2 august | ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

2 august

2 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक- 02/08/2023, 2 ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 2

शके– 1945

सुविचार- खरा मित्र आपली पुस्तके होय.

A true friend is your books.

म्हणी व अर्थ : कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ :- आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत.

वाक्प्रचार- हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१४ वा किंवा लीप वर्षात २१५ वा दिवस असतो.

अठरावे शतक

  • १७९० – अमेरिकेतील पहिली जनगणना सुरू.

एकोणिसावे शतक

  • १८६९ – जपानमधील वर्णसंस्थेचा शेवट.

विसावे शतक

  • १९१६ – पहिले महायुद्ध – इटलीची लिओनार्डो दा व्हिन्ची ही युद्धनौका बुडाली.
  • १९३४ – ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध – पॉट्ट्सडॅम परिषदेची सांगता.
  • १९८० – इटलीतील बोलोन्या शहराच्या रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट. ८५ ठार, २०० जखमी.
  • १९८५ – डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.
  • १९९० – इराकने कुवैतवर आक्रमण केले.

एकविसावे शतक

  • २००५ – एर फ्रांस फ्लाइट ३५८ हे एरबस ए.३०० प्रकारचे विमान कॅनडातील टोरोंटो आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यावर धावपट्टीवरून घसरले. विमान नष्ट परंतु सर्व प्रवासी बचावले.

जन्म

  • १६९६ – महमूद पहिला, ओट्टोमन सम्राट.
  • १८६८ – कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.
  • १९२८ – माल्कम हिल्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३२ – पीटर ओटूल, आयरिश अभिनेता.
  • १९५८ – अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ – मोहम्मद झहीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ६८६ – पोप जॉन पाचवा.
  • ११०० – विल्यम दुसरा, इंग्लंडचा राजा.
  • १५८९ – तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
  • १६११ – केटो कियोमासा, जपानी सामुराई.
  • १९२३ – वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन

  • वायु सेना दिन – रशिया.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

मूर्ख बोकड
एका जंगलामध्ये एक विहीर होती. ती सहजासहजी दिसून येत नसे. चालता चालता एके दिवशी एक कोल्हा त्या विहिरी मध्ये पडला आणि मदतीसाठी हाका मारू लागला.
त्या विहिरी मध्ये पाणी जास्त नव्हते त्यामुळे तो बुडला नाही. परंतु त्याला वर येता येईना. त्यामुळे तो मदतीसाठी इतरांना हाका मारू लागला. ‘वाचवा वाचवा मला कोणीतरी बाहेर काढा’.
परंतु खूप वेळ झाले तिथे कोणीच फिरकले नाही. खूप खूप उशिरा नंतर एक बोकड तेथून चालले होते. त्याने त्या विहिरीमध्ये सहज डोकावून पाहिले तर त्याला आतमध्ये कोल्हा दिसला.
बोकडाने कोल्ह्याला विचारले ,”कोल्हे दादा तू काय करतो आहेस विहिरीमध्ये?”
कोल्ह्याला एक युक्ती सुचली त्याने बोकडाला खरे न सांगता खोटे सांगितले. म्हणाला, “अरे या विहिरीतील पाणी खूप गोड आहे. तुला प्यायचे का या विहिरीचे पाणी?
मी तर खूप वेळ झाले हे पाणी पीत आहे. ये तू पण हे पाणी प्यायला.”
हे ऐकून मूर्ख बोकडाला समजले नाही ,की हा कोल्ह्याचा कावा आहे.
त्यामुळे त्या बोकडाने विहिरीमध्ये उडी मारली. बोकडाने विहिरीमध्ये उडी मारता क्षणीच कोल्हा त्याच्या पाठीवर चढून वरती निघून गेला. आणि आणि बोकडाला म्हणाला,”मूर्ख बोकडा बस आता तू एकटाच पाणी पीत.”
अशाप्रकारे बोकडाची मदत न करता उलट त्याला संकटात टाकून कोल्हा निघून गेला.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

एका माकडाने काढलंय दुकान आली गिऱ्हाईके छान छान
मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे
अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय
कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा
माकड म्हणाले लावून गंध आता झालंय दुकान बंद

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) ॠतूची नावे सांगा.
उत्तर : पावसाळा, हिवाळा, उन्हाळा
२) उन्हाळ्यात आपण कोणते कपडे वापरतो ?
उत्तर : सुती
३) हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून कोणते कपडे वापरतो ?
उत्तर: उबदार
४) पावसाळ्यात बाहेर जातांना अंग भिजू नये म्हणून आपण काय वापरतो?
उत्तर: छत्री, रेनकोट, इरले
५) झाडाची पाने कोणत्या ऋतूत गळतात?
उत्तर : हिवाळ्यात

ENGLISH QUESTION

1) Which is the national animal of India?
Ans : Tiger
2) Which is the state animal of Maharashtra?
Ans : Giant Squirrel
3) Which is the fastest running animal?
Ans : Leopard
4) Who is called the king of animals?
Ans : Lion
5) Which animal is the tallest in the world?
Ans : Giraffes

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#2 august, 2 august 2023, 2 august 2021 panchang, 2 august 2022 special day, 2 august 2023 weather, 2 august 2022 panchang in hindi, 31 august is celebrated as, what is celebrated on 2 august, 2 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.