20 जानेवारी शालेय परिपाठ
दिनविशेष, Daily Routine
आज वार– शुक्रवार
दिनांक- 20/01/2023
मिती- पौष कृ.13 /14
शके– 1944
सुविचार- घेतलेले काम मग ते लहान असो वा मोठे ते जिद्दीने तडीस न्या.
आजचा दिनविशेष-

जानेवारी महिन्यातील परिपाठ पाहण्यासाठी
ठळक घटना आणि घडामोडी-
तेरावे शतक-
१२६५ – इंग्लंडच्या संसदेची पहिली बैठक.
चौदावे शतक-
१३२० – व्लादिस्लॉ लोकिटेक पोलंडच्या राजेपदी.
१३५६ – स्कॉटलंडचा राजा एडवर्ड बॅलियोलने पदत्याग केला.
पंधरावे शतक-
१५२३ – डेन्मार्क व नॉर्वेचा राजा क्रिस्चियन दुसरा यास पदत्याग करणे भाग पडले.
अठरावे शतक-
१७८३ – ब्रिटनने फ्रांस व स्पेनशी संधी केली. अमेरिकन क्रांती अधिकृतरित्या समाप्त.
१७८८ – इंग्लंडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनाऱ्यावर उतरले. येथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
एकोणिसावे शतक-
१८०१ – जॉन मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.
१८३९ – युंगेची लढई – चिली कडून पेरू व बॉलिव्हियाचा पराभव.
१८४० – विलेम दुसरा नेदरलॅंड्सच्या राजेपदी.
१८४१ – युनायटेड किंग्डमने हॉंग कॉंगचा ताबा घेतला.
विसावे शतक-
१९२१ – तुर्कस्तानचे पहिले संविधान अस्तित्वात आले.
१९३६ – एडवर्ड आठवा युनायटेड किंग्डमच्या राजेपदी.
१९३७ – फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतरच्या सगळ्या अमेरिकन अध्यक्षांची सद्दी जानेवारी २०पासून सुरू होते. त्या यादी साठी येथे टिचकी द्या.
१९४२ – दुसरे महायुद्ध – बर्लिनमधील वॉन्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नाचा शेवटचा उपाय ठरवला.
१९४४ – दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सने बर्लिन वर २,३०० टन बॉम्ब फेकले.
१९४५ – दुसरे महायुद्ध – हंगेरीने दोस्त राष्ट्रांशी शस्त्रसंधी केली.
१९५२ – एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी
१९६३ – चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
१९६९ – क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसुन आला.
१९८१ – रोनाल्ड रेगनने अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काही मिनिटात ईराणने ओलिस धरलेल्या ५२ व्यक्तिंना सोडले.
१९९८ – पं. रवि शंकर यांना पोलार संगीत पुरस्कारजाहीर.
१९९९ – गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
एकविसावे शतक-
२००९ – बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी.
जन्म-
२२५ – गोर्डियन तिसरा, रोमन सम्राट.
१४३५ – अशिकागा योशिमासा, जपानी शोगन.
१५५४ – सेबास्टियन, पोर्तुगालचा राजा.
१७१६ – चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.
१७७५ – आंद्रे-मरी ॲंपियर, फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ.
१७९८ – ऍन्सन जोन्स, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा पाचवा व शेवटचा अध्यक्ष.
१८७१ – सर रतनजी जमसेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
१८९६ – जॉर्ज बर्न्स, अमेरिकन अभिनेता.
१८९८ – कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा मास्टर कृष्णराव’, गायक, अभिनेते व संगीतकार.
१९०६ – ॲरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती.
१९१५ – गुलाम इशाक खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
१९३० – बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर.
१९४९ – गोरान पर्स्सन, स्वीडनचा पंतप्रधान.
१९५० – महामाने औस्माने, नायजरचा राष्ट्रध्यक्ष.
१९६० – आपा शेर्पा, माऊंट एव्हरेस्टवर १९ वेळा यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक.
मृत्यू-
१४९२ – जॉन दुसरा, अरागॉनचा राजा.
१६१२ – रुडोल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
१६६६ – ऑस्ट्रियाची ऍना, फ्रांसचा राजा लुई तेरावा याची पत्नी.
१७४५ – चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.
१८१९ – चार्ल्स चौथा, स्पेनचा राजा.
१८४८ – क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.
१८९१ – डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.
१९३६ – जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.
१९५१ – अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बापा’, गुजराती समाजसेवक.
१९८० – कस्तुरभाई लालभाई, भारतीय उद्योगपती, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक .
१९८८ – खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.
१९९३ – ऑड्रे हेपबर्न, ॲंग्लो-डच अभिनेत्री.
२००२ – रामेश्वरनाथ काओ, रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.
२००५ – पर बोर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
विठ्ठला, तू वेडा कुंभार !माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
मनाचे श्लोक
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
सामान्यज्ञान
किल्ले माहिती-
माहिमचा किल्ला
माहिमहून वांद्रयाकडे जाताना जिथे माहिमची हद्द संपते त्याच्या किंचित आधी समुद्रकिनाऱ्यावर हा किल्ला आहे. वांद्रयाच्या दक्षिण किनाऱ्यावरुनही हा किल्ला स्पष्टपणे दिसतो.
या किल्ल्याचे बाह्यांग मुंबईतील 15व्या ते 18व्या शतकात बांधलेल्या युरोपीय किल्ल्यांपेक्षा निराळे आहे. विशेषत: या किल्ल्याचे बुरुज एतद्देशीय किल्ल्यांसारखेच आहेत. त्यावरुन किल्ल्याच्या तलविन्यासाची बाह्यरेषा मूळ किल्ल्याचीच (म्हणजे मुसलमानांनी बांधलेल्या किल्ल्याचीच) असावी असा निष्कर्ष निघतो.
ब्रिटिशांनी ज्यावेळी 1701-1702 या काळात किल्ल्याची पुर्नउभारणी केली खंड, दोन खंडांच्यामधील भागांमध्ये असलेले दिवे किंवा पणत्या ठेवण्यासाठी असलेले चौकोनी कोनाडे व तोफांकरता असलेल्या खाचांच्या तळाशी सांडपाणी जाण्यासाठी असलेले नलिकांच्या स्वरुपातील मार्ग ही भारतातील पाश्चिमात्य दुर्गशैलीची खास वैशिष्ट्ये या किल्ल्यात आढळतात.
या किल्ल्याच्या तलविन्यास सर्वसाधारणपणे चौकोनी असून तटबंदीची जाडी सुमारे चार मीटर आहे. अंतर्भागातील जागाही चौकोनीच आहे. या उपरोक्त वैशिष्ट्यांमुळे हा किल्ला ब्रिटिशांनी स्वत:ला अनुरुप करुन घेतला असे म्हणता येईल. मात्र असे करताना बरेचसे वास्तुघटक एतद्देशीय धाटणीचेच राहून गेले आहेत. याचाच अर्थ ही पुर्नउभारणी आमूलाग्र स्वरुपाची नसून अंशात्मक प्रकारची होती.
किल्ल्याची तटबंदी 25 फुटांहून अधिक उंचीची असून त्याला एकूण तीन बुरुज आहेत. एकेकाळी आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी खोल्या व धान्याची कोठारे होती. एकंदरीत या किल्ल्याचे वास्तुस्वरुप चौकी सारखे नसून रुढार्थाने ज्याला किल्ला म्हणता येईल असे होते.
आश्यर्याची बाब
अशी की हा किल्ला अगदी समुद्रालगत असूनही थेट समुद्रातून गलबतांमार्फत ये-जा करता येऊ शकेल अशी कोणतीही सोय या किल्ल्याला दिसत नाही. किनाऱ्यावर उतरुन थोडे आत येऊनच किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्याकडे जाता येते. आज या किल्ल्यात इतकी प्रचंड प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत की आपण किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागातून फिरतो आहे हेही समजणे अशक्य होऊन बसले. जेमतेम दोन माणसे कसरत करुन एकाच वेळी जाऊ शकतील असे बोळ आणि सर्व बाजूंनी दुमजली झोपड्या अशी स्थिती आहे. खुद्द प्रवेशद्वाराच्या रुंदीचा 75 हून अधिक भाग एका झोपडीने व्यापला आहे. साहजिकच अशा स्थितीत किल्ल्याची अतिक्रमण होण्यापूर्वी काढलेली छायाचित्रे व बॉम्बे पोर्ट ट्रस्टकडे असलेला नकाशा व बाहेरुन दिसणारा किल्ला एवढ्यावरुनच त्याचे वर्णन करण्यात आहे.
या जुन्या छायाचित्रांवरुन वरळीच्या किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यातही घंटेकरता बांधलेली कमान होती असे दिसते. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या काळात करुन घेण्यात आलेल्या ठराविक अंतरावर येणाऱ्या तोफांच्या खाचा, दोन खाचांच्यामध्ये असलेल्या दगडी कठड्यात दिवे ठेवण्याकरता चौकोनी कोनाडे हीही वैशिष्ट्ये होती असे दिसते. मात्र या चौकोनी कोनाड्यांचा तळभाग वरळीच्या किल्ल्यातील तटांच्या कोनाड्यांप्रमाणे अर्धवर्तुळाकार नसून साधा सपाट आहे. छायाचित्रांचे विस्तरण (एन्लार्जमेंट) व हा किल्ला ज्यांनी अतिक्रमणपूर्व काळात पाहिला आहे अशांनी दिलेली माहिती यावरुन ही बाब निश्चितपणे सांगता येते. काही छायाचित्रांवरुन तटबंदीच्या रुंदीवर किंवा निदान रुंदीच्या आतील भागात तरी काही दालने होती असे दिसते.
हा किल्ला लष्करी दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे हा किल्ला किल्ला म्हणून कार्यरत होता त्याकाळी (म्हणजे मुंबईची सात बेटे जोडली जाण्यापूर्वी) किल्ल्याच्या उत्तरेस वांद्रे आणि सालसेट बेटे होती तर दक्षिणेस वरळी बेट होते. या मधल्या सागरी भागातून होणाऱ्या नौकानयनावर या किल्ल्यावरुन नियंत्रण ठेवता येत असे.
मुळातील एतद्देशीय किल्ला व त्यानंतर ब्रिटीशांनी केलेले बदल यामुळे हा किल्ला वैशिष्ट्यपूर्ण बनला आहे. अर्थात आधीच नमूद केल्याप्रमाणे हे बदल अंशात्मक आहेत. म्हणूनच माहिम किल्ल्याचा अंतर्भाव एतद्देशी किल्ल्यांमध्ये करण्यात आला आहे.
घोषणा –
भारत माँ की आन भी तुम
देश की तिरंगे की शान भी तुम..!!स्वातंत्र्याचा अर्थ कळू दे…
सुराज्यचा उदय घडू दे…!!
हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे…!!
हम सब बच्चे, हम सब बच्चे…!!
एक, दोन, तीन, चार –
स्वातंत्र्याचा जयजयकार..!!