सप्ताहाचे सात वार ,Seven Days of the Week
सप्ताहाचे सात वार
बोगद्यातून गाडी आरपार
आज आहे सोमवार
चला होऊ सायकलस्वार
सोमवार नंतर मंगळवार
मोटारीची चाके चार
मंगळवार नंतर बुधवार
ट्रकवर सामान भारंभार
बुधवार नंतर गुरुवार
स्कूटरवर लागे वारा गार
गुरुवार नंतर शुक्रवार
नीट कर रस्ता पार
शुक्रवार नंतर शनिवार
विमानाचा वेग फार
शनिवार नंतर रविवार
होडीची सफर मजेदार
असे आहेत सात वार
पुन्हा फिरती चक्राकार
चला शिकूया.-
सप्ताहाच्या वारांचे आकलन होणे.
वेळापत्रक वाचता येणे.
काल-आज-उद्या ही संकल्पना समजणे.
मराठी व सेमी माध्यम
पहिलीच्या विषयानुसार, अध्ययन निष्पती – येथे क्लिक करा
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |
या पाठ्यपुस्तकाचे एकूण चार भाग असून प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक आहे.
विदयार्थ्यांना एकावेळी एकाच भागाच्या पाठ्यपुस्तकाचे अध्ययन करायचे असल्याने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.