19 जानेवारी दिनविशेष
शालेय परिपाठ
आज वार- गुरुवार,
दिनांक- 19/01/2023,
मिती- पौष कृ.12
शके– 1944,
सुविचार- प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही.
आजचा दिनविशेष-
गगनगिरी महाराज निर्वाण दिन

ठळक घटना आणि घडामोडी-
पंधरावे शतक-
१४१९ – इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा, इंग्लंड याने नॉर्मंडीची राजधानी रुआ जिंकून नॉर्मंडीचा पूर्ण पाडाव केला.
एकोणिसावे शतक-
१८०६ – इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपचा ताबा घेतला.
१८३९ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एडन जिंकले आणि भारत-इंग्लंड समुद्रीमार्ग चाच्यांपासून सुरक्षित केला.
१८३९ – अमेरिकन यादवी युद्ध – मिल स्प्रिंग्सच्या लढाईत उत्तरेचा विजय.
विसावे शतक-
१९१५ – पहिले महायुद्ध – जर्मन झेपेलिननी ब्रिटनच्या ग्रेट यारमथ आणि किंग्ज लिन गावांवर बॉम्बफेक केली. हवेतून नागरी वस्तीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ.
१९१८ – फिनिश गृहयुद्ध – लाल सैनिक व पांढरे सैनिक यांच्यात पहिली लढाई.
१९४१ – दुसरे महायुद्ध – ब्रिटनने एरिट्रिया वर हल्ला केला.
१९४२ – दुसरे महायुद्ध – जपानने म्यानमार वर हल्ला केला.
१९४५ – दुसरे महायुद्ध – रशियाने पोलंडमधील लोड्झ शहर नाझींपासून मुक्त केले. युद्धाच्या सुरुवातीला लोकसंख्या – २,३०,०००. या दिवशीची लोकसंख्या – ९००.
१९४६ – दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थरने टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायालय सुरू केले.
१९४९ – पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली.
१९५४ – कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन
१९५६ – देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरूपात आयुर्विमा महामंडळ झाले.
१९६६ – इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
१९६८ – डॉ. क्रिस्टोफर बर्नार्ड यांनी पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया केली.
१९७७ – मायामी, फ्लोरिडात आत्तापर्यंतचा एकमेव हिमवर्षाव.
१९८६ – (c) Brain नावाचा पहिला संगणक विषाणु पसरण्यास सुरुवात झाली.
१९९६ – ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खॉं यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
एकविसावे शतक-
२००६ – स्लोव्हेकियन वायु सेनेचे ए.एन. २४ प्रकारचे विमान हंगेरीमध्ये कोसळले.
२००७ – सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.
जन्म-
३९९ – पुल्केरिया, बायझेन्टाईन सम्राज्ञी.
१७३६ – जेम्स वॅट, स्कॉटिश शास्त्रज्ञ संशोधक.
१८०७ – रॉबर्ट ई. ली, अमेरिकन कॉन्फेडरेट सेनापती.
१८०९ – एडगर ऍलन पो, अमेरिकन लेखक.
१८१३ – सर हेन्री बेसेमेर, इंग्लिश संशोधक.
१८६८ – बॉब मॅकलिओड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८८६ – रामचंद्र गणेश कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व, हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक.
१८९२ – चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक.
१८९८ – विष्णू सखाराम तथा वि.स. खांडेकर, मराठी साहित्यिक.
१९०६ – विनायक दामोदर कर्नाटकी ऊर्फ मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.त्यांनी २२ चित्रपटांतून भूमिका केल्या तर २९ चित्रपट दिग्दर्शित केले.
१९२२ – आर्थर मॉरिस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९३० – जॉन वाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९३६ – झिया उर रहमान, बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
१९६९ – महमूद हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
१९०५ – देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९५१ – अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी.
१९६० – रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक.
१९९० – रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी.
२००० – मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम.ए. चिदंबरम, उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडियाचे अध्यक्ष; उपाध्यक्ष व खजिनदार, तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, चेन्नईचे महापौर.
२००४ – डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
विठ्ठला, तू वेडा कुंभार !माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
मनाचे श्लोक
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
सामान्यज्ञान
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.
महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक
पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.
कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.
किल्ले माहिती-
माहिमचा किल्ला
माहिमहून वांद्रयाकडे जाताना जिथे माहिमची हद्द संपते त्याच्या किंचित आधी समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. वांद्रयाच्या दक्षिण किनाऱ्यावरुनही हा किल्ला स्पष्टपणे दिसतो.
या किल्ल्याचे बाह्यांग मुंबईतील 15व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळे आहे. विशेषत: या किल्ल्याचे बुरुज एतद्देशीय किल्ल्यांसारखेच आहेत. त्यावरुन किल्ल्याच्या तलविन्यासाची बाह्यरेषा मूळ किल्ल्याचीच (म्हणजे मुसलमानांनी बांधलेल्या किल्ल्याचीच) असावी असा निष्कर्ष निघतो.
ब्रिटिशांनी ज्यावेळी 1701-1702 या काळात किल्ल्याची पुर्नउभारणी केली खंड, दोन खंडांच्यामधील भागांमध्ये असलेले दिवे किंवा पणत्या ठेवण्यासाठी असलेले चौकोनी कोनाडे व तोफांकरता असलेल्या खाचांच्या तळाशी सांडपाणी जाण्यासाठी असलेले नलिकांच्या स्वरुपातील मार्ग ही भारतातील पाश्चिमात्य दुर्गशैलीची खास वैशिष्ट्ये या किल्ल्यात आढळतात.
या किल्ल्याच्या तलविन्यास सर्वसाधारणपणे चौकोनी असून तटबंदीची जाडी सुमारे चार मीटर आहे. अंतर्भागातील जागाही चौकोनीच आहे. या उपरोक्त वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला ब्रिटिशांनी स्वत:ला अनुरुप करुन घेतला असे म्हणता येईल. मात्र असे करताना बरेचसे वास्तुघटक एतद्देशीय धाटणीचेच राहून गेले आहेत. याचाच अर्थ ही पुर्नउभारणी आमूलाग्र स्वरुपाची नसून अंशात्मक प्रकारची होती.
किल्ल्याची तटबंदी 25 फुटांहून अधिक उंचीची असून त्याला एकूण तीन बुरुज आहेत. एकेकाळी आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खोल्या व धान्याची कोठारे होती. एकंदरीत या किल्ल्याचे वास्तुस्वरुप चौकी सारखे नसून रुढार्थाने ज्याला किल्ला म्हणता येईल असे होते.
आश्यर्याची बाब
अशी की हा किल्ला अगदी समुद्रालगत असूनही थेट समुद्रातून गलबतांमार्फत ये-जा करता येऊ शकेल अशी कोणतीही सोय या किल्ल्याला दिसत नाही. किनाऱ्यावर उतरुन थोडे आत येऊनच किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे जाता येते. आज या किल्ल्यात इतकी प्रचंड प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत की आपण किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागातून फिरतो आहे हेही समजणे अशक्य होऊन बसले. जेमतेम दोन माणसे कसरत करुन एकाच वेळी जाऊ शकतील असे बोळ आणि सर्व बाजूंनी दुमजली झोपड्या अशी स्थिती आहे. खुद्द प्रवेशद्वाराच्या रुंदीचा 75 हून अधिक भाग एका झोपडीने व्यापला आहे. साहजिकच अशा स्थितीत किल्ल्याची अतिक्रमण होण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे व बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे असलेला नकाशा व बाहेरुन दिसणारा किल्ला एवढ्यावरुनच त्याचे वर्णन करण्यात आहे.
या जुन्या छायाचित्रांवरुन वरळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घंटेकरता बांधलेली कमान होती असे दिसते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात करुन घेण्यात आलेल्या ठराविक अंतरावर येणाऱ्या तोफांच्या खाचा, दोन खाचांच्यामध्ये असलेल्या दगडी कठड्यात दिवे ठेवण्याकरता चौकोनी कोनाडे हीही वैशिष्ट्ये होती असे दिसते. मात्र या चौकोनी कोनाड्यांचा तळभाग वरळीच्या किल्ल्यातील तटांच्या कोनाड्यांप्रमाणे अर्धवर्तुळाकार नसून साधा सपाट आहे. छायाचित्रांचे विस्तरण (एन्लार्जमेंट) व हा किल्ला ज्यांनी अतिक्रमणपूर्व काळात पाहिला आहे अशांनी दिलेली माहिती यावरुन ही बाब निश्चितपणे सांगता येते. काही छायाचित्रांवरुन तटबंदीच्या रुंदीवर किंवा निदान रुंदीच्या आतील भागात तरी काही दालने होती असे दिसते.
हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हा किल्ला किल्ला म्हणून कार्यरत होता त्याकाळी (म्हणजे मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी) किल्ल्याच्या उत्तरेस वांद्रे आणि सालसेट बेटे होती तर दक्षिणेस वरळी बेट होते. या मधल्या सागरी भागातून होणाऱ्या नौकानयनावर या किल्ल्यावरुन नियंत्रण ठेवता येत असे.
मुळातील एतद्देशीय किल्ला व त्यानंतर ब्रिटीशांनी केलेले बदल यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. अर्थात आधीच नमूद केल्याप्रमाणे हे बदल अंशात्मक आहेत. म्हणूनच माहिम किल्ल्याचा अंतर्भाव एतद्देशी किल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे.
व्यक्तीविशेष-
विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ – सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.
पूर्वायुष्य
वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते.
खांडेकर यांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.
त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या. त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषांत अनुवाद झाले. त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला.
व्यावसायिक आणि साहित्यिक आयुष्य
इ.स. १९२० साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली.
तेथे त्यांनी इ.स. १९३८पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांमध्ये लेखन केले.
आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबऱ्या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.
खांडेकरलिखित पुस्तके
अजून येतो वास फुलांना
अमृत (पटकथा)
अमृतवेल
अविनाश
अश्रू
आगरकर : व्यकी आणि विचार
उल्का (१९३४) (कादंबरी व पटकथा)
कल्पलता
कांचनमृग (१९३१)
क्रौंचवध (१९४२)
घरटे
घरट्याबाहेर
चंदेरी स्वप्ने
चांदण्यात
छाया (पटकथा)
जळलेला मोहर (१९४७ )
जीवनशिल्पी
ज्वाला (पटकथा)
झिमझिम
तिसरा प्रहर
तुरुंगातील पत्रे भाग १, २, ३
ते दिवस, ती माणसे
दंवबिंदू
देवता (पटकथा)
धर्मपत्नी (पटकथा)
धुके
नवा प्रातःकाल
परदेशी (पटकथा)
पहिली लाट
पहिले पान
पाकळ्या
पांढरे ढग (१९४९)
पूजन
फुले आणि काटे
मंजिऱ्या
मध्यरात्र
मृगजळातील कळ्या
ययाति
रंग आणि गंध
रिकामा देव्हारा (१९३९)
रेखा आणि रंग
लग्न पहावे करून (पटकथा व संवाद)
वामन मल्हार जोशी : व्यक्ति-विचार
वायुलहरी
वासंतिका
विद्युत् प्रकाश
वेचलेली फुले ( कथासंग्रह, १९४८)
समाजशिल्पी
समाधीवरील फुले
सहा भाषणे
सांजवात
साहित्यशिल्पी
सुखाचा शोध
सुवर्णकण
सूर्यकमळे
सोनेरी सावली (पटकथा)
सोनेरी स्वप्ने भंगलेली
स्त्री आणि पुरुष
हिरवळ
हिरवा चाफा (१९३८)
हृदयाची हाक (१९३०)
क्षितिजस्पर्श
पटकथा
‘अंतरिचा दिवा’ हा खांडेकरांच्या पटकथांचा पुस्तकरूपातील संग्रह आहे.
खांडेकरांचे चरित्र
सुनीलकुमार लवटे यांनी वि.स. खांडेकरांचे चरित्र लिहिले आहे; त्यासाठी डाॅ. अनंत लाभसेटवार यांच्या नागपूर येथील न्यासाने अर्थसाहाय्य केले आहे.
पुरस्कार आणि सन्मान
वि.स. खांडेकर हे सोलापूरला १९४१ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
साहित्य अकादमी पुरस्कार (१९६०) – ययाति (कादंबरी)
पद्मभूषण पुरस्कार (१९६८)
ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) – ययाति कादंबरीसाठी
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. (डॉक्टर ऑफ लिटरेचर) बहाल केली.
घोषणा –
भारत माँ की आन भी तुम
देश की तिरंगे की शान भी तुम..!!स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे…
सुराज्यचा उदय घडू दे…!!
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे…!!
हम सब बच्चे, हम सब बच्चे…!!
एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!