16 october |16 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

16 october

16 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 16/10/2023, 16 ऑक्टोबर

मिती-  आश्विन शुक्ल 2

शके– 1945

सुविचार- “उद्याचा उगवणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट करता येतात.”.

म्हणी व अर्थ – मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही- प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही.

वाक्यप्रचार- कपाळाला हात लावणे- हताश होणे, तनराश होणे. 

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८९ वा किंवा लीप वर्षात २९० वा दिवस असतो.

अठरावे शतक

  • १७७५ – ब्रिटीश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलंड शहर जाळले.
  • १७९३ – मेरी आंत्वानेतला गिलोटिनखाली मृत्युदंड.

एकोणिसावे शतक

  • १८६९ – कार्डिफ जायंटचा शोध.

विसावे शतक

  • १९०५ – लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करण्याचा हुकुम सोडला.
  • १९१६ – मार्गारेट सॅंगरने प्लॅन्ड पेरंटहूड या संस्थेची स्थापना केली.
  • १९२३ – वॉल्ट डिझ्नीने आपला भाऊ रॉय डिझ्नी बरोबर द वॉल्ट डिझ्नी कंपनीची स्थापना केली.
  • १९५१ – पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान लियाकत अली खानची रावळपिंडीमध्ये हत्या.
  • १९५६ – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा चंद्रपूर येथे आपल्या सुमारे ३ लक्ष अनुयायांसोबत तिसऱ्यांदा नवयान बौद्ध धम्मात प्रवेश.
  • १९७८ – जॉन पॉल दुसरा पोपपदी.
  • १९९१ – कायलीन, टेक्सास येथे जॉर्ज हेनार्डने एका हॉटेलात अंदाधुंद गोळ्या चालवून २३ लोकांना ठार मारले व २० जखमी केले.
  • १९९६ – ग्वाटेमाला सिटीतील एस्तादियो मातियो फ्लोरेस या ३६,००० लोकांच्या क्षमतेच्या स्टेडियममध्ये ४७,००० लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. चेंगराचेंगरीत ८४ ठार, १८० जखमी.
  • १९९८ – चिलीच्या भूतपूर्व हुकुमशहा जनरल ऑगुस्तो पिनोशेला खुनाच्या आरोपाखाली लंडनमध्ये अटक.

जन्म

  • १४३० – जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
  • १८४० – कुरोदा कियोताका, जपानी पंतप्रधान.
  • १८५४ – ऑस्कर वाइल्ड, आयरिश लेखक.
  • १८७६ – जिमी सिंकलेर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८८६ – डेव्हिड बेन-गुरियन, इस्रायेलचा पहिला पंतप्रधान.
  • १८९० – अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.
  • १९१४ – झहीर शाह, अफगाणिस्तानचा राजा.
  • १९४० – दिलीप देविदास भवाळकर, पद्मश्री पुरस्कार विजेते मराठी भौतिकशास्त्रज्ञ
  • १९४४ – बॉब कॉटॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४८ – हेमा मालिनी, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९५८ – टिम रॉबिन्स, अमेरिकन अभिनेता.
  • १९५९ – अजय सरपोतदार, मराठी चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक.
  • १९७१ – डेव्हिड जॉन्सन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७५ – जॉक कॅलिस, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७५ – सदागोपान रमेश, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १३५५ – लुई, सिसिलीचा राजा.
  • १५९१ – पोप ग्रेगरी चौदावा.
  • १७९६ – व्हिक्टर आमाद्युस, सव्हॉयचा राजा.
  • १८९३ – पॅत्रिस मॅकमहोन, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५० – वि. ग. केतकर,पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक.
  • १९५९ – जॉर्ज सी. मार्शल, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री, मार्शल प्लॅनचे उद्गाता.
  • १९९९ – मोशे दायान, इस्रायेली सेनापती.
  • १९९७ – जेम्स मिशनर, अमेरिकन लेखक.

प्रतिवार्षिक पालन

  • जागतिक अन्न दिन.
  • जागतिक बधिरीकरण दिन.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

चतुर बिरबल
एके दिवशी, एक श्रीमंत व्यापारी बिरबलकडे आला आणि म्हणाला, माझ्या घरी कोणीतरी चोरी केली व माझे दागिने चोरले आहेत. माझ्या घरी एकूण दहा नोकर आहेत.
त्यांच्यापैकीच कोणीतरी ते चोरले असल्याचा माझा संशय आहे. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारले, पण त्यातील एकही कबूल झाला नाही. कृपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा.
बिरबल त्या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने त्या दहाही नोकरांना एकत्र बोलावले व त्यांना म्हणाला, की माझ्याकडे दहा जादूच्या काठया आहेत. त्या मी तुम्हाला देत आहे.
या काठयांचे वैशिष्टय म्हणजे सर्व काठया समान आहेत. मी त्या तुम्हाला देत आहे. आज तुमच्याकडे ठेवा व उदया मला परत करा. ज्याने चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत एक इंचाने वाढेल.
दागिने चोरणारा नोकर घाबरला. आपली चोरी पकडली जाईल म्हणून तो काठी एक इंचाने कापतो. त्याला वाटते की सकाळी ती परत एक इंचाने वाढेल व कुणाला काही कळणार नाही.
दुसऱ्या दिवशी बिरबलाने नोकरांच्या हातातील काठया पाहिल्या.
त्याला एका नोकराची काठी छोटी झाल्याचे आढळले. त्याच्याकडे बोट दाखवत बिरबल म्हणाला, ‘हा नोकर चोर आहे.
त्यानेच तुमचे दागिने चोरले आहे.’
शेवटी, त्या नोकरानेही ते कबूल केले व त्या व्यापाऱ्याचे दागिने परत केले.
तात्पर्य – करावे तसे भरावे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : चंदिगड
२) हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : सिमला
३) जम्मू काश्मिर राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : श्रीनगर
४) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
५) केरळ राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : तिरूअनंतपुरम

इंग्रजी प्रश्न

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#16 october, 16 october 2023, 16 october 2021 panchang, 16 october 2022 special day, 16 october 2023 weather, 16 october 2022 panchang in hindi, 16 october is celebrated as, what is celebrated on 16,16 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.