शून्याचे गाणे (Song of zero)
1ली,बालभारती-1
पान -७९ ,घरचा अभ्यास
चला शिकूया.-
तालासुरात साभिनय गाणे म्हणणे.
गाण्यातून शून्याची ओळख होणे.
नऊ पक्ष्यांची पडली गाठ
नवातून एक गेला राहिले आठ
आठ पक्ष्यांना घातला भात
आठातून एक गेला राहिले सात
सात पक्ष्यांचा थवा पहा
सातातून एक गेला राहिले सहा
सहा पक्ष्यांनी केला नाच
सहातून एक गेला राहिले पाच
पाच पक्ष्यांची किलबिल फार
पाचातून एक गेला राहिले चार
चार पक्ष्यांनी केली चैन
चारातून एक गेला राहिले तीन
तीन पक्ष्यांना आला फोन
तीनातून एक गेला राहिले दोन
दोन पक्ष्यांनी केली बियांची फेक
दोनातून एक गेला राहिला एक
एक पक्षी एकटाच बसला
तोही उडून गेला. कुणी नाही राहिला.
कुणी नाही राहिला, म्हणजे ० (शून्य) राहिला.

मराठी व सेमी माध्यम
| क्र | घटकाचे नाव | लिंक |
| 1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
| 2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
| 3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
| 4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
| 5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
| 6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
पहिलीच्या विषयानुसार,
अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे. विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.