू भिकाजी कोलते, महानुभाव साहित्य संशोधक.

मृत्यू

  • १२७६ – पोप इनोसंट पाचवा.
  • १४२९ – गियात अल काशी, पर्शियन अंतराळतज्ञ व गणितज्ञ.
  • १९४० – ब्लाडिमार पी. कोपेन, रशियन हवामानशास्त्रज्ञ.
  • २००१ – डॉ. अरुण घोष, भारतीय अर्थतज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

  • फाशीवाद विरोधी आंदोलन दिन – क्रोएशिया.
  • शिक्षक दिन – एल साल्वादोर.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत-

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान- 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना-

अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥
उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ
सातत्याने भगीरथाच्या पुढे पुढे जाऊ॥१॥
शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन
त्या धैर्याने रघुरायच्या पुढे पुढे जाऊ॥२॥
स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला
चातुर्याने श्रीकृष्णाच्या पुढे पुढे जाऊ॥३॥
धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे
त्या शिवराया साक्ष ठेवुनी पुढे पुढे जाऊ॥४॥
सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या
त्याच पथाने पुढे पुढे जाऊ॥५॥

बोधकथा-

शेतकरी आणि देव
एका गावात एक शेतकरी देवावर खूप नाराज झाला. नाराजीच कारणही तसेच होते कारण कधी पाऊस जास्‍त पडत असे तर कधी पूर्ण दुष्‍काळ, कधी ऊन जास्‍त तर कधी ढगाळ वातावरण, कधी गारा पडून पीकाचे नुकसान होई तर कधी वा-याने उभे पीक आडवे होत असे.
एक दिवस वैतागून त्‍याने देवाला साद घातली व देवास सांगितले,”तुम्‍ही सर्वव्‍यापी प्रभू परमेश्‍वर असाल इतर सर्व गोष्‍टीतले तुम्‍हाला कळत असेल पण माझ्यामते तरी तुम्‍हाला शेतीतले काहीच कळत नाही. एक प्रार्थना तुम्‍हाला मी करतो तुम्‍ही फक्त एक वर्षभर निसर्ग माझ्या ताब्‍यात द्या मग बघा शेती कशी फुलते ते. घरोघरी मी धान्‍यांच्‍या राशी घालतो ते पहाच तुम्‍ही.”
देव हसला आणि म्‍हणाला,”तथास्‍तू, तुझ्या म्‍हणण्‍याप्रमाणे आज,आतापासून मी निसर्गाचा लहरीपणा बंद करून तो तुझ्या ताब्‍यात मी देत आहे. तू तुला जसा पाहिजे तसा ऋतु बनवून घे व शेती कर” इतके बोलून देव निघून गेला.
शेतक-याने या वरदानाचा फायदा घेण्‍यासाठी गहू पेरले, जेव्‍हा त्‍याला जेवढे ऊन पाहिजे होते तेव्‍हा त्‍याने ऊन पाडले, जेव्‍हा त्‍याला पाणी द्यायचे होते तेव्‍हा त्‍याने पावसाचा वर्षाव केला.
प्रचंड ऊन, गारा,पूर, सोसाट्याचा वारा याचा स्‍पर्शही कधी त्‍याने आपल्‍या पीकांना होऊ दिला नाही.

काळ निघून गेला

आणि त्‍याची शेती बहरून आली. शेतक-याला मोठा आनंद झाला. कधी नव्‍हे इतके पीक आले होते. शेतक-याने मनातल्‍या मनात विचार केला की आता देवाला कळेल की शेती कशी केली जाते, उगाचच तो शेतक-यांना कसा त्रास होईल ते वरून पाहत असतो.
पीक कापणीस आले आणि शेतकरी मोठ्या आनंदाने, गर्वात पीक कापणीसाठी शेतात गेला. पीकाला हात लावून पाहिला आणि तो बेशुद्ध होऊनच खाली पडला. कारण गव्‍हाच्‍या त्‍या लोंब्यांमध्‍ये एकही दाणा नव्‍हताच मुळी. पीक नुसते आलेले दिसत होते पण एकही गव्‍हाचा दाणा त्‍यात नव्‍हता.
थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि धाय मोकलून रडू लागला. त्‍याचे काळीज पिळवटणारे रूदन ऐकून परमात्‍मा परमेश्वर तेथे प्रकट झाला आणि म्‍हणाला,’ अरे वेड्या तुला काय वाटले, तू तुझ्या इच्‍छेप्रमाणे जसा पाहिजे तसा वागला म्‍हणून पीक तसे येत नसते.
त्‍या पिकाला तू कधीच संघर्ष करू दिला नाही. सोसाट्याच्‍या वा-यातच पिक उभे राहते तेव्‍हाच त्‍याच्‍यात बळ येते. प्रचंड उन्‍हातही त्‍याच्‍यात जगण्‍याची इच्‍छा बळावते. संकटाशी जोपर्यंत सामना करत नाही तोपर्यंत त्‍याला त्‍याची कुवत कळत नाही.

सगळे जर मनाप्रमाणे घडले तर कोणत्‍याच गोष्‍टीची किंमत राहत नाही.

आव्‍हान मिळाले नाही म्‍हणून तुझ्या पीकात दाणे भरलेच नाहीत. वारा सुटतो, गारा पडतात तेव्‍हाच त्‍या पिकात जगण्‍याची उमेद निर्माण होते आणि ते संघर्ष करून नवीन जीवन निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करते.
तू हे कधीच होऊ दिले नाही म्‍हणून तुझे पीक हे पोकळ निघाले. सोन्याला सुद्धा चकाकी येण्‍यासाठी आधी आगीतून जावे लागते तेव्‍हाच ते चकाकते. हातोडीचे मार सोसावे लागतात तेव्‍हाच सोन्‍याचा उत्‍कृष्‍ट दागिना बनतो.” आता शेतक-याला जीवनाचे सार उमगले होते.
तात्पर्य –
जीवनात जर  यशस्‍वी व्‍हायचे असेल तर संकटांपासून कधीच पळून चालणार नाही. संघर्ष केल्‍यानेच संकटे दूर होतात त्‍याच्‍यापासून दूर पळून नाही.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत-

जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता
जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते जय भक्त ते,
रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता
तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता
बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता
ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित्‌ तारता

बालगीत-

ए आई मला पावसात जाउ दे

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे

कवियत्री : वंदना विटणकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

सामान्यज्ञान

✪  ‘जल्लीकडू महोत्सव’ कुठे साजरा केला जातो ?
 ➜तामिळनाडू.
✪  रेडिओचा शोध कोणी लावला ?
 ➜जी. मार्कोनी.
✪  ‘वाघा बाॅर्डर’ कोणत्या राज्यात आहे ?
 ➜पंजाब.
✪  शेतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?
 ➜ दुग्ध व्यवसाय
✪  अंतराळ संशोधन करणारी अमेरिकेची संस्था कोणती ?
 ➜ नासा

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

प्रार्थना-

  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

देशभक्तीपर गीते-

  1. सारे जन्हां से अच्छा
  2. हम होंगे कामयाब 
  3. बलसागर भारत होवो

अधिक माहितीसाठी-

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags-

#22 june, 22 june 2023, 22 june 2021 panchang, 22 june 2022 special day, 22 june 2023 weather, 22 june 2022 panchang in hindi, 22 june is celebrated as, what is celebrated on 22 june, 22 june 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.