संख्यांचे गाणे (The song of numbers)
1ली,बालभारती-1
पान -५९ ,घरचा अभ्यास
चला शिकूया.-
तालासुरात साभिनय गाणे म्हणणे.
गाण्यातून ६ ते ९ या संख्यांची ओळख होणे.
मामी-काकी या या या
आजी-आजोबा या या या
मिळून सारे गाऊया
संख्यांच्या गावाला जाऊया ।।धृ।।
झुरळाला पाय सहा
चित्रात मोजून पहा
मोजणी करून पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया ।।१।।
इंद्रधनुष्यात रंग सात
सुंदर दिसते आकाशात
रंग त्यात भरूया
संख्यांच्या गावाला जाऊया ।।२।।
छत्रीला काड्या आठ
पावसाशी पडेल गाठ
छत्री आपण उघडूया
संख्यांच्या गावाला जाऊया ।।३।।
घड्याळात वाजले नऊ
दादाने केला खाऊ
मिळुनी खाऊ खाऊया
संख्यांच्या गावाला जाऊया ।।४।।
झुकझुक झुकझुक संख्या गाडी
संख्यांची आम्हां लागे गोडी
संख्यांची गंमत पाहूया
संख्यांच्या गावाला जाऊया ।।५।।
मराठी व सेमी माध्यम
| क्र | घटकाचे नाव | लिंक |
| 1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
| 2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
| 3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
| 4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
| 5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
| 6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.