17 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

17 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- मंगळवार,

दिनांक- 17/01/2023,

मिती- पौष कृ.10

शके– 1944,

सुविचार- शिक्षण ही जग बदलण्याची शक्ती आहे.

म्हणी व अर्थ-
जमिनीचे फूल, चालवी जगाची चूल-
अर्थ:- जमिनीच्या वरच्या थरात पिके पिकतात.

आजचा दिनविशेष-

जागतिक धर्म दिन

ठळक घटना आणि घडामोडी-

अठरावे शतक-

१७७३ – कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले.

१७८१ – अमेरिकन क्रांती – जनरल डॅनियल मॉर्गनच्या अमेरिकन सैन्याने लेफ्टनंट कर्नल बानास्ट्रे टार्ल्टनच्या ब्रिटीश सैन्याला हरवले.

एकोणिसावे शतक-

१८१९ – सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला.

१८५२ – युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेतील बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले.

१८९३ – लॉरिन ए. थर्स्टनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या नागरिक समितीने हवाईच्या राणी लिलिउओकालानीचे राज्य उलथवले.

१८९९ – अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील वेक आयलंडचा ताबा घेतला.

विसावे शतक-

१९१२ – अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला.

१९१७ – अमेरिकेने डेन्मार्ककडून व्हर्जिन आयलंड २,५०,००,००० डॉलरला विकत घेतले.

१९४५ – रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.

१९४५ – रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ कॉंन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरुवात केली.

१९४६ – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.

१९५० – बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.

१९५६ – बेळगाव – कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.

१९६६ – स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ जातीच्या विमानात टक्कर. बी.५२ मधून तीन ७० कि.टन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब जमिनीवर पडले व एक समुद्रात.

१९७३ – फिलिपाईन्सने फर्डिनांड मार्कोसला आजन्म अध्यक्ष घोषित केले.

१९९१ – आखाती युद्ध – ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म पहाटे सुरू. इराकने इस्रायेल वर ८ स्कड क्षेपणास्त्रे सोडली. इस्रायेलकडून प्रत्युत्तर नाही.

१९९१ – ओलाफ पाचव्याच्या मृत्यूनंतर हॅराल्ड पाचवा नॉर्वेच्या राजेपदी.

१९९४ – नॉर्थरिज, कॅलिफोर्नियात ६.९ मापनाचा भूकंप.

१९९५ – जपानमधील कोबेत ७.३ मापनाचा भूकंप. ६,४३३ ठार. अपरिमित वित्तहानी.

२००२ – कॉॅंगोमधील माउंट न्यिरागोन्गो या ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००,००० बेघर.

एकविसावे शतक-

२००१ – मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर.

जन्म-

१५०५ – पोप पायस पाचवा.

१७०६ – बेंजामिन फ्रॅंकलिन, अमेरिकन लेखक, संशोधक, प्रकाशक व राजदूत.

१८९५ – विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.– रविकिरण मंडळातील एक कवी

१८९९ – अल कपोन, अमेरिकन माफिया.

१९०५ – दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.

१९०६ – शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका.

१९०८ – एल.व्ही. प्रसाद तथा अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव, हिंदी चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.

१९०८ – ब्रायन व्हॅलेन्टाइन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९१३ – यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९१७ – एम. जी. रामचंद्रन, तमिळ चित्रपट अभिनेता आणि तामिळनाडुचे मुख्यमंत्री.

१९१८ – सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’’कमाल अमरोही’’, हिंदी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी.

१९१८ – रुसी मोदी, टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक.

१९२५ – अब्दुल कारदार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९२६ – क्लाइड वॉलकॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९२८ – केन आर्चर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९३१ – जेम्स अर्ल जोन्स, अमेरिकन अभिनेता.

१९३२ – मधुकर केचे, मराठी साहित्यिक.

१९३९ – अंताव डिसूझा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९४२ – मुहम्मद अली, ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करून मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.

१९७७ – मॅथ्यू वॉकर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू-

३९५ – थियोडोसियस पहिला, रोमन सम्राट.

१७७१ – गोपाळराव पटवर्धन, पेशव्यांचे सरदार

१८२६ – हुआन क्रिसोस्तोमो अर्रियेगा, स्पॅनिश संगीतकार.

१८९३ – रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा १९वा राष्ट्राध्यक्ष.

१९६१ – पॅट्रिस लुमुम्बा, कॉंगोचा पंतप्रधान.

१९७१ – बॅ. नाथ पै, भारतीय स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ

२००० – सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.

२००५ – झाओ झियांग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.

२०१० – ज्योति बसू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री.

२०१३ – ज्योत्स्‍ना देवधर, मराठी व हिंदी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या.

२०१४ – सुचित्रा सेन, बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री.

२०२० – बापू नाडकर्णी, भारतीय क्रिकेट खेळाडू

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

ऐ मालिक तेरे बन्दे हम
ऐसे हों हमारे करम
नेकी पर चलें और बदी से टलें
ताकि हंसते हुए निकले दम
ये अंधेरा घना छा रहा
तेरा इंसान घबरा रहा
हो रहा बेखबर, कुछ न आता नज़र
सुख का सूरज छुपा जा रहा
है तेरी रोशनी में जो दम
तो अमावस को कर दे पूनम
नेकी पर…
जब ज़ुल्मों का हो सामना
तब तू ही हमें थामना
वो बुराई करें, हम भलाई भरें
नहीं बदले की हो कामना
बढ़ उठे प्यार का हर कदम
और मिटे बैर का ये भरम
नेकी पर…
बड़ा कमज़ोर है आदमी
अभी लाखों हैं इसमें कमी
पर तू जो खड़ा, है दयालू बड़ा
तेरी किरपा से धरती थमी
दिया तूने हमें जब जनम
तू ही झेलेगा हम सबके ग़म
नेकी पर..

मनाचे श्लोक

 नव्हे कर्म ना धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥
 म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥
 करी काम निष्काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥
 करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता। हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥
 अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही ॥
 महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥
 मना पावना भावना राघवाची। धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥
 भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥
 धरा श्रीवरा त्या हरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सागराते॥
 सरा वीसरा त्या भरा दुर्भराते। करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥

बोधकथा-

विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे. वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.
एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता. पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता.
त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले, “हे तू काय केले आहेस? मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.” आता अजय घाबरला.
कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते.अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली.
इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.
तात्पर्य – लक्षपूर्वक आणि विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केल्याने सर्व संकटावर मात करता येते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।धृ.।।
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा।।
अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा।।
भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी।।
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी।।
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा।।
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ।।

बालगीत-

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

सामान्यज्ञान

महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
-मुंबई
गुजरात राज्याची राजधानी कोणती ?
-गांधीनगर
मध्यप्रदेश राज्याची राजधानी कोणती?
-भोपाळ
कर्नाटक राज्याची राजधानी कोणती?
-बेंगळुरू
गोवा राज्याची राजधानी कोणती?
-पणजी
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण?
-वि.स. खांडेकर
मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते?*
-दर्पण
शिर्डी हे धार्मिक स्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
-राहता
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री कोण ?
-यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
-गंगापूर

किल्ले माहिती-

माहिमचा किल्ला

माहिमहून वांद्रयाकडे जाताना जिथे माहिमची हद्द संपते त्याच्या किंचित आधी समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. वांद्रयाच्या दक्षिण किनाऱ्यावरुनही हा किल्ला स्पष्टपणे दिसतो.

या किल्ल्याचे बाह्यांग मुंबईतील 15व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळे आहे. विशेषत: या किल्ल्याचे बुरुज एतद्देशीय किल्ल्यांसारखेच आहेत. त्यावरुन किल्ल्याच्या तलविन्यासाची बाह्यरेषा मूळ किल्ल्याचीच (म्हणजे मुसलमानांनी बांधलेल्या किल्ल्याचीच) असावी असा निष्कर्ष निघतो.

ब्रिटिशांनी ज्यावेळी 1701-1702 या काळात किल्ल्याची पुर्नउभारणी केली खंड, दोन खंडांच्यामधील भागांमध्ये असलेले दिवे किंवा पणत्या ठेवण्यासाठी असलेले चौकोनी कोनाडे व तोफांकरता असलेल्या खाचांच्या तळाशी सांडपाणी जाण्यासाठी असलेले नलिकांच्या स्वरुपातील मार्ग ही भारतातील पाश्चिमात्य दुर्गशैलीची खास वैशिष्ट्ये या किल्ल्यात आढळतात.

या किल्ल्याच्या तलविन्यास सर्वसाधारणपणे चौकोनी असून तटबंदीची जाडी सुमारे चार मीटर आहे. अंतर्भागातील जागाही चौकोनीच आहे. या उपरोक्त वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला ब्रिटिशांनी स्वत:ला अनुरुप करुन घेतला असे म्हणता येईल. मात्र असे करताना बरेचसे वास्तुघटक एतद्देशीय धाटणीचेच राहून गेले आहेत. याचाच अर्थ ही पुर्नउभारणी आमूलाग्र स्वरुपाची नसून अंशात्मक प्रकारची होती.

या किल्ल्याची तटबंदी 25 फुटांहून अधिक उंचीची असून त्याला एकूण तीन बुरुज आहेत. एकेकाळी आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खोल्या व धान्याची कोठारे होती. एकंदरीत या किल्ल्याचे वास्तुस्वरुप चौकी सारखे नसून रुढार्थाने ज्याला किल्ला म्हणता येईल असे होते.

आश्यर्याची बाब

अशी की हा किल्ला अगदी समुद्रालगत असूनही थेट समुद्रातून गलबतांमार्फत ये-जा करता येऊ शकेल अशी कोणतीही सोय या किल्ल्याला दिसत नाही. किनाऱ्यावर उतरुन थोडे आत येऊनच किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे जाता येते. आज या किल्ल्यात इतकी प्रचंड प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत की आपण किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागातून फिरतो आहे हेही समजणे अशक्य होऊन बसले. जेमतेम दोन माणसे कसरत करुन एकाच वेळी जाऊ शकतील असे बोळ आणि सर्व बाजूंनी दुमजली झोपड्या अशी स्थिती आहे. खुद्द प्रवेशद्वाराच्या रुंदीचा 75 हून अधिक भाग एका झोपडीने व्यापला आहे. साहजिकच अशा स्थितीत किल्ल्याची अतिक्रमण होण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे व बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे असलेला नकाशा व बाहेरुन दिसणारा किल्ला एवढ्यावरुनच त्याचे वर्णन करण्यात आहे.

या जुन्या छायाचित्रांवरुन वरळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घंटेकरता बांधलेली कमान होती असे दिसते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात करुन घेण्यात आलेल्या ठराविक अंतरावर येणाऱ्या तोफांच्या खाचा, दोन खाचांच्यामध्ये असलेल्या दगडी कठड्यात दिवे ठेवण्याकरता चौकोनी कोनाडे हीही वैशिष्ट्ये होती असे दिसते. मात्र या चौकोनी कोनाड्यांचा तळभाग वरळीच्या किल्ल्यातील तटांच्या कोनाड्यांप्रमाणे अर्धवर्तुळाकार नसून साधा सपाट आहे. छायाचित्रांचे विस्तरण (एन्लार्जमेंट) व हा किल्ला ज्यांनी अतिक्रमणपूर्व काळात पाहिला आहे अशांनी दिलेली माहिती यावरुन ही बाब निश्चितपणे सांगता येते. काही छायाचित्रांवरुन तटबंदीच्या रुंदीवर किंवा निदान रुंदीच्या आतील भागात तरी काही दालने होती असे दिसते.

हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हा किल्ला किल्ला म्हणून कार्यरत होता त्याकाळी (म्हणजे मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी) किल्ल्याच्या उत्तरेस वांद्रे आणि सालसेट बेटे होती तर दक्षिणेस वरळी बेट होते. या मधल्या सागरी भागातून होणाऱ्या नौकानयनावर या किल्ल्यावरुन नियंत्रण ठेवता येत असे.

मुळातील एतद्देशीय किल्ला व त्यानंतर ब्रिटीशांनी केलेले बदल यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. अर्थात आधीच नमूद केल्याप्रमाणे हे बदल अंशात्मक आहेत. म्हणूनच माहिम किल्ल्याचा अंतर्भाव एतद्देशी किल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे.

व्यक्तीविशेष-

शकुंतलाबाई परांजपे
शकुंतलाबाई परांजपे यांचा जन्म १७ जानेवारी १९०६ रोजी पुणे येथे झाला.या त्यांच्या संततिनियमनाच्या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. शकुंतलाबाईंचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माध्यमिक शिक्षण पुण्याच्या हुजूरपागा शाळेत झाले. मॅट्रिक झाल्यानंतर त्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.एस्‌सी. झाल्या.
रँग्लर र.पु. परांजपे या आपल्या वडिलांसारखे त्यांना रँग्लर व्हायचे होते. त्यासाठी १९२६ मध्ये शकुंतलाबाई परांजपे इंग्लंडला गेल्या.
केंब्रिज येथे न्यू हॅम कॉलेज मधून त्या गणितात एम. ए. झाल्या. पॅरिस आणि कोलोन येथे जाऊन त्या फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकल्या. गणितातली अवघड ट्रायपास पदवी आणि केंब्रिज विद्यापीठातून गणितात अधिस्नातक पदवी मिळवली.
त्यांनी १० वर्षे युरोपमध्ये राहून जिनेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑफिसमध्ये काम करून अनुभव मिळविला. त्या महाराष्ट्रातील समाजसेविका होत्या. त्यांनी भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, कुटुंबनियोजनाचा पुरस्कार केला. शकुंतलाबाई परांजपे यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब नियोजनाच्या पहिल्या प्रचारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखिका, आमदार, खासदार, उत्तम वक्त्या, परखड व स्वतंत्र विचारांच्या विचारवंत, असे विविधांगी होते.
व्ही शांताराम यांच्या कुंकू चित्रपटात सुद्धा शकुंतला ताईनी काम केले होते. त्यांचे वडील रँग्लर परांजपे हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य होते. आई मॅट्रिक (संस्कृतमध्ये) प्रथम आलेल्या होत्या.
त्यामुळे घरात वातावरण बौद्धिक, उच्चशिक्षित व वाचनव्यासंगाने परिपूर्ण होते. युरोपमध्ये काम करत असतांना त्यांचा युरा या रशियन चित्रकाराशी परिचय झाला आणि मग लग्न झाले. दीड वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला आणि लहान मुलीसह त्या भारतात परतल्या.
सई परांजपे ही त्यांची कन्या आहे. आपल्या आईच्या जीवनावर सई परांजपे यांनी पर्स्वेशन हा लघुपट बनविला. शकुंतलाबाई परांजपे या लेखिकाही होत्या. यांनी काही पुस्तके आणि नाटकेही लिहिली आहेत. संततिनियमनाच्या बाबतीत त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (१९९१) त्यांचे ३मे २००० रोजी निधन झाले.

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.