2 Jully | 2 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

2 Jully

2 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– रविवार

दिनांक- 02/07/2023, 2 Jully

मिती- आषाढ शुक्ल 14

शके– 1945

सुविचार- लोकांना ते परत मदत करू शकत नाहीत हे माहित असताना देखील त्यांना मदत करा.

म्हणी व अर्थ – रात्र थोडी सोंगे फार – कामे पुष्कळ, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे.

वाक्प्रचार- हुरहूर लागणे – काळजीने अस्वस्थ होणे.

ठळक घटना आणि घडामोडी

2 जुलै हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८३ वा किंवा लीप वर्षात १८४ वा दिवस असतो.

लीप वर्ष नसलेल्या वर्षांमध्ये २ जुलै हा मध्यबिंदु दिवस आहे. १ जानेवारी ते १ जुलै, १८२ दिवस होतात आणि ३ जुलै ते ३१ डिसेंबर १८२ दिवस होतात. तर ३६५ दिवसात २ जुलै हा मध्यबिंदु दिवस असतो.

२ जुलै दुपारी १२ची वेळ ही पूर्ण वर्षाची मध्य वेळ असते. वेगवेगळ्या देशातील वेळमापनातील प्रत्यक्ष फरक त्या त्या प्रमाणात असतो.

एकविसावे शतक

  • २००० – मेक्सिकोमध्ये ७० वर्षे पार्तिदो रेव्होल्युसियोनारियो इन्स्तित्युसियोनाल या पक्षाच्या सत्तेचा अंत होउन पार्तिदो ॲक्सियॉं नॅसियोनाल पक्षातर्फे व्हिसेंते फॉक्सची राष्ट्राध्यक्षपदी निवड.
  • २००१ – ॲबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण.
  • २००२ – स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
  • २०१० – कॉंगोच्या लोकशाही प्रजासत्ताकात ट्रकचा स्फोट होउन किमान २३० व्यक्ती ठार.

जन्म

  • ४१९ – व्हॅलेंटिनियन तिसरा, रोमन सम्राट.
  • १०२९ – अल-मुस्तांसिर, कैरोचा खलिफा.
  • १८२१ – चार्ल्स टपर, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
  • १८६२ – विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८७६ – विल्हेल्म कुनो, जर्मनीचा चान्सेलर.
  • १८७७ – हेर्मान हेस, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.
  • १८८० – गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.
  • १९०३ – ऍलेक डग्लस-होम, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९०३ – ओलाफ पाचवा, नॉर्वेचा राजा.
  • १९०४ – रेने लाकोस्त, फ्रेंच टेनिस खेळाडू.
  • १९०६ – हान्स बेथ, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन अणुभौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०८ – थरगूड मार्शल, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.
  • १९२५ – पॅत्रिस लुमुम्बा, कॉंगोचा पंतप्रधान.
  • १९२९ – इमेल्दा मार्कोस, फिलिपाईन्सच्या राष्ट्राध्यक्ष मार्कोसची पत्नी.
  • १९३० – कार्लोस मेनेम, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३२ – डेव्ह थॉमस, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४२ – व्हिसेंते फॉक्स, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८६ – लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू

  • १९२८ – नंदकिशोर बल, उडिया भाषेतील कवी, कादंबरीकार.
  • १९३२ – मनुएल दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १९६३ – सेट बार्नेस निकोल्सन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ.
  • १९९६ – राजकुमार, हिंदी अभिनेता.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

सवय  
  एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई.
अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्याच्या हातून ते तसेच उघडे राहिले होते.
माणसाला अचानक काही काम आल्याने तो ते दार उघडे टाकून निघून गेला असता पोपट पिंज-याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते.
एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्या ने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते.
पिंज-यात आयते खायची सवय असल्यााने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
तात्पर्य:  गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
 ~प्रेम धवन

बालगीत

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होईल काय
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥१॥
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आठवड्यात रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥२॥
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥३॥
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
गीतकार : मंगेश पाडगावकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) आहार  म्हणजे  काय ?
उत्तर: दिवसभरात आपण जे खाद्यपदार्थ खातो व पेय पदार्थ पितो त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात.
२) कोकणात जास्त  काय पिकतो ?
उत्तर : कोकणात भात भरपूर पिकतो .
३) कोकणातील लोकांच्या आहारात काय असते?
उत्तर : कोकणातील लोकांच्या आहारात मासे व भात असतो.
४) खूप भूक कोणती कामे केल्यावर लागते ?
उत्तर : अंगमेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते.
५ ) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो ?
उत्तर : ओला हरभरा बाजारात हिवाळा ऋतूत येतो.

ENGLISH QUESTION

1)What is your favourite colour ?
– Green / Pink / Yellow
2)What is your favourite friend ?
– Sudam/ Mahesh / Manisha
3)What is your favourite teacher ?
– Mr.Dighe / Kadam / Bhagwat
4)What is your favourite game ?
 – Cricket/ Kabaddi
5) What is your favourite prayer ?
– Deva tuze kiti / Satyam shivam sundra/ Dehachi tijori

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#2 jully, 2 jully2023, 2 jully 2021 panchang, 2 jully 2022 special day, 2 jully 2023 weather, 2 jully 2022 panchang in hindi, 2 jully is celebrated as, what is celebrated on 2 jully, 2 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.