अध्यक्ष महोदय ,
पूज्य गुरुजनवर्य आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,
आज मी तुम्हांला लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.
लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरी जिल्हातील मधल्या टिळक आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला.
बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी,राजकारणी, तत्त्वज् ,संपादक,लेखक आणि वक्ते होते.
“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच “हा नारा त्यांनी दिला.
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक जहालवादी होते.
१८९३ साली टिळकांनी गणेशोस्तव आणि १८९५ साली शिवाजी महाराज जयंती हे सार्वजनिक व सामाजिक सण म्हणून साजरे केले. अशा महान नेत्याचा मृत्यू १ऑगस्ट १९२० साली झाला. अशा थोर नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम.
माझे चार शब्द पूर्ण करतो.
जय हिंद ……जय महाराष्ट्र…..
मराठी,हिंदी व इंग्रजी भाषणे आपल्याला सदर पेजवर उपलब्ध करून देत आहोत.
मराठी भाषणे पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.