11 September
11 सप्टेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- सोमवार
दिनांक- 11/09/2023, 11 सप्टेंबर
मिती- श्रावण कृष्ण 12
शके– 1945
सुविचार- ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५४ वा किंवा लीप वर्षात २५५ वा दिवस असतो.
तेरावे शतक
- १२९७ – स्टर्लिंग ब्रिजची लढाई – विल्यम वॉलेसच्या स्कॉटिश सैन्याने इंग्लंडचा पराभव केला.
सोळावे शतक
- १५४१ – मिचिमालोंकोच्या नेतृत्वाखाली स्थानिक रहिवाश्यांनी सांटियागो, चिली उद्ध्वस्त केले.
सतरावे शतक
- १६०९ – हेन्री हडसन पहिल्यांदा मॅनहॅटनला पोचला.
अठरावे शतक
- १७७३ – बेंजामिन फ्रँकलिनने रुल्स बाय व्हिच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन हा निबंध प्रकाशित केला.
- १७७७ – अमेरिकन क्रांती-ब्रँडीवाइनची लढाई.
- १७९२ – होप हिरा चोरला गेला.
एकोणिसावे शतक
- १८५७ – माउंटन मेडोझची कत्तल – मोर्मोन पंथील लोकांनी १२० पायोनियर्सची[मराठी शब्द सुचवा] कत्तल केली.
- १८९७ – मेनेलेक दुसऱ्याच्या सैन्याने काफ्फाच्या राजा गाकी शेरोचोला पकडले व त्याचे राज्य बळकावले.
विसावे शतक
- १९०६ – महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
- १९१९ – अमेरिकेने होन्डुरास वर चढाई केली.
- १९४० – दुसरे महायुद्ध – जर्मनीने केलेल्या बॉम्बफेकीत बकिंगहॅम पॅलेसची पडझड.
- १९४१ – अमेरिकेने पेंटेगॉन बांधायला सुरुवात केली.
- १९४२ – सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
- १९४३ – दुसरे महायुद्ध – जर्मनीने कॉर्सिका आणि कोसोव्हो बळकावले.
- १९४३ – दुसरे महायुद्ध – जर्मनीने मिन्स्क आणि लिडामधील ज्यू राहत असलेले भाग रिकामे करवले.
- १९४४ – दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रे पश्चिमेकडून जर्मनीत घुसली.
- १९४४ – दुसरे महायुद्ध – रॉयल एर फोर्सने डार्मश्टाट शहरावर केलेल्या बॉम्बफेकीमुळे ११,५०० नागरिक ठार.
- १९४५ – दुसरे महायुद्ध – ऑस्ट्रेलियाच्या सैन्याने बाटु लिंटांग येथील युद्धकैदी व इतर बंदी असलेला तुरुंग मुक्त केला. तेथील २,००० कैद्यांना १५ तारखेस ठार मारण्याची जपान्यांची योजना होती.
- १९६१ – वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना.
- १९६८ – एर फ्रांस फ्लाइट १६११ हे विमान फ्रांसच्या नीस शहराजवळ कोसळले.
- १९७३ – चिलीमध्ये जनरल ऑगुस्तो पिनोशेने सी.आय.ए.च्या मदतीने साल्वादोर आयेंदेचे सरकार उलथवले.
- १९७४ – ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट २१२ हे विमान शार्लट, उत्तर कॅरोलिना येथे कोसळले. ६९ ठार.
- १९८० – चिलीने नवीन संविधान अंगिकारले.
- १९९७ – नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.
एकविसावे शतक
- २००१ – अमेरिकेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.
- २००७ – रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.
जन्म
- १८१६ – कार्ल झाइस, जर्मन संशोधक.
- १८६२ – ओ. हेन्री, इंग्लिश लेखक.
- १८८५ – डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.
- १८९५ – आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.
- १९०१ – कवी अनिल
- १९१७ – फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८२ – श्रिया शरण, तमिळ चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
- १६८० – गो-मिझुनू, जपानी सम्राट.
- १८८८ – दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२१ – सुब्रमण्य भारती, तमिळ कवी.
- १९४८ – मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
- १९५० – यानी स्मट्स, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९७१ – निकिता ख्रुश्चेव, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ – साल्वादोर अयेंदे, चिलीचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७३ – नीम करोली बाबा, भारतीय गुरू.
- १९७८ – जॉर्जी मार्कोव्ह, बल्गेरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८७ – महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.
- १९९३ – अभि भट्टाचार्य, चित्रपटसृष्टीतील अभिनेते
- १९९८ – एन. डी. नगरवाला, क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी.
- २००१ – सप्टेंबर ११ च्या दहशतवादी हल्ल्यांचे बळी.
- २००२ – जॉनी युनिटास, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
प्रतिवार्षिक पालन
- राष्ट्र दिन – कॅटेलोनिया.
- शिक्षक दिन – लॅटिन अमेरिका.
- राष्ट्रभक्त दिन – अमेरिका.
-
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादनातिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवनासुमनात तू, गगनात तूतार्यांमध्ये फुलतोस तूसद्धर्म जे जगतामध्येत्यांच्या मध्ये वसतोस तूचोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मनाश्रमतोस तू शेतांमध्येतू राबसी श्रमिकांसवेजे रंजले अन् गांजलेपुसतोस त्यांची आसवेंस्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावनान्यायार्थ जे लढती रणींतलवार तू त्यांच्या करींध्येयार्थ जे तमीं चालतीतू दीप त्यांच्या अंतरीज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधनाकरुणाकरा, करुणा तुझीअसता मला भय कोठले ?मार्गावरी पुढती सदापाहीन मी तव पाउलेंसृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
अती शहाणा
एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका ! सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते. कधी – कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा. सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही. नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे.मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल. आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.तात्पर्य-अती शहाणा त्याचा बैल रिकामा.@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !बालगीत
चांदोबा चांदोबा भागलास का ?निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?निंबोणीचे झाड करवंदी,मामाचा वाडा चिरेबंदी !आई-बाबांवर रुसलास का ?असाच एकटा बसलास का ?आता तरी परतुनी जाशील का ?दूध न् शेवया खाशील का ?आई बिचारी रडत असेल,बाबांचा पारा चढत असेल !असाच बसून राहशील का ?बाबांची बोलणी खाशील का ?चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?दिसता दिसता गडप झाला !हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?कवी : ग. दि. माडगुळकर@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
✪ जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणते ?➜ भारतीय राज्यघटना.✪ ‘दौलताबाद’ चे पूर्वीचे नाव काय होते ?➜ देवगिरी.✪ ‘बजरंग पुनिया’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?➜ कुस्ती.✪ बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ?➜ भारत.✪ मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?➜ बाबरइंग्रजी प्रश्न
1) Which animal guards the house?Ans: The dog guards the house2) animal is useful for agricultural work?Ans: Bullock is useful for agricultural work3) What does a cow give?Ans: Cow gives a milk4) Which is the fastest running animal?Ans: Cheetah is the fastest running animal.5) Who is called tiger aunt?Ans: The cat is called the tiger’s auntअधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#11 september, 11 september 2023, 11 september 2021 panchang, 11 september 2022 special day, 11 september 2023 weather, 11 september 2022 panchang in hindi,11 september is celebrated as, what is celebrated on 11 september, 11 september 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.
12 daily routine bhej