16 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

16 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- सोमवार,

दिनांक- 16/01/2023,

मिती- पौष कृ.9

शके– 1944,

सुविचार- लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

म्हणी व अर्थ-
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
-अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे.

आजचा दिनविशेष-

छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन

ठळक घटना आणि घडामोडी-

२७ – रोमन सेनेटने ऑक्टाव्हियस सीझरला ऑगस्टस ही पदवी बहाल केली.

दहावे शतक-

९२९ – कोर्दोबाच्या अब्द अर् रहमान तिसऱ्याने स्वतःला खलिफा जाहीर केले. कोर्दोबाच्या खिलाफतीची ही सुरुवात होय.

सोळावे शतक-

१५४७ – ईव्हान द टेरिबल(भयंकर ईव्हान) रशियाच्या झारपदी.

१५५६ – फिलिप दुसरा स्पेनच्या राजेपदी.

१५८१ – इंग्लंडच्या संसदेने रोमन कॅथोलिक धर्माला बेकायदा जाहीर केले.

सतरावे शतक-

१६०५ – मिगेल सर्व्हान्तेसचे एल इन्जिनियोसो हिदाल्गो डॉन किहोते दीला मान्चा(डॉन किहोतेचे पहिले पुस्तक) प्रकाशित. पुढे याचे इंग्लिशमध्ये ऍड्व्हेन्चर्स ऑफ डॉन क्विक्झोट नावाने भाषांतर झाले.

१६८१ – छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक झाला.

अठरावे शतक-

१७६१ – ब्रिटीश सैन्याने पॉॅंडिचेरी फ्रांसकडून जिंकले.

१७८० – अमेरिकन क्रांती – केप सेंट व्हिन्सेन्टची लढाई.

विसावे शतक-

१९१७ – पहिले महायुद्ध – जर्मन परराष्ट्रसचिव आर्थर झिमरमनने मेक्सिकोला अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी तार पाठवली.

१९१९ – अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.

१९५५ – नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.

१९७८ – भारतातील १,००० रुपये आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द केल्या गेल्या.

१९७९ – ईराणच्या शहा मोहम्मद रझा पेहलवीने कुटुंबासहित इजिप्तला पळ काढला.

१९९२ – एल साल्व्हाडोर सरकार व क्रांतिकारकांनी मेक्सिको सिटीत चापुल्तेपेकचा तह मान्य केला व १२ वर्षे चाललेले गृहयुद्ध संपवले.

१९९५ – आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.

१९९६ – भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.

१९९६ – पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड

१९९८ – उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.

एकविसावे शतक-

२००१ – कॉॅंगोचा अध्यक्ष लॉरें-डेझरे कबिलाची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या.

२००२ – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने एकमताने ओसामा बिन लादेन व ईतर तालिबान विरुद्ध ठराव संमत केला.

२००३ – स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू.

२००५ – ६६ वर्षांच्या एड्रियाना ईलेस्कुने मुलीला जन्म दिला व आत्तापर्यंतची सर्वात जास्त वयाची माता ठरली.

२००६ – एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष.

२००८ – टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या ‘पीपल्स कार’चे अनावरण

जन्म-

१४०९ – रेने पहिला, नेपल्सचा राजा.

१४७७ – योहान्स शोनर, जर्मन अंतराळतज्ञ व नकाशेतज्ञ.

१८५३ – आंद्रे मिशेलिन, फ्रेंच उद्योगपती.

१८५५ – अलेक्झांडर वेब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८७६ – क्लॉड बकेनहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९११ – इव्हान बॅरो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९१९ – सैयद अब्दुल मलिक, असमिया साहित्यिक.

१९२० – वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.

१९२० – नानाभॉय अर्देशीर ऊर्फ नानी पालखीवाला, भारतीय कायदेपंडित आणि अर्थतज्ञ

१९२६ – ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर, भारतीय संगीतकार.

१९३१ – योहान्स रौ, जर्मन राष्ट्राध्यक्ष.

१९४६ – कबीर बेदी, भारतीय अभिनेता.

१९५२ – फुआद दुसरा, इजिप्तचा राजा.

१९५६ – वेन डॅनियल्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९७१ – हामिश ॲंथोनी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

१७१० – हिगाशीयामा, जपानी सम्राट.

१९०१ – महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ.

१९१९ – फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.

१९३८ – शरत्चंद्र चतर्जी, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.

१९५४ – बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.

१९५७ – आर्तुरो तोस्कानिनि, इटालियन संगीतकार.

१९६६ – साधू वासवानी, भारतीय आध्यात्मिक गुरू.

१९८८ – लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.

१९९७ – डॉ. दत्ता सामंत, मुंबईतील कामगार नेते.

२००० – त्रिलोकीनाथ कौल, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत

२००१ – पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.

२००३ – रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती.

२००५ – श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.

प्रतिवार्षिक पालन-

मार्टिन लुथर किंग दिन – अमेरिका.

शिक्षक दिन – थायलंड.

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

ऐ मालिक तेरे बन्दे हम
ऐसे हों हमारे करम
नेकी पर चलें और बदी से टलें
ताकि हंसते हुए निकले दम
ये अंधेरा घना छा रहा
तेरा इंसान घबरा रहा
हो रहा बेखबर, कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रोशनी में जो दम
तो अमावस को कर दे पूनम
नेकी पर…
जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें, हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम
नेकी पर…
बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमें जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म
नेकी पर..

मनाचे श्लोक

नव्हे कर्म ना धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
करी काम निष्काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता। हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥
अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥
मना पावना भावना राघवाची। धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥
धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सागराते॥
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

बोधकथा-

सेवा हाच धर्म
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्यात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्या पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.
या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्या संदर्भात चर्चा केली. दुष्काळग्रस्तांसाठी चाललेल्याा मदत कार्याची माहिती घेतली. त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली.
ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वामीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य‍ अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.”
यावर स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्यापेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे.
तात्पर्य : रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत-

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

सामान्यज्ञान

1) How many colors are there in the national flag of India?
Three
2) Which color is at the top of the national flag of India?
Saffron
3) Which color is in the center of the national flag of India?
White
4) Which is the lowest color in the national flag of India?
Green
5) How many spoke are there in Ashoka Chakra in India’s national flag?
24

किल्ले माहिती-

माहिमचा किल्ला

माहिमहून वांद्रयाकडे जाताना जिथे माहिमची हद्द संपते त्याच्या किंचित आधी समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. वांद्रयाच्या दक्षिण किनाऱ्यावरुनही हा किल्ला स्पष्टपणे दिसतो.

या किल्ल्याचे बाह्यांग मुंबईतील 15व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळे आहे. विशेषत: या किल्ल्याचे बुरुज एतद्देशीय किल्ल्यांसारखेच आहेत. त्यावरुन किल्ल्याच्या तलविन्यासाची बाह्यरेषा मूळ किल्ल्याचीच (म्हणजे मुसलमानांनी बांधलेल्या किल्ल्याचीच) असावी असा निष्कर्ष निघतो.

ब्रिटिशांनी ज्यावेळी 1701-1702 या काळात किल्ल्याची पुर्नउभारणी केली खंड, दोन खंडांच्यामधील भागांमध्ये असलेले दिवे किंवा पणत्या ठेवण्यासाठी असलेले चौकोनी कोनाडे व तोफांकरता असलेल्या खाचांच्या तळाशी सांडपाणी जाण्यासाठी असलेले नलिकांच्या स्वरुपातील मार्ग ही भारतातील पाश्चिमात्य दुर्गशैलीची खास वैशिष्ट्ये या किल्ल्यात आढळतात.

या किल्ल्याच्या तलविन्यास सर्वसाधारणपणे चौकोनी असून तटबंदीची जाडी सुमारे चार मीटर आहे. अंतर्भागातील जागाही चौकोनीच आहे. या उपरोक्त वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला ब्रिटिशांनी स्वत:ला अनुरुप करुन घेतला असे म्हणता येईल. मात्र असे करताना बरेचसे वास्तुघटक एतद्देशीय धाटणीचेच राहून गेले आहेत. याचाच अर्थ ही पुर्नउभारणी आमूलाग्र स्वरुपाची नसून अंशात्मक प्रकारची होती.

या किल्ल्याची तटबंदी 25 फुटांहून अधिक उंचीची असून त्याला एकूण तीन बुरुज आहेत. एकेकाळी आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खोल्या व धान्याची कोठारे होती. एकंदरीत या किल्ल्याचे वास्तुस्वरुप चौकी सारखे नसून रुढार्थाने ज्याला किल्ला म्हणता येईल असे होते.

आश्यर्याची बाब

अशी की हा किल्ला अगदी समुद्रालगत असूनही थेट समुद्रातून गलबतांमार्फत ये-जा करता येऊ शकेल अशी कोणतीही सोय या किल्ल्याला दिसत नाही. किनाऱ्यावर उतरुन थोडे आत येऊनच किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे जाता येते. आज या किल्ल्यात इतकी प्रचंड प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत की आपण किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागातून फिरतो आहे हेही समजणे अशक्य होऊन बसले. जेमतेम दोन माणसे कसरत करुन एकाच वेळी जाऊ शकतील असे बोळ आणि सर्व बाजूंनी दुमजली झोपड्या अशी स्थिती आहे. खुद्द प्रवेशद्वाराच्या रुंदीचा 75 हून अधिक भाग एका झोपडीने व्यापला आहे. साहजिकच अशा स्थितीत किल्ल्याची अतिक्रमण होण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे व बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे असलेला नकाशा व बाहेरुन दिसणारा किल्ला एवढ्यावरुनच त्याचे वर्णन करण्यात आहे.

या जुन्या छायाचित्रांवरुन वरळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घंटेकरता बांधलेली कमान होती असे दिसते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात करुन घेण्यात आलेल्या ठराविक अंतरावर येणाऱ्या तोफांच्या खाचा, दोन खाचांच्यामध्ये असलेल्या दगडी कठड्यात दिवे ठेवण्याकरता चौकोनी कोनाडे हीही वैशिष्ट्ये होती असे दिसते. मात्र या चौकोनी कोनाड्यांचा तळभाग वरळीच्या किल्ल्यातील तटांच्या कोनाड्यांप्रमाणे अर्धवर्तुळाकार नसून साधा सपाट आहे. छायाचित्रांचे विस्तरण (एन्लार्जमेंट) व हा किल्ला ज्यांनी अतिक्रमणपूर्व काळात पाहिला आहे अशांनी दिलेली माहिती यावरुन ही बाब निश्चितपणे सांगता येते. काही छायाचित्रांवरुन तटबंदीच्या रुंदीवर किंवा निदान रुंदीच्या आतील भागात तरी काही दालने होती असे दिसते.

हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हा किल्ला किल्ला म्हणून कार्यरत होता त्याकाळी (म्हणजे मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी) किल्ल्याच्या उत्तरेस वांद्रे आणि सालसेट बेटे होती तर दक्षिणेस वरळी बेट होते. या मधल्या सागरी भागातून होणाऱ्या नौकानयनावर या किल्ल्यावरुन नियंत्रण ठेवता येत असे.

मुळातील एतद्देशीय किल्ला व त्यानंतर ब्रिटीशांनी केलेले बदल यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. अर्थात आधीच नमूद केल्याप्रमाणे हे बदल अंशात्मक आहेत. म्हणूनच माहिम किल्ल्याचा अंतर्भाव एतद्देशी किल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे.

व्यक्तीविशेष-

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले

(१४ मे १६५७ – ११ मार्च १६८९) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

बालपण-

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले.

संभाजी महाराजांच्या आई, महाराणी सईबाईंचे निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील गाडे ही कुणब्याची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीं महाराजांचा सांभाळ त्यांची आज्जी राजमाता जिजाबाई यांनी केला.

त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई सोयराबाई यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.

अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजी महाराज अत्यंत देखणे आणि शूर होते. तसेच ते अनेक भाषांत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले होते. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजी राजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

तारुण्य-

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.

तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजी महाराजांचा अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजी महाराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले.

दरबारातील काही मानकरी संभाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले; हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या सांगण्यावरून केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजी महाराजांना पाठवावे लागले.

मुद्रा व दानपत्र-

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||

अर्थ: छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची ही राजमुद्रा जणू काही स्वर्गीय तेजाने तळपत आहे, आकाशाप्रमाणे अमर्याद आहे. या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस, प्रत्येक प्राणिमात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. छत्रपतींच्या या राजमुद्रेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही.

संभाजी महाराजांना साधुसंतांबद्दल आदरभाव होता. ज्येष्ठ मांत्रिक कुडाळ ग्रामनिवासी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री यांना करून दिलेल्या संस्कृतमधील दानपत्रावरून त्यांचा आदरभाव कळतो. छत्रपती संभाजी महाराजांना राजपद महत्‌प्रयासाने प्राप्त झाले होते. त्यांनी राजपद प्राप्तीसाठी नवस केला होता आणि त्यांना राज्याधिकार मिळाल्यानंतर तो नवस फेडण्याच्या इच्छेने त्यांनी नामदेवभट्टपुत्र बाकरेशास्त्री (ज्यांना संभाजी महाराज स्वामी म्हणतात) यांना दरसाल १०,००० पादशाही होनांचे संस्कृत दानपत्र करून दिले. हे दानपत्र संभाजी महाराजांच्या मंचाकारोहणानंतर एका महिन्याने म्हणजे दि. २४ ऑगस्ट १६८० (भाद्रपद शुद्ध १० सोमवार शके १६०२) रोजी केले आहे. दानपत्र ३०० से.मी. लांब आणि २३.५ से.मी. रुंद आहे. या दानपत्राच्या सर्वात वर मधोमध संभाजी महाराजांची १६ बुरुजी मुद्रा आहे व खाली सुवाच्य अक्षरात संस्कृतमध्ये २ ओळी लिहिल्या आहेत. त्या स्वतः शंभूराजांच्या हस्ताक्षरातील आहेत.

त्या ओळी खालीलप्रमाणे :

|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||

यात ते तत्कालीन दानपत्र लेखन पद्धतीप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या व स्वतःच्या पराक्रमाचे व सद्गुणांचे वर्णन अतिशय सार्थ अशा शब्दांमध्ये करतात. आपले पणजोबा मालोजीराजे यांना शूरश्रेष्ठ व देवब्राम्हण प्रतिपालक असे संबोधतात तर आपले आजोबा महाराज शाहजीराजांस निशायुद्धप्रवीण, तसेच ‘हैन्दवधर्मजीर्णोद्धाकरणघृतमति’ म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालून हिंदवी (हिंदू) धर्माचा जीर्णोद्धार करणारा असे संबोधतात. आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘म्लेंव्छक्षयदीक्षित’ म्हणजे आपल्या तारुण्यातच ज्यांनी म्लेंछ क्षयाची दीक्षा घेतली व अनेक ताम्रांना पराभूत केले असा करतात. यावरून छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयी वाटणाऱ्या भावनेचे यथार्थ दर्शन होते.

धार्मिक धोरण-

दि. ६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराजांनी गोपळभट अग्निहोत्री महाबलेश्वरकर यांच्या पुत्रास लिहिलेल्या पत्रात एक अतिशय समर्पक असे वाक्य आले आहे. ते वाक्य असे, ..राजश्री आबासाहेबांचे जे संकल्पित आहे ते चालवावे हे आम्हास अगत्य.  युवराज शंभू राजे छत्रपती झाल्यानंतर त्यांचे अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचा जर कुणी आढावा घेतला तर त्याला पदोपदी या वाक्याची प्रचीती येते. त्यांचे राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहितदक्षता या सर्व बाबींमध्ये त्यांनी आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. या प्रमाणेच त्यांच्या धार्मिक धोरणावरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा कोरलेला आढळतो.

औरंगजेबाची दख्खन मोहीम-

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला.औरंगजेबाचे सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे साम्राज्य संभाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. त्याकाळी जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

इ.स. १६८७-८८ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्यामुळे परिस्थिती कठीण झाली होती.

दगाफटका-

इ.स. १६८९च्या सुरुवातीला संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. १ फेब्रुवारी, इ.स. १६८९ रोजी बैठक संपवून संभाजी महाराज रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने नागोजी माने यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजी महाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

महाराजांना वाचवण्याचे प्रयत्न-

छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेल्यानंतर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही. महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले.

शारीरिक छळ व मृत्यू-

त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड, आता धर्मवीरगड येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन केल्यास जीवदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. तरीसुद्धा संभाजी महाराजांनी हार मनली नाही.

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.