शिक्षक दिन भाषण | Teacher day

शिक्षक दिन भाषण

अध्यक्ष महोदय,

सन्माननिय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,

आज मी तुम्हांला शिक्षक दिनानिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.

आज मी आपणाला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दल माहिती सांगणार आहे.

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती ,नामांकित राजनीतितज्ञ, तत्त्वज्ञ, प्राध्यापक व शिक्षणतज्ञ होते.

मी माझे चार शब्द पूर्ण करतो.

जय हिंद ……जय महाराष्ट्र !

 

शिक्षक दिन भाषण -२

अध्यक्ष महोदय,

सन्माननिय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,

आज मी तुम्हांला शिक्षक दिनानिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.

गुर्रु ब्रम्हा गुर्रु विष्णु गुर्रु देवो महेश्वर l गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै: श्री गुरुवे नमःll

आज मी आपणाला शिक्षकांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगणार आहे.

छोट्या बालकाचे देशाचा उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे काम शिक्षक करत असतो.राष्ट्र उभारणीत निरपेक्ष व सेवाभावीपणाने शिक्षक काम करत असतो.

‘जे जे आपणाशी ठावे ,ते दुसऱ्याशी सांगावे’ या प्रमाणे शिक्षक आयुष्यभर ज्ञानदान करत असतो.

माझे चार शब्द पूर्ण करतो.

जय हिंद ……जय महाराष्ट्र

 

शिक्षक दिन भाषण -३

अध्यक्ष महोदय,

पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो,

आज मी तुम्हांला शिक्षक दिनानिमित्त दोन चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही विनंती.

आज मी आपणाला शिक्षकांबद्दल माहिती सांगणार आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे ,शाळेत येणारा प्रत्येक बालक आपल्या पूर्वज्ञानाने समृद्ध होऊन शाळेत येत आहे.पालक सुजान झाला आहे, शिक्षकांकडून त्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.संगणक व मोबाईल मुले मुलेही आपले ज्ञान वाढवत आहेत.

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळे अनेक मुले समृद्ध होत आहेत.देशाचे भावी आधारस्तंभ घडवणाऱ्या शिक्षकाला माझे त्रिवार वंदन.

जय हिंद ……जय महाराष्ट्र !

Author: Active Guruji

Blogger

3 thoughts

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.