11 Jully
11 जुलै दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार – मंगळवार
दिनांक- 11/07/2023, 11 Jully
मिती- आषाढ कृ.9
शके– 1945
सुविचार- परिस्थिती गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत.
म्हणी व अर्थ : दगडापेक्षा वीट मऊ – मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.

ठळक घटना आणि घडामोडी
जुलै ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९२ वा किंवा लीप वर्षात १९३ वा दिवस असतो.
चौदावे शतक
- १३४६ – लक्झेम्बर्गचा चार्ल्स पाचवा पवित्र रोमन सम्राटपदी.
पंधरावे शतक
- १४०५ – चीनचा झ्हेंग हे जहाजांचा तांडा घेउन जग धुंडाळायला निघाला.
सोळावे शतक
- १५७६ – मार्टिन फ्रोबिशरला लांबून ग्रीनलॅंडचा किनारा दिसला.
अठरावे शतक
- १७५० – कॅनडातील हॅलिफॅक्स शहर आगीत भस्मसात.
एकोणिसावे शतक
- १८०४ – अमेरिकेच्या उपराष्ट्रपती एरन बरने अर्थमंत्री अलेक्झांडर हॅमिल्टनला द्वंद्वयुद्धात ठार केले.
- १८११ – इटलीच्या आमादिओ ऍव्होगाड्रोने आपला वायुच्या अणुरचनेचा सिद्धांत प्रकाशित केला.
- १८५९ – चार्ल्स डिकन्सची ए टेल ऑफ टू सिटीज ही कादंबरी प्रकाशित.
- १८८९ – मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
विसावे शतक
- १९१९ – नेदरलॅंड्समध्ये कामगारांकडून एका दिवसात जास्तीत जास्त आठ तासांचे काम घ्यायचा व रविवारी सुट्टी देण्याचा कायदा लागू झाला.
- १९२१ – मंगोलियाला चीनपासून स्वातंत्र्य.
- १९४० – हेन्री फिलिप पेटैं विची फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९५५ – अमेरिकेने आपल्या चलनावर इन गॉड वी ट्रस्ट (देवावर आमचा विश्वास आहे) असे मुद्रित करण्याचे ठरवले.
- १९५७ – करीम हुसेनी आगाखान इस्माइलीपंथाच्या प्रमुखपदी.
- १९६० – हार्पर लीची टु किल ए मॉकिंगबर्ड ही कादंबरी प्रकाशित.
- १९७१ – चिलीने तांब्याच्या खाणींचे राष्ट्रीयीकरण केले.
- १९७३ – ब्राझिलचे बोईंग ७०७ प्रकारचे विमान पॅरिस ओर्लि विमानतळावर कोसळले. १३४ पैकी १२३ प्रवासी ठार.
- १९७५ – चीनमध्ये इ.स.पू. तिसऱ्या शतकातील चीनी मातीच्या ६,००० मुर्ती असलेली दफनभूमी सापडली.
- १९७८ – स्पेनमध्ये प्रवाहीकृत वायू घेउन चाललेल्या ट्रकला अपघात. २१६ ठार.
- १९७९ – अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.
- १९८२ – फुटबॉल विश्वकपच्या अंतिम सामन्यात इटलीने पश्चिम जर्मनीला ३-१ असे पराभूत केले.
- १९८३ – इक्वेडोरमध्ये बोईंग ७२७ प्रकारचे विमान कोसळले. ११९ प्रवासी ठार.
- १९९१ – नायजेरिन एरवेझने भाड्याने घेतलेले नेशनएरचे डी.सी.८ प्रकारचे विमान जेद्दा येथे कोसळले. २६१ प्रवासी ठार.
- १९९५ – अमेरिका व व्हियेतनाममध्ये राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित.
- १९९५ – स्रेब्रेनिकाची कत्तल – युगोस्लाव्हिया व बॉस्नियाच्या सैन्याने स्रेब्रेनिका शहर काबीज केले व ८,००० व्यक्तींना ठार मारले.
- १९९५ – क्युबाना दि एव्हिएशनचे ए.एन.२४ प्रकारचे विमान कॅरिबियन समुद्रात कोसळले. ४४ ठार.
एकविसावे शतक
- २००३ – १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.
- २००४ – सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.
- २००६ – मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.
जन्म
- १२७४ – रॉबर्ट द ब्रुस, स्कॉटलंडचा राजा.
- १६५७ – फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा राजा.
- १७६७ – जॉन क्विन्सी ऍडम्स, अमेरिकेचा ६वा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ – गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.
- १९३० – जॅक अलाबास्टर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५० – जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- ४७२ – ॲंथेमियस, पश्चिम रोमन सम्राट.
- ९३७ – रुडॉल्फ दुसरा, बरगंडीचा राजा.
- ११७४ – अमाल्रिक, जेरुसलेमचा राजा.
- १६८८ – नराई, सयामचा राजा.
- १८०४ – अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.
- १९५९ – चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९८९ – सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- जागतिक लोकसंख्या दिन – संयुक्त राष्ट्रे.
- नाडम – मंगोलिया.
- राष्ट्रीय समुद्री दिन – चीन.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#11 jully, 11 jully 2023, 11 jully 2021 panchang, 11 jully 2022 special day, 11 jully 2023 weather, 11 jully 2022 panchang in hindi, 11 jully is celebrated as, what is celebrated on 11 jully, 11 jully 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.