18 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- बुधवार,
दिनांक- 18/01/2023,
मिती- पौष कृ.11
शके– 1944,
सुविचार- नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
आजचा दिनविशेष-

ठळक घटना आणि घडामोडी-
चौथे शतक-
३३६ – संत मार्क पोपपदी.
३५० – रोमन सेनापती मॅग्नॅन्टियसने सम्राट कॉन्स्टान्सला पदच्युत केले व स्वतःला रोमन सम्राट घोषित केले.
सोळावे शतक-
१५३५ – फ्रांसिस्को पिझारोने पेरूची राजधानी लिमाची स्थापना केली.
सतरावे शतक-
१६७० – हेन्री मॉर्गनने पनामा जिंकले.
अठरावे शतक-
१७०१ – फ्रेडरिक पहिला प्रशियाच्या राजेपदी.
१७७८ – कॅप्टन जेम्स कुक हवाईला पोचणारा पहिला युरोपियन ठरला. त्याने या द्वीपसमूहाचे नाव सॅन्डविच आयलंड्स असे ठेवले.
एकोणिसावे शतक-
१८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – जॉर्जिया अमेरिकेपासून विभक्त झाले.
१८७१ – विल्हेम पहिला जर्मनीचा पहिला कैसर(सम्राट) झाला.
१८८६ – इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. हॉकीच्या खेळाला प्रथमच मान्यता.
विसावे शतक-
१९११ – युजीन बी. इलायने सान फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस.पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग.
१९१२ – इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले.
१९१९ – पहिले महायुद्ध – व्हर्साय येथे पहिली शांति परिषद सुरू झाली.
१९४३ – दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला घातलेला वेढा रशियाने फोडला.
१९५६ – संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा
१९६४ – न्यू यॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन.
१९६९ – युनायटेड एरलाइन्स फ्लाईट २६६ हे बोईंग ७२७ जातीचे विमान सांता मॉनिका बेमध्ये कोसळले. ३८ ठार.
१९७७ – सिडनीजवळ ग्रॅनव्हिल स्थानकात रेल्वे घसरली. ८३ ठार.
१९९७ – नॉर्वेच्या बोर्ग औसलॅंडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.
१९९९ – नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.
एकविसावे शतक-
२००५ – एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनााचे उद्घाटन करण्यात आले.
जन्म-
८८५ – डैगो, जपानी सम्राट.
१८४२ – न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजकारणी.
१८४९ – एडमंड बार्टन, ऑस्ट्रेलियाचा पहिला पंतप्रधान.
१८५४ – थॉमस वाॅट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस, पहिल्या दूरध्वनी संभाषणातील भागीदार.
१८८९ – देवनहळ्ळी वेंकटरामनय्या गुंडप्पा तथा डी.व्ही.जी., कन्नड कवी व विचारवंत
१८८९ – शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर, मराठी साहित्यिक.
१८९२ – ऑलिव्हर हार्डी, अमेरिकन अभिनेता. लॉरेल आणि हार्डी या जोडीतील अर्धा भाग.
१८९४ – लेस्ली वॉलकॉट, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
१८८८ – थॉमस सॉपविथ, ब्रिटीश विमान उद्योजक.
१८८९ – नाट्यछटाकार दिवाकर लेखक.
१८९५ – विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक
१९०४ – कॅरी ग्रॅंट, इंग्लिश अभिनेता.
१९१६ – अलेक कॉक्सॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९३१ – चुन दू-ह्वान, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९३३ – रे डॉल्बी, अमेरिकन संशोधक.
१९४४ – पॉल कीटिंग, ऑस्ट्रेलियाचा २४वा पंतप्रधान.
१९५२ – वीरप्पन, चंदन तस्कर.
१९७२ – विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
३५० – कॉन्स्टान्स, रोमन सम्राट.
४७४ – लिओ पहिला, बायझेन्टाईन सम्राट.
१३६७ – पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
१४७१ – गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
१८६२ – जॉन टायलर, अमेरिकेचा १०वा अध्यक्ष.
१९२७ – कार्लोटा, मेक्सिकोची सम्राज्ञी.
१९३६ – रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. रावबहाद्दुर काळे, अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी.
१९४७ – कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.
१९६७ – डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.
१९७१ – बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.
१९८६ – प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक
१९९३ – आत्माराम रावजी भट, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲंन्ड इंडस्ट्रीजचे संस्थापक
१९९६ – एन.टी. रामाराव, तेलगू चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते व आंध्र प्रदेशचे १० वे मुख्यमंत्री.
२००३ – हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
विठ्ठला, तू वेडा कुंभार !माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
मनाचे श्लोक
बोधकथा-
तात्पर्य-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
बालगीत-
सामान्यज्ञान
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक
पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
किल्ले माहिती-
माहिमचा किल्ला
माहिमहून वांद्रयाकडे जाताना जिथे माहिमची हद्द संपते त्याच्या किंचित आधी समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. वांद्रयाच्या दक्षिण किनाऱ्यावरुनही हा किल्ला स्पष्टपणे दिसतो.
या किल्ल्याचे बाह्यांग मुंबईतील 15व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळे आहे. विशेषत: या किल्ल्याचे बुरुज एतद्देशीय किल्ल्यांसारखेच आहेत. त्यावरुन किल्ल्याच्या तलविन्यासाची बाह्यरेषा मूळ किल्ल्याचीच (म्हणजे मुसलमानांनी बांधलेल्या किल्ल्याचीच) असावी असा निष्कर्ष निघतो.
ब्रिटिशांनी ज्यावेळी 1701-1702 या काळात किल्ल्याची पुर्नउभारणी केली खंड, दोन खंडांच्यामधील भागांमध्ये असलेले दिवे किंवा पणत्या ठेवण्यासाठी असलेले चौकोनी कोनाडे व तोफांकरता असलेल्या खाचांच्या तळाशी सांडपाणी जाण्यासाठी असलेले नलिकांच्या स्वरुपातील मार्ग ही भारतातील पाश्चिमात्य दुर्गशैलीची खास वैशिष्ट्ये या किल्ल्यात आढळतात.
या किल्ल्याच्या तलविन्यास सर्वसाधारणपणे चौकोनी असून तटबंदीची जाडी सुमारे चार मीटर आहे. अंतर्भागातील जागाही चौकोनीच आहे. या उपरोक्त वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला ब्रिटिशांनी स्वत:ला अनुरुप करुन घेतला असे म्हणता येईल. मात्र असे करताना बरेचसे वास्तुघटक एतद्देशीय धाटणीचेच राहून गेले आहेत. याचाच अर्थ ही पुर्नउभारणी आमूलाग्र स्वरुपाची नसून अंशात्मक प्रकारची होती.
या किल्ल्याची तटबंदी 25 फुटांहून अधिक उंचीची असून त्याला एकूण तीन बुरुज आहेत. एकेकाळी आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खोल्या व धान्याची कोठारे होती. एकंदरीत या किल्ल्याचे वास्तुस्वरुप चौकी सारखे नसून रुढार्थाने ज्याला किल्ला म्हणता येईल असे होते.
आश्यर्याची बाब
अशी की हा किल्ला अगदी समुद्रालगत असूनही थेट समुद्रातून गलबतांमार्फत ये-जा करता येऊ शकेल अशी कोणतीही सोय या किल्ल्याला दिसत नाही. किनाऱ्यावर उतरुन थोडे आत येऊनच किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे जाता येते. आज या किल्ल्यात इतकी प्रचंड प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत की आपण किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागातून फिरतो आहे हेही समजणे अशक्य होऊन बसले. जेमतेम दोन माणसे कसरत करुन एकाच वेळी जाऊ शकतील असे बोळ आणि सर्व बाजूंनी दुमजली झोपड्या अशी स्थिती आहे. खुद्द प्रवेशद्वाराच्या रुंदीचा 75 हून अधिक भाग एका झोपडीने व्यापला आहे. साहजिकच अशा स्थितीत किल्ल्याची अतिक्रमण होण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे व बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे असलेला नकाशा व बाहेरुन दिसणारा किल्ला एवढ्यावरुनच त्याचे वर्णन करण्यात आहे.
या जुन्या छायाचित्रांवरुन वरळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घंटेकरता बांधलेली कमान होती असे दिसते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात करुन घेण्यात आलेल्या ठराविक अंतरावर येणाऱ्या तोफांच्या खाचा, दोन खाचांच्यामध्ये असलेल्या दगडी कठड्यात दिवे ठेवण्याकरता चौकोनी कोनाडे हीही वैशिष्ट्ये होती असे दिसते. मात्र या चौकोनी कोनाड्यांचा तळभाग वरळीच्या किल्ल्यातील तटांच्या कोनाड्यांप्रमाणे अर्धवर्तुळाकार नसून साधा सपाट आहे. छायाचित्रांचे विस्तरण (एन्लार्जमेंट) व हा किल्ला ज्यांनी अतिक्रमणपूर्व काळात पाहिला आहे अशांनी दिलेली माहिती यावरुन ही बाब निश्चितपणे सांगता येते. काही छायाचित्रांवरुन तटबंदीच्या रुंदीवर किंवा निदान रुंदीच्या आतील भागात तरी काही दालने होती असे दिसते.
हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हा किल्ला किल्ला म्हणून कार्यरत होता त्याकाळी (म्हणजे मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी) किल्ल्याच्या उत्तरेस वांद्रे आणि सालसेट बेटे होती तर दक्षिणेस वरळी बेट होते. या मधल्या सागरी भागातून होणाऱ्या नौकानयनावर या किल्ल्यावरुन नियंत्रण ठेवता येत असे.
मुळातील एतद्देशीय किल्ला व त्यानंतर ब्रिटीशांनी केलेले बदल यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. अर्थात आधीच नमूद केल्याप्रमाणे हे बदल अंशात्मक आहेत. म्हणूनच माहिम किल्ल्याचा अंतर्भाव एतद्देशी किल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे.
व्यक्तीविशेष-
डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे (नोव्हेंबर ७, १८८४:वर्धा – जानेवारी १८, १९६७) हे एक मराठी कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म आणि शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले.
१९११ साली खानखोजे अमेरिकेत गेले व त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले.
कृषी शास्त्रज्ञ खानखोजे-
अमेरिकेतील शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉ. पांडुरंग खानखोजे मेक्सिकोत गेले. १९२० सालापासून ते १९४७ सलापर्यंत त्यांनी मेक्सिकोमध्ये वनस्पतीशास्त्राचे व पीक निर्मिती शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. या काळात हायब्रीड मका, तांब्या रोगाला तोंड देणारा, पावसाळ्यात, उन्हाळ्यात व थंडीत बर्फालाही तोंड देईल असा गहू, अधिक उत्पादन देणारे सोयाबीन आणि घेवड्याचे उत्पादन, कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात, समुद्रसपाटीपासून खूप उंचीवर पिकवता येणारी जात, आदींवर संशोधन करून मेक्सिकोमध्ये त्यांनी हरित क्रांती घडवून आणली. मेक्सिकन सरकारने खानखोजे यांना कृषिसंचालक म्हणून नेमले होते.
मेक्सिकोतील शिक्षण खात्याच्या संग्रहालयाच्या भिंतीवर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष व इतर थोर व्यक्तींच्या भव्य भित्तीचित्रांच्या पंक्तीत डॉ.खानखोजे यांचे म्यूरल असून चित्राच्या शिरोभागी स्पॅनिश भाषेत ‘आता गोरगरिबांनाही भाकर मिळेल’ असे लिहिले आहे.
मेक्सिकोत सहकारी तत्त्वावर शेती करण्यासाठी डॉ. खानखोजे यांनी शेतकरी संघ स्थापन केले. मका व जंगली वनस्पतीचे संकर करून तेवो-मका ही नवी जात निर्माण केली.त्यात एकेका ताटावर तीस-तीस कणसे येऊ लागली. जंगली वालावर संशोधन करून वर्षांतून दोनदा पीक देणारी जात विकसित केली. शेतकऱ्यांना पिकांची लागवड करता यावी म्हणून स्पॅनिश भाषेत वीस पिकांवर पुस्तिका छापल्या. नपुंसकांवर इलाज करण्यासाठी पूर्वी माकडांच्या ग्रंथीतून हार्मोन्स मिळवली जात.
पण लोकांनी ओरड केल्यावर हे थांबवावे लागले; परंतु यावर उपाय म्हणून डॉ. खानखोजे यांनी मध्वालू या जंगली वनस्पतीपासून अशी हॉर्मोन्स मिळवली. मसाल्याचे अनेक पदार्थ त्यांनी मेक्सिकोत उगवून दाखवले. ते स्वतः शाकाहारी असल्याने त्यांनी जेवणात अनेक नवीन पाककृती विकसित केल्या.त्यांनि ‘तेवी-मका’ ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली.
क्रांतिकारक खानखोजे-
पांडुरंग खानखोजे यांना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा दिली. १९०८ सालापासूनच त्यांचा संबंध स्वातंत्र्य चळवळीशी आला व अमेरिकेत गेल्यावर त्यांनी गदर पक्ष स्थापन करण्यात पुढाकार घेतला. जगात अनेक ठिकाणी फिरून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी देशाबाहेरून प्रयत्न केले.यांनी जपान मध्ये बॉम्बविद्या प्रशिक्षण घेतले होते
आपण शेतीसंबंधी जे ज्ञान मिळवले ते भारतीयांच्या कामाला यावे अशी तीव्र इच्छा खानखोजे यांना होती. पण भारत स्वतंत्र व्हावा ही इच्छा त्याहीपेक्षा तीव्र असल्याने त्यांनी शाळेत असल्यापासून विद्यार्थ्यांची संघटना बनवून ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार केले. मग त्यांनी जपान, अमेरिका, जर्मनी आणि मेक्सिकोत जाऊन तेथेही हे कार्य त्यांनी चालू ठेवल्याने ते भारतात परतले तर त्यांना पकडून तुरुंगात डांबायला ब्रिटिश सरकार टपले होते. त्यामुळे जरी त्यांचे भाऊ,आई व वडील वारले तरी त्यांना भारतात परत येता आले नाही. शिवाय त्यांच्याकडे भारतात परत यायला ब्रिटिश पासपोर्टही नव्हता.
भारताला स्वातंत्र मिळाल्यावर, १९४९ साली तेव्हाच्या मध्यप्रांताचे कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी मध्य प्रांतातील शेती सुधारण्यासाठी यांत्रिक पद्धती, सहकारी शेती याचा अवलंब करण्यास कितपत वाव आहे हे पाहण्यासाठी डॉ. खानखोजे यांच्या अध्यक्षतेखाली एक कृषी समिती नेमून त्यांना भारतात बोलावले. त्यांनी आपल्याकडे दिले जाणारे शेतीचे शिक्षण किती उपयोगाचे आहे, त्यात संशोधनास किती वाव आहे, शेतीवर काही प्रयोग करण्यासाठी प्रायोगिक शेते आहेत का, शेतीतील सुधारणा खेडोपाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची काही सोय केली आहे का, शेतीचे यांत्रिकीकरण करणे इष्ट आहे का, अल्पभूधारकांनी सहकारी तत्त्वावर शेती करावी का हे सगळे ठरवण्यासाठी भारतभर हिडून शेतीचे निरीक्षण केले.
२८९ शेतकरी व ८२ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी सामूहिक शेतीचे प्रयोग सुरू करण्याचे सुचविले.हिंदी-मराठीत पुस्तिका काढायचेही सुचविले.पण मेक्सिकोमध्ये खानखोजे यांना जेवढे काम करता आले तेवढे भारतात करता न आल्याने ते असंतुष्ट राहिले.
१९५५साली डॉ. पांडुरंग खानखोजे कायमचे भारतात आले आणि नागपूरमध्ये स्थायिक झाले.
चरित्र-
पांडुरंग खानखोजे यांची कन्या डॉ. सावित्री सहानी यांनी त्यांच्यावर ‘क्रांती आणि हरितक्रांती’ असे एक पुस्तक लिहिले आहे.
वीणा गवाणकरांनीही ‘डॉ.खानखोजे-नाही चिरा..’ या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे.
मी कधीही माफी मागणार नाही (ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग खानखोजे यांचे चरित्र – मेहता प्रकाशन)
मेक्सिको देशातील शापिंगो येथील नॅशनल स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर विद्यापीठात डॉ. खानखोजे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. ज्याचे अनावरण लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
घोषणा –
भारत माँ की आन भी तुम
देश की तिरंगे की शान भी तुम..!!स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे…
सुराज्यचा उदय घडू दे…!!
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे…!!
हम सब बच्चे, हम सब बच्चे…!!
एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!